स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाला पुरेश झोप मिळणं आवश्यक आहे. स्त्रियांना तर पुरुषांपेक्षा थोडीशी जास्त झोपेची गरज असते, असं संशोधनातून सिध्द झालं आहे. पुरेशा झोपेबरोबरच शांत झोपही आवश्यक असते. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात तर शांत झोप लागणं खूपच महत्त्वाचं आहे. शांत झोप झाली नाही, तर दुसऱ्या दिवशी उठल्यापासून जडपणा येतो. दिवसभर थकवा जाणवत राहतो, चिडचिड होते. घरची जबाबदारी आणि ऑफिसचं काम किंवा घरातलं काम करताना स्त्रियांची अगदी दमछाक होते. सध्याच्या आधुनिक युगात तर लक्ष विचलित करणारी अनेक साधनं आहेत. आपण बेडरुममध्ये झोपायला तर जातो पण अगदी टीव्ही पाहणं किंवा मोबाईल फोन हातात घेत सर्फिंग सुरु केलं की झोप उडून जाते. साहजिकच याचा परिणाम शरीरावर दिसायला लागतो. पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा परिणाम स्त्रियांच्या हार्मोन्स, पचनक्रिया, स्मरणशक्ती, मासिक पाळी, मूड, प्रतिकारशक्ती आणि बऱ्याच गोष्टींवर नकळतपणे परिणाम होत असतो. त्यामुळेच रोजची झोप पुरेशी आणि त्याचबरोबर चांगली म्हणजे ‘क्वालिटी स्लीप’ होणे खूप महत्त्वाचे आहे.

आणखी वाचा : मुलीच्या भविष्यासाठी अशी करा आर्थिक गुंतवणूक!

day longer climate change
रात्रीपेक्षा दिवस का मोठा होत आहे? वैज्ञानिकांनी सांगितलं धक्कादायक कारण
do you eat excessive amounts of sugar
तुम्ही गरजेपेक्षा जास्त साखर खात असल्यास शरीर देते ‘हे’ संकेत, ‘या’ लक्षणांना ओळखा
fund Free scheme announced in Maharashtra budget
लेख: ‘फुकट’चे कल्याण नको रे बाबा…
delayed, arrival, rain, rain news,
दगाबाज ऋतूला पत्र…
Bombay Blood Group
‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ म्हणजे काय? १० हजार लोकांपैकी फक्त एकामध्ये आढळतो हा रक्तगट; जाणून घ्या सविस्तर
Zika virus in Pune What are symptoms and what should pregnant women watch out for
गर्भवती महिलांना झिका विषाणूचा धोका जास्त? कशी घ्यावी त्यांची काळजी, डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Tirgrahi Yog 2024
१०० वर्षांनी ३ ग्रहांची महायुती ‘या’ राशींना करणार लखपती? सुख, समृद्धी व शांती घेऊन माता लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी
how to deal with loneliness and how to help yourself
‘एका’ मनात होती..!: माझीच मदत मला!

झोप चांगली झाली तर शरीर आणि मन तंदुरुस्त राहते. उठल्यावर ताजंतवानं वाटतं. कामाच्या ठिकाणी थकवा येत नाही, उलट उत्साह जाणवत राहतो. सगळी कामं वेळच्या वेळी पूर्ण होतात आणि अर्थातच त्यामुळे दैनंदिन कामं व्यवस्थित होतं. याचा एकूणच आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो. शांत झोप न लागण्यामागे आपल्या काही सवयी कारणीभूत ठरतात. या अगदी किरकोळ सवयी वाटत असल्या तरी त्यांचा आपल्या झोपेवर परिणाम होत असतो.

आणखी वाचा : शरीरधर्माचाही सन्मान हवा! (भाग ४ था)

कोणत्या सवयी आपण टाळू शकतो

१) रोज वेगवेगळ्या वेळेस झोपायला जाणे
झोप न लागण्याचा त्रास होतो असं अनेक स्त्रियांचं म्हणणं असतं. तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरावीक नसणे, हे यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. रोज ठरलेल्या वेळेस झोपून सकाळी ठरलेल्या वेळेस उठणे ही अत्यंत चांगली सवय तर आहेच पण त्यामुळे ‘क्वालिटी स्लीप’ वरही चांगला परिणाम होतो. अगदी वीकएण्ड किंवा सुट्टीचे दिवस असले तरी ही सवय सोडू नका. तरीही किमान एखादी वेळ ठरवून त्याच वेळेला झोपण्याचा प्रयत्न करा. अनेकजणींना वीकएण्डला जास्त उशिरापर्यंत जागण्याची सवय असते. पण काही कारण नसेल तर उगाचच जागू नका. तुमचं हे शेड्युल नियमित नसतं तेव्हा तुम्हाला एनर्जीसाठी चहा, कॉफीवर अवलंबून राहावं लागतं. पण रोज ठरावीक वेळेला झोपता आणि ठरावीक वेळेवर उठता तेव्हा तुमच्या शरीराला ते माहिती असतं. त्यावेळेस अशा कॉफिनयुक्त पेयांवर जास्त अवलंबून राहावं लागत नाही.

आणखी वाचा : मैत्रिणी, तोरा, तुलना आणि असूया… नकोच!

२) खूप उशिरा जेवण करणे
दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीचं जेवण शांतपणे करावं, अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते. तर घरातलं सगळं आवरून मग शांतपणे दोन घास खावेत असं अनेकींना वाटतं. पण या सगळ्यांत रात्रीच्या जेवणाला जर खूप उशीर झाला तर त्याचा तुमच्या झोपेवर नक्कीच परिणाम होतो. उशिरा जेवण झालं की झोपायलाही उशीर होतो. झोपेत पचनक्रिया मंदावते. उशिराच्या जेवणाचा पचनावर परिणाम होतो. रात्रीचं जेवण आणि झोप यात किमान दोन ते तीन तासांचं तरी अंतर असणं आवश्यक आहे. तुमच्या शरीराला पूर्ण विश्रांती घेण्याची संधी द्या, मग बघा दुसऱ्या दिवशी सकाळी कसं ताजंतवानं वाटेल.

आणखी वाचा : पतीचं वर्षश्राद्ध आणि हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाची तयारी करणारी ‘ती’

३) झोपण्याच्या आधी व्यायाम करु नका

सकाळी आपल्या सगळ्याचजणींची धावपळ सुरु असते. ऑफिसची वेळ गाठणे, मॉर्निंग शिफ्ट, डबे, स्वयंपाक, मुलांच्या शाळा, घरातली कामं अशा अनेक कारणांमुळे अनेकींना सकाळी व्यायामासाठी वेळच मिळत नाही . मग खूप जणी रात्री व्यायाम करतात. जेवणानंतर शतपावली करणं हे ठीक आहे. पण झोपायला जाण्याआधी किमान तीस तास तरी खूप जास्त व्यायाम करणं टाळावं. रात्री खूप जास्त व्यायाम केल्यानं शरीर शांत होण्याऐवजी उत्तेजित होतं, याचा परिणाम म्हणजे शांत झोप लागत नाही.

४) खूप उशिरा झोपणे

अनेकजणींना रात्री सगळं आवरून, दुसऱ्या दिवशीची तयारी करून झोपायला खूप उशीर होतो. याचा परिणाम शांत झोपेवर होतो. हलकी झोप, शांत झोप आणि REM झोप असे झोपेचे तीन प्रकार असतात. तुम्ही १० वाजता झोपलात तर १० ते २ ही शांत झोपेची वेळ असते. रात्री किमान ९० मिनिटे तरी खूप शांत झोप लागणे, शरीरासाठी आवश्यक असते. ती झोप याच वेळेत मिळते. तुम्ही झोपायलाच रात्री १२ किंवा १ वाजता गेलात तर त्यापुढे शांत झोप किती वेळ मिळणार याचा तुम्हीच विचार करा. वेळेवर आणि लवकर झोपायला जाण्यासाठी वेळेचं नियोजन ही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ९ ते १० च्या दरम्यान झोपायला जाणे हे सगळ्यात चांगले.

आणखी वाचा : National Girl Child Day 2023 : तुमच्या मुलीला ‘या’ गोष्टी शिकवाच!

५) गॅजेटपासून दूर राहा

रात्री बेडवर पडल्यावर मोबाईल पाहण्याची सवय असेल तर ती आधी बंद करा. कितीतरी वेळा आपल्याला झोप आलेली असते, पण मोबाईल पाहण्याच्या नादात ती उडून जाते आणि मग नंतर कितीतरी वेळ लागत नाही. झोप उशिरा लागल्याने पुरेशी होत नाही आणि दुसऱ्या दिवशी उठताना अजिबात उत्साह वाटत नाही. रात्रीच्या वेळेस मोबाईलचा निळा प्रकाश डोळ्यांवर पडणं अजिबात चांगलं नसतं. त्यामुळे झोपायला जाताना ३० ते ४० मिनिटे आधीच तुमचे सगळे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स बंद करा आणि शांतपणे झोपा. रात्री सोशल मीडियावर किती वेळ राहायचं याचा निर्णय तुम्हीच घ्या. त्याऐवजी दिवसभर काय झालं आणि दुसऱ्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत याचा विचार करा.

(शब्दांकन : केतकी जोशी)