डॉ. मेधा ओक, मधुमेह तज्ज्ञ
१४ नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. त्यानिमित्ताने मधुमेह म्हणजे काय याची शास्त्रोक्त माहिती घेऊ. इन्सुलिनचे संशोधक सर फ्रेडरिक बँटिंग त्यांचा हा जन्मदिवस. त्यांना १९२२ मध्ये नोबल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. इन्सुलिनच्या शोधाला या वर्षी १०० वर्षं पूर्ण होत आहेत. इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन (IDF) या संस्थेने जागतिक मधुमेह दिनाची सुरुवात केली आणि डब्ल्यूएचओ (WHO)- वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्याला पाठिंबा दिला. ‘ब्लू सर्कल’ हे त्याचे बोधचिन्ह आहे. ‘निळे वर्तुळ’ म्हणजे संपूर्ण सकारात्मकता. आयुष्य आणि आरोग्य याच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. सगळी राष्ट्रे एकत्र जोडली जातात म्हणून निळे वर्तुळ हे बोधचिन्ह जागतिक मधुमेह कम्युनिटीची किंवा समाजाची एकात्मकता दर्शवते. दरवर्षी ही संस्था एक घोषवाक्य जाहीर करते. या वर्षीचे घोषवाक्य आहे ‘एज्युकेशन टू प्रोटेक्ट टूमॉरो’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : सुप्रिया सुळे -‘उत्तम ते सर्वोत्तम’ या प्रवासात लाभले अनेक मेन्टॉर्स!

सर्वसामान्य माणसांसाठी मधुमेहाविषयी जागृती, मधुमेह होऊ नये म्हणून घेता येणारी काळजी, मधुमेह असल्यास आजाराविषयी माहिती. साधे सोपे उपाय व कमी खर्चाचे उपाय यांना अग्रक्रम देऊन मधुमेहापूर्वीच स्वतःचे संरक्षण करणे हा या संस्थेचा हेतू आहे. मधुमेहाची गुंतागुंत टाळून सगळ्यांनी आपले आयुष्य आनंदाने, आरोग्यपूर्ण जगावे असा हा संदेश देतो. गोड बोलून मधुमेह होत नाही पण गोड खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो! ३६५ दिवस हा शरीरात वस्तीला येतो त्यामुळे त्याची खास आणि कायम बडदास्त ठेवणे खूप गरजेचे. मधुमेहात टाईप वन आणि टाईप टू असे दोन ढोबळ प्रकार पूर्वी मानले. नंतर त्यात बरेच प्रकार दिसून आले. स्वादुपिंडाचे विकार, ऑटो ॲन्टीबाॅडीज् , गर्भारपणातील मधुमेह (Gestational) , औषधांच्या साईड इफेक्टने, अति ताणतणाव असल्याने (stress induced ) हे काही प्रकार.

आणखी वाचा : डोळ्यांखालचा ‘पफीनेस’, काळी वर्तुळं कमी करणारा ‘आय पॅच’!

टाईप टू मधुमेह हा चाळीशीनंतर येणारा आजार व टाईप वन हा लहान मुलांमधील आजार असे पूर्वी मानले जायचे. त्यानंतरच्या काळात वयोगट २५ ते ४० मध्ये टाईप टूमधून झपाट्याने पसरू लागला. आता तर वय वर्ष ५ ते १३ किंवा १३ ते १९ या वयोगटालाही मधुमेहाने घेरले आहे. झपाट्याने बदलणारी जीवनशैली, उंचावलेला राहणीमानाचा दर्जा आणि व्यायामाचा अभाव ही जरी प्रमुख जरी प्रमुख कारणे असली तरी अनुवंशिकतेचा सहभाग ही मोठा आहे.

आणखी वाचा : गौतमी पाटील ‘१०० टक्के’ चुकलेली नाही!

टाईप २ मधुमेह साथीच्या रोगासारखा पसरत आहे! त्याबरोबरच स्थूलताही त्याच गतीने लहान मुलांमध्ये वाढू लागली आहे. स्थूलता व मधुमेह याविषयी जवळजवळ १९८२ पर्यंत भारतात ऐकीवात नव्हते. म्हैसूरच्या शाळेत केलेल्या तपासणीत फक्त शून्य पॉईंट सहा टक्के (०.६ टक्के) मधुमेह आढळला होता. त्यासाठी वयोगट निवडलेला होता पाच ते दहा वर्ष. पण आता हे चित्र झपाट्याने बदलत आहे. दिल्लीत अलीकडे केलेल्या एका तपासणीत युवकांमध्ये स्थूलता २५ टक्क्यांहून अधिक तर महिला गटात ४७ टक्क्यांहून अधिक दिसून आली. अर्थात त्याबरोबर मधुमेह पण दिसून आला. एका अभ्यासामध्ये मधुमेहाबरोबर वाढलेला रक्तदाबही आढळून आला, त्याचबरोबर रक्तातील चरबीची पातळी व स्त्रियांमध्ये अंडाशयातील दोष दिसून आले (पाॅली सिस्टीक ओव्हरियन डिसीज- PCOD).

आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’चे रूग्णांना सहाय्यकारी संशोधन (उत्तरार्ध)

मधुमेह हा इन्सुलिनच्या अभावामुळे होतो. म्हणजेच बीटा पेशी कमी इन्सुलिन तयार करतात. बिटा पेशी पॅनक्रियाज् किंवा स्वादुपिंड इथे स्थित असतात. शरीरात साठलेल्या अतिरिक्त चरबीमुळे, वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे व काही जनुकीय बदल झाल्यामुळे इन्सुलिनला प्रतिकूलता येते यालाच आपण इन्सुलिन रेजिस्टन्स (insulin resistance) असे म्हणतो. या दोन कारणामुळे रक्तातील साखर अनियंत्रित होते व त्याला आपण मधुमेह (Diabetes mellitus) असे म्हणतो. पण मधुमेह हा नुसताच साखरेचा आजार नसून कर्बोदके, प्रथिने आणि चरबी या सगळ्यांच्यातच बिघाड झाल्यामुळे निर्माण होतो, तसेच छोट्या व मोठ्या रक्तवाहिन्यांना मधुमेह खूप त्रास देतो म्हणून त्याला ‘मेटाबोलिक ॲण्ड व्हॅस्क्युलर डिसीज’ म्हणतात. वाढलेली रक्तशर्करा सर्व अवयवांपर्यंत पोहोचते आणि कुठल्याही अवयवात बिघाड निर्माण करू शकते.

आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’ सांगतेय, करिअर- विदेशातील शिक्षणाचा समृद्ध करणारा अनुभव (पूर्वार्ध)

मधुमेह हा आजार वय, देश, स्त्री की पुरुष, जातपात कशालाच जुमानत नाही. त्यामुळे सर्वांना त्याबद्दल माहिती असणे, तसेच तशी आधीपासूनच काळजी घेणे प्राप्त आहे.
oakmedha51@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health lets understand diabetes how it occurs insulin vp
First published on: 10-11-2022 at 17:07 IST