कला आणि कौशल्य प्रत्येकामध्ये असते फक्त ते ओळखून आपल्याला जोपासावे लागते. अगदी लहान वयापासून मुलांमध्ये कौशल्य दिसते. पालकांनी आपल्या मुलांचे कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले तर त्यांचे भवितव्य घडू शकते. अशाच एका चिमुकलीने आपले कौशल्य जोपासल्यामुळे आणि तिच्या पालकांनी तिला प्रोत्साहन दिल्यामुळे तिची जगभर चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नऊ वर्षीय श्रेयोवी मेहता हिला बहुप्रतिष्ठित वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कारासाठी उपविजेतेपद मिळाले आहे. श्रेयोवीने राजस्थानातील भरतपूर येथील केवलदेव राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात मॉर्निंग वॉक करताना मोरांच्या जोडीचा सुंदर फोटो काढला होता. पहाटेच्या वेळी धुक्यांमध्ये दिसणाऱ्या दोन मोरांचे मोहक फोटो तिने सुंदरपणे काढला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे ८ ऑक्टोबर रोजी ६० व्या वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर स्पर्धेच्या विजेत्यांची अधिकृत घोषणा केली जाईल.

नॅचरल हिस्ट्री म्युझियम (NHM) द्वारे प्रतिष्ठित पुरस्काराच्या ६०व्या सोहळ्यात श्रेयोवी हिला ‘१० वर्षे आणि त्याखालील’ श्रेणीमध्ये उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. दिल्लीजवळील फरीदाबाद येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी श्रेयोनवीला ‘इन द स्पॉटलाइट’ नावाच्या चित्रात झाडांच्या खाली असलेल्या मोरांच्या जोडीचे फोटो काढला. मेहता हिने काढलेला फोटो हा ११७ देश आणि प्रदेशांमधील सर्व वयोगटातील आणि अनुभव स्तरावरील सहभागींनी घेतलेल्या जवळपास ६०,००० फोटोंपैकी एक होता.

हेही वाचा – कोण आहे प्रीती पाल जिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रचला नवा इतिहास? कसा होता तिचा इथपर्यंतचा प्रवास? घ्या जाणून

श्रेयोवीने फोटो कसा काढला?

मेहता कुटुंबासह जंगलात फेरफटका मारत असताना श्रेयोवीला मोर दिसले. ती लगेच वडिलांकडून कॅमेरा घेण्यासाठी धावली आणि चतुराईने फोटो काढला. ‘इन द स्पॉटलाइट’ असे शीर्षक असलेल्या या फोटोमध्ये हे मोर जगाची पर्वा न करता झाडाखाली आराम करत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा – Big Dawgs: ‘मौत का कुआं’मध्ये दुचाकी चालविणारी कल्याणची कशिश ठरतेय चर्चेचा विषय; एका गाण्याने बदलले आयुष्य

श्रेयोवी यांचे वडील शिवांग हे देखील अनुभवी फोटोग्राफर आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने वाइल्डलाइफ फोटोग्राफीमध्ये करिअर करायचे असल्याचे सांगितले.

हा सन्मान मिळाल्याबद्दल बोलताना श्रेयोवी मेहता म्हणाली की, “तिला वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे.वाइल्डलाइफ फोटोग्राफीमधील सर्वात मोठ्या मंचावर नॅचरल हिस्ट्री म्युझियमने भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याचे मी काढलेल्या फोटोला मान्यता दिली याचा मला आनंद आहे. मी अभ्यास करत राहीन जेणेकरून एक दिवस आपला राष्ट्रीय प्राणी – वाघालाही अशीच ओळख मिळेल. “

फरिदाबादमधील एका खाजगी शाळेत इयत्ता पाचवीत शिकणारी श्रेयोवी मेहता हिने आपले कुटुंब, शाळा आणि देशाचा अभिमान वाढवला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये एका पुरस्कार सोहळ्यात तिला पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How this 9 year old shreyovi mehta became indias youngest to bag wildlife photographer of the year award snk
Show comments