घर, नवरा, मुलं, नातेवाईक, सणवार, जेवणखाण हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी फक्त स्त्रियांवरच असते, असा समज आपल्याकडे वर्षानुवर्षे आहे. त्यात अनेकजणी नोकरीही करतात. कधीकधी हा ताण स्त्रियांना असह्य होतो. अनेक आयांवर या सुपरमॉम सिंड्रोमचा परिणाम होतो; त्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्याही निर्माण होतात. एक चांगली आई होण्याच्या प्रयत्नात अनेकदा आपण आपपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो, आपल्या क्षमतांपेक्षाही आपण अधिक काम करत राहतो. थकवा आला तरी मान्य करत नाही. आपणही असंच सुपरमॉम असावं असं अनेकींना वाटत असतं. पण सुपरमॉम सिंड्रोमही आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच हा एक प्रकारचा मानसिक आजारही आहे. या प्रकारच्या मानसिक स्थितीला ‘सुपरमॉम सिंड्रोम’ म्हटलं जातं. सुपरमॉम सिंड्रोममुळे स्त्रियांना खूप तणावाला सामोरं जावं लागतं.

आणखी वाचा : नातेसंबंध: ऐक ना गं, सूनबाई!

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

सुपरमॉम सिंड्रोमची लक्षणं

सुपरमॉम सिंड्रोममुळे ताण वाढतो. यामुळे महिलांमध्ये चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, सतत मूड स्विंग्ज, एकटेपणा, द्विधा मनस्थिती, नैराश्य अशी लक्षणं जाणवू लागतात. त्याशिवाय वजन वाढणे, पोटदुखी, स्नायूदुखी, कधीकधी श्वास घ्यायला त्रास होतो, पचनक्रियेत गडबड होते.महत्त्वाचं म्हणजे सुपरमॉम सिंड्रोम हा काही गंभीर आजार नाही आणि तो अगदी डॉक्टरकडे न जाताही बरा होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत थोडेसे बदल करावे लागतील. अर्थातच हे बदल सकारात्मक असतील.

आणखी वाचा : लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? सेक्समुळे वजनावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

एकूणच बायकांना आपल्यापेक्षा इतरांकडे जास्त लक्ष द्यायची सवय असते. त्यात आई झाल्यावर तर सगळ्यांत आधी मूल आणि मग जमलं तर स्वत:कडे लक्ष दिलं जातं. सुपरमॉम सिंड्रोम असलेल्या महिला स्वत:कडे अजिबातच लक्ष देत नाहीत. अगदी आवश्यक गरजा असल्या तरी त्याकडे लक्ष देणं त्यांना अपराधीपणाचं वाटतं. एखादी गोष्ट पटत नसेल किंवा आवडत नसेल तर त्यांना ‘नाही’ म्हणायला जमत नाही. सगळ्यांत आधी त्या इतरांच्या इच्छा, गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड़त असतात.त्यामुळे त्यांच्याकडे स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळही नसतो आणि एनर्जीही नसते. यामुळे अर्थातच त्यांचा स्ट्रेस वाढतो. आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतोय की नाही याकडेच त्यांचं सतत लक्ष असतं. किंबहुना कोणत्याच गोष्टींमध्ये त्या आनंद शोधू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा तणाव सतत वाढतो. सुपरमॉम होण्याच्या नादात त्या स्वत:चं शारीरिक आणि मानसिक आरोग्य पणाला लावतात.

आणखी वाचा : ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

ताणतणाव कमी करण्यासाठी…

प्राधान्यक्रम ठरवा

तुम्ही गृहीणी असाल किंवा नोकरदार… तरी तुमच्या गोष्टींचा प्राधान्यक्रम तुम्हीच ठरवा. तुमच्यासाठी तुमचं मूल सगळ्यांत महत्त्वाचं आहेच पण त्याचबरोबर तुमची तब्येतही महत्त्वाची आहे. त्यामुळे मुलाला सांभाळताना घरातल्या इतर कामांकडे थोडं दुर्लक्ष करणं, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणं हे करता आलं पाहिजे. तुम्ही एकाचवेळेस अनेक कामं करु शकत नाही. त्यामुळे सगळ्यांत महत्त्वाची कामं कोणती ते ठरवा म्हणजे गोंधळ होणार नाही आणि स्ट्रेसही वाढणार नाही

आणखी वाचा : काखेतील घामाच्या दुर्गंधीमुळे लाज वाटते? करा हे घरगुती उपाय

मदत मागा आणि घ्या
मुलांचं संगोपन ही काही एकट्या आईची जबाबदारी नसते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही एकटीनंच ती पार पाडण्याचा प्रयत्न करु नका. त्यासाठी आपल्या जोडीदाराबरोबर बोलत राहा, त्याची मदत घ्या. आईबरोबरच वडीलही मुलांसाठी महत्त्वाचे असतात याची जाणीव असू द्या. तसंच तुमच्या पार्टनरला मुलांबद्दलच्या काही जबाबदाऱ्या सोपवा. त्यामुळे त्यांचं बॉण्डिंगही अधिक घट्ट होईल. तसंच तुमच्या कुटुंबातले सदस्यही तुमचं काम हलकं करु शकतात. त्यामुळे तुम्हालाही छोटासा ब्रेक घेता येईल.

स्वत:कडे लक्ष द्या

आई, पत्नी, सून, मुलगी आणि त्याचबरोबर गृहिणी किंवा ऑफिस कर्मचारी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सगळ्यात आधी तुमची स्वत:ची तब्येत चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे स्वत:कडे लक्ष द्या. शारीरिक दुखणी असतील तर वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. प्राणायाम, योग, मेडिटेशनच्या मदतीने मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या.

आणखी वाचा : तासभराच्या प्रवासात मला पहिल्यांदाच भेटलेली ‘ती’!

तुलना करु नका

प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. इतरांबरोबर तुलना करत राहिलात तर त्यामुळे त्रास होतो. विनाकारण आपण स्वत:ला कमी लेखायला लागतो, त्यानं स्ट्रेस वाढतो. तुम्ही इतरांसारखे होऊ शकत नाही तसंच इतर कुणीही तुमच्यासारखं होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. तुमची मुलं, तुमचे कुटुंबीय यांच्यासाठी तुम्ही खूप महत्वाच्या आहात हे लक्षात ठेवा.

स्वत:ला दोषी मानू नका
मुलांकडून एखादी चूक झाली तर त्यासाठी स्वत:ला दोषी मानू नका. कोणीही व्यक्ती अगदी शंभर टक्के परफेक्ट नसते. त्यामुळे चुका सगळ्यांकडून होतात. काहीवेळेस घाईगडबडीत एखादी गोष्ट विसरली जाते. या सगळ्यासाठी तुम्ही एकट्याच जबाबदार आहात, हे डोक्यातून काढून टाका. तुमच्यातल्या कमतरता ओळखा पण त्याचबरोबर तुमच्यात कितीतरी चांगल्या गोष्टी असतील त्यांच्याकडेही लक्ष द्या. स्वत:चं कौतुक करायला शिका.

स्ट्रेस लेव्हल ओळखा

नेमका कशामुळे तुमचा ताण वाढतो आणि कशामुळे कमी होतो हे ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमचं घर, जोडीदार, मुलं, ऑफिस, घरकाम, नातेसंबंध यापैकी त्याचा कसा संबंध आहे यावर विचार करा. तुम्ही जर तुमच्या तणावाचं कारण ओळखू शकलात तर तो कमी करण्यासाठी उपायही तुम्ही करु शकाल. तुमच्या परीने चांगली आई होण्याचा तुम्ही प्रयत्न करत असालच. तुमच्याकडे बघून तुमचं मूलही शिकत असतं. त्यामुळे पुरेशी झोप घेणे, योग्य आहार, नियमित व्यायाम, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणे यांसारख्या गोष्टीही ती तुमच्याकडूनच शिकणार आहेत. सुपरमॉम होण्याच्या नादात हे विसरु नका!