बार्बी म्हणजे गेल्या अनेक पिढ्यांच्या आकर्षणाचा विषय. बाहुल्यांच्या विश्वातील एक परी. बार्बीने बाहुल्यांच्या बाह्यरूपाला पूर्णतः बदलून आधुनिकतेची झालर दिली. अनेकांच्या रंजक बालपणाचा ती अविभाज्य भाग होती. अशा या बार्बीचा ९ मार्च हा जन्मदिवस. १९५९ साली ‘अमेरिकन इंटरनेशनल टॉय फेस्टिव्हल’ मध्ये बार्बीचे पहिले पदार्पण झाले. बार्बीची मुख्य ओळख ही ‘फॅशन डॉल’ म्हणून आहे. ‘फॅशन डॉल’ म्हणजे अशी बाहुली जिची निर्मिती तत्कालीन ‘फॅशन ट्रेण्ड’ दर्शवण्यासाठी करण्यात येते. अशा फॅशन डॉल्स मुलांना खेळण्यासाठी व मोठ्यांना त्यांच्या संग्रहाचा भाग म्हणून ठेवण्यासाठी तयार केल्या जातात.

आणखी वाचा : २००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी आद्य राणी ‘नागनिका’

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या बार्बी या बाहुलीच्या निर्मितीचे श्रेय मेटल इंक या अमेरिकन कंपनीकडे जाते. प्रसिद्ध अमेरिकन उद्योजिका रुथ हॅड्लेर या ‘टॉय जायंट मेटल इंक’ या कंपनीचे सह संस्थापक इलियट यांच्या पत्नी होत. रुथ हॅड्लेर यांच्या कल्पनेतून बार्बीचे रूप आकारास आले. रुथ हॅड्लेर यांनी जन्मास घातलेल्या बार्बीच्या मागे त्यांच्या मुलांच्या भावविश्वाचा मोठा सहभाग आहे. रुथ यांनी आपली मुलगी बार्बरा हिला नेहमीच बेबी डॉल व पेपर डॉलशी खेळताना पाहिले होते. आपल्या बाहुल्यांशी खेळताना भावविश्वात रमलेली बार्बरा त्या बेबी पेपर डॉल्सना कधी मोठ्या मुलीचे तर कधी स्त्रीचे रूप देऊन तिच्याशी खेळत असे. जपान, भारत, चीन यांसारख्या देशांमध्ये प्राचीन काळापासून बाहुल्यांचे वय बाल, तरुण, वृद्ध अशा विविध वयांच्या दाखविण्याची परंपरा असली तरी तत्कालीन अमेरिकेत लहान मुलींच्या बाहुल्या या फक्त लहान बाळांच्या रूपातच तयार करण्याची प्रथा होती. परंतु, आपल्या मुलीच्या तसेच समवयस्क इतर मुलींच्या निरीक्षणातून रुथ यांना अमेरिकन मुलांच्या विश्वात बाहुलीचे रूप बदलण्याची गरज भासली. त्यांनी ही कल्पना त्यांचे पती इलियट यांच्या कानावर घातली. परंतु त्यावेळी त्यांच्या पतीला ती कल्पना फारशी भावली नाही.

आणखी वाचा : जगातील ‘आद्यमहिला’; ‘ती’चे वय तब्बल ३१ लाख ८० हजार वर्षे!

कालांतराने रूथ सहकुटुंब जर्मनीला गेलेल्या असताना तिथे त्यांना अपेक्षित अशी बाहुली दिसली. जर्मनीतील ती फॅशन डॉल ‘बिल्ड लिली’ या नावाने प्रसिद्ध होती. बिल्ड लिलीच्या साथीने रूथ यांना आपली संकल्पना पतीला पटवून देण्यात यश आले. व त्यानंतर पहिल्यांदा ‘प्रौढ’ असणारी बाहुली अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच जन्माला आली. म्हणूनच हा दिवस या देशाच्या इतिहासात ‘राष्ट्रीय बार्बी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. बार्बी जन्माला अमेरिकेत आलेली असली तरी तिची भुरळ मात्र संपूर्ण जगाला पडली होती.

बार्बीला लहान मुलांच्या विश्वात एका तरुणीच्या रूपात दाखविण्यात आले होते. व हेच तिचे मूळ आकर्षणही होते. म्हणून अनेकांनी तिच्या या रूपावर आक्षेपही घेतला. परंतु कालांतराने या आक्षेपाला मागे टाकत बार्बीने जनमानसाची पकड घेतली. व ती मुलांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग ठरली. बार्बी ही अमेरिकन संस्कृतीत जन्माला आलेली ‘यंग डॉल’ अर्थात तरुणी होती. त्यामुळे साहजिकच तिच्या भावविश्वात १९६१ मध्ये झालेले केन नावाच्या मित्राचे आगमन हा तिच्या कथेचा राजकुमार ठरणार होता. ‘टॉय जायंट मेटल इंक’ ही कंपनी केवळ बार्बीच्या निर्मितीवर थांबली नाही. बार्बीच्या भावविश्वातील तिचे आई, वडील, भावंड, मित्र अशा सर्वांचे आगमन कालांतराने त्यांनी केले. बार्बीचे आई वडील जॉर्ज आणि मार्गारेट रोबेर्टस, केनची आई एडन कार्सन अशा पात्रांच्या निर्मितीने मुलांच्या भावविश्वाची रंगत वाढविण्याचे काम केले. किंबहुना रॅण्डम हाउस सारख्या प्रसिद्ध प्रकाशकांनी बार्बीची पार्श्वभूमी सांगणारी कथा कादंबरीच्या स्वरूपात प्रकाशित केली. या कथेमध्ये बार्बीचे आई, वडील, बहिणी, तिचे केन सोबत असलेले भावनिक नाते अशा बार्बीच्या आयुष्याशी संबंधित भावविश्वावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे.

आणखी वाचा : Blogs : २३०० वर्षांपर्यंत मागे जातो ‘धाराशिव’चा पुरातत्त्वीय इतिहास!

केन आणि बार्बी यांची गणना जगातील सर्वात प्रसिद्ध बाहुल्यांमध्ये करण्यात येते. ही पात्रे, बाहुल्या जरी काल्पनिक असल्या तरी बार्बीला देण्यात आलेले मूळ नाव बार्बरा हे रूथ यांच्या मुलीचे आहे. बार्बी हे बार्बराचे टोपणनाव आहे. जगात तयार करण्यात आलेली पहिली बार्बी ही ब्लॅक अॅण्ड व्हाइट पट्ट्यांचास्वीमसूट व डोक्यावर पोनीटेल या रूपात दाखवण्यात आली होती. त्यावेळी बार्बीचा गौरव हा ‘टीन एज फॅशन मॉडेल’ म्हणून करण्यात आला होता. पहिल्या वहिल्या बार्बीचे कपडे हे शार्लेट जोन्सन यांनी डिझाइन केले होते. बार्बी ही मूळची अमेरिकेची असली तरी तिची पहिली निर्मिती ही जपानमध्ये झाली, हे विशेष. महत्त्वाचे म्हणजे तत्कालीन बार्बीचे कपडे हे जपानी गृहिणींच्या हस्तकौशल्याची देण आहेत. बार्बी निर्मितीच्या पहिल्या वर्षी तीन लाख ५० हजार बाहुल्या विकल्या गेल्या,इतक्या मोठ्या प्रमाणात बाहुल्यांच्या झालेल्या मार्केटिंगचे हे जगातले बहुधा पहिलेच उदाहरण ठरावे.