Government Schemes And Policies fFor Girl Child Empowerment In India : गेल्या काही वर्षात भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना भारतातील मुलींच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण बालसंख्येपैकी मुलींचे प्रमाण ४८ टक्के आहे, त्यापैकी अनेक बालमजुरी किंवा बाल तस्करी आणि बालविवाहाच्या बळी ठरल्या आहेत. भारतात १२.१५ दशलक्ष मुले तर ८.९ दशलक्ष मुली विवाहित आहेत; विवाहित मुलीचे प्रमाण मुलांच्या तुलनेत तिप्पट आहेत. तस्करीच्या सर्व बळींपैकी ५१ टक्के मुले होती, त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक मुली होत्या. यावरुन असंख्य मुलींचे भवितव्य अंधारमय आणि भयावह होते हे दिसून येते. शतकानुशतके भारतातील लैंगिक असमानता ही एक महत्त्वाची सामाजिक समस्या आहे, परंतु यातून मार्ग काढत मुलींना समाजात समान संधी देण्यासाठी भारत सरकारने भारतात अनेक फायदेशीर योजना आणि धोरणे लागू केली आहेत. भारतात मुलींच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या या सरकारी योजना नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊन…

बेटी बचाओ, बेटी पढाओ

बेटी बचाओ बेटी पढाओ (BBBP) ही योजना २२ जानेवारी २०१५ मध्ये हरियाणातून सुरू करण्यात आली. लिंग-आधारित किंवा लिंग-निवडक गर्भपात यांसारख्या सामाजिक समस्यांपासून मुलींचे संरक्षण करण्यासाठी आणि मुली-बाल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक उद्देशाने ही योजना सुरू झाली, BBBP योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेतून जिल्हा स्तरावरील घटकांना १०० टक्के आर्थिक सहाय्य केलं जातं. या योजनेद्वारे निधी थेट DC/खात्यामध्ये हस्तांतरित केला जातो.

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Small Scale Industries
UPSC-MPSC : लघुउद्योगासंदर्भात राबवण्यात आलेली धोरणे व त्याची उद्दिष्टे कोणती?
स्त्री-सक्षमीकरणाच्या योजना

यूट्युबची कमाल! कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात बनल्या आयएएस अधिकारी, वाचा लघिमांचा प्रेरणादायी प्रवास!

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे प्राथमिक उद्दिष्टे खालीलप्रमाणे

 • लिंग-आधारित गर्भपात प्रतिबंधित करणे
 • बालवयात मुलींची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करणे
 • मुलींचे शिक्षण आणि समावेश सुनिश्चित करणे
 • लिंग स्टिरियोटाइपला आव्हान देणे आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे
 • मुलींसाठी सुरक्षित आणि स्थिर वातावरण प्रदान करणे
 • मुलींच्या मालमत्तेच्या वारसा हक्काचे समर्थन करणे

पात्रता:

 • १० वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी असलेले कुटुंब पात्र आहे.
 • कोणत्याही बँकेत मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते (SSA) उघडलेले असणे आवश्यक आहे.
 • मुलीचा जन्म भारतात झाला पाहिजे. ही प्रणाली अनिवासी भारतीयांसाठी खुली नाही.

सीबीएसई उडान योजना

सीबीएसई उडान योजना हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून, भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सहकार्याने चालवला जाणारा एक कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम भारतातील सर्वात महत्त्वाच्या सरकारी मुलींच्या योजनांपैकी एक आहे, ज्याचा उद्देश भारतातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या वाढवणे हा आहे.

सीबीएसई उडान योजनेची प्राथमिक वैशिष्ट्ये:

 • ११ वी आणि १२ वी इयत्तेतील मुलींसाठी मोफत अभ्यासक्रम साहित्य आणि ऑनलाइन संसाधने, जसे की व्हिडिओ नोट्स.
 • ११ वी आणि १२ वी इयत्तेतील मुलींसाठी आठवड्याच्या शेवटी ऑनलाईन आणि ऑफलाइन वीकेंड क्लासेस,
 • पात्र महिला विद्यार्थ्यांसाठी समवयस्क शिक्षण आणि करिअरच्या संधी.
 • टोल-फ्री नंबरद्वारे अभ्यास सहाय्य आणि स्पष्टीकरण सुविधा.
 • विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण निरीक्षण आणि ट्रॅकिंग.

पात्रता:

 • इयत्ता १० वी मधील ७० टक्के सुरक्षित सरासरी असलेले अर्जदार या योजनेची निवड करू शकतात.
 • त्यांना विज्ञान आणि गणितात किमान ८० टक्के गुण मिळाले पाहिजेत.
 • निवड करणाऱ्या विद्यार्थ्याचे गणित आणि विज्ञानात किमान ८ आणि ९ GPA असणे आवश्यक आहे.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही एक विशेष सरकारी बचत ठेव योजना आहे. ज्यामध्ये मुलीला प्राथमिक खातेदार म्हणून वैशिष्ट्यीकृत केले जाते तर पालक/कायदेशीर पालक या खात्याचे संयुक्त धारक असतात. हे खाते मुलगी १० वर्षांची होण्यापूर्वी उघडता येते आणि खाते उघडल्यानंतर १५ वर्षांपर्यंत योगदान देणे आवश्यक आहे.

या खात्यात केलेल्या गुंतवणुकीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत:

 • कमीत-कमी २५० रुपये भरून खाते उघडता येते.
 • वर्षाला किमान २५० रुपये आणि कमाल १ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करता येते.
 • या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी २१ वर्षे आहेत.
 • हे खाते भारतामध्ये एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर करता येते.
 • लघु बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर याचे आहे. (७.६% इतके)
 • जमा केलेली मुद्दल, संपूर्ण कालावधीत मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी लाभ कलम 80C अंतर्गत करमुक्त आहेत.
 • सध्या , सुकन्या समृद्धी योजनेचे(SSY) अनेक कर (Tax) लाभ आहेत.
 • मॅच्युरिटी नंतर खाते बंद न केल्यास मुदतीनंतरही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
 • मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची परवानगी आहे.
 • खाते चालू केल्यानंतर फक्त पंधरा वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात.

बालिका समृद्धी योजना

बालिका समृद्धी योजना ही एक शिष्यवृत्ती योजना आहे, जी दारिद्र्यरेषेखालील तरुण मुली आणि त्यांच्या मातांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तयार केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश समाजातील त्यांचा दर्जा सुधारणे, मुलींचे लग्नाचे वय वाढवणे आणि शाळांमध्ये मुलींची नोंदणी तसेच टिकवून ठेवणे हे आहे. अर्जदार महिला आणि बाल विकास विभागाच्या वेबसाइटवरून बालिका समृद्धी योजना फॉर्म विनामूल्य डाउनलोड करू शकतात.

बालिका समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे:

 • ही बालिका लाभ योजना शहरी तसेच ग्रामीण भागात उपलब्ध आहे.
 • नवजात मुलाच्या जन्मानंतर मुलीच्या आईला रोख लाभ दिला जातो.
 • शाळेत जात असताना, मुलीला दहावीपर्यंत वार्षिक शिष्यवृत्ती मिळू शकते.
 • मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर आणि अद्याप अविवाहित राहिल्यानंतर शिल्लक रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पात्रता:

 • मुलगी बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
 • मुलींचा जन्म १५ ऑगस्ट १९९७ रोजी किंवा नंतर होणे आवश्यक आहे

माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी राष्ट्रीय प्रोत्साहन योजना

भारत सरकारच्या, मानव संसाधन विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने मुलींना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय प्रोत्साहन योजना संपूर्ण भारतात सुरु केली. ही योजना प्रामुख्याने भारतातील वंचित वर्गातील मुलींना मदत करणे आणि त्यांना त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यास सक्षम करणे हा आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार मुलींच्या नावावर 3000 रुपये जमा करते आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर म्हणजे इयत्ता १० वीची परीक्षा पूर्ण केल्यानंतर ही रक्कम व्याजासह दिली जाते.

पात्रता:

 • मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे
 • १६ वर्षाखालील असावी
 • उमेदवाराने ८ वी उत्तीर्ण आणि ९वी मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
 • सरकारी अनुदानित शाळेत नाव नोंदवले गेले पाहिजे.