हल्ली शहरात काही मुलींच्या बॅगमध्ये एक विशिष्ट वस्तू दिसू लागली आहे. वरवर डीओड्रण्टसारखी दिसणारी ही वस्तू पाहून तुम्ही फसाल, पण ते डीओड्रण्ट नसतं. तो असतो ‘ड्राय शॅम्पू’!

‘गुड हेअर डे’ कुणाला आवडणार नाही! पण हेसुद्धा खरं आहे, की रोज शॅम्पूनं छान केस धुणं कुणालाही ‘प्रॅक्टिकली’ शक्य नसतं. आणि रोजच्या रोज शॅम्पू करूही नये असं म्हणतात, कारण त्यामुळे केसांच्या मुळाशी असलेला आवश्यक तेलकटपणासुद्धा सारखा धुतला जाऊन स्काल्प खूप कोरडा होऊ शकतो.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

अर्थातच आपण ज्या दिवशी शॅम्पू करतो, केवळ त्याच दिवशी केस सुंदर, ‘खिले खिले’ दिसतात, बाकी रोज असतो तो ‘बॅड हेअर डे’! अशात आयत्या वेळी कुठे बाहेर जायचा प्लान ठरला, पार्टी ठरली किंवा अगदी कॉलेज वा ऑफिसमध्ये काही कार्यक्रम, महत्त्वाची मीटिंग असली आणि सकाळी शॅम्पू करणं शक्य नसेल, तर हल्ली बऱ्याचजणी ड्राय शॅम्पूचा पर्याय वापरू लागल्यात.

ड्राय शॅम्पू कसा वापरतात?

हे शॅम्पू साधारणपणे स्प्रे बॉटलमध्ये मिळतात, त्यामुळे वापरापूर्वी शॅम्पूची बाटली चांगली हलवून घ्यावी. हा शॅम्पू अर्थातच कोरड्या केसांवर लावायचा असतो आणि तो पाण्यानं धुवायला लागत नाही. डोक्यावर (म्हणजेच ‘स्काल्प’वर) ६-७ इंचांवर ही बाटली धरून केसांच्या मुळांना शॅम्पूतलं द्रव्य मिळेल अशा बेतानं स्प्रे मारतात. (डोळ्यांना, कानांना जपणं आवश्यक) काही वेळ- म्हणजे जवळपास अर्धं मिनिट ते १-२ मिनिटं थांबून मग हातांनी शॅम्पू केसांच्या मुळांशी छान चोळून लावतात आणि नेहमीप्रमाणे केस विंचरतात. झाला आपला शॅम्पू!

ड्राय शॅम्पू स्काल्प आणि केस खरोखरच स्वच्छ करतो का, याचं उत्तर ‘हो आणि नाही’ असं दोन्ही आहे! या शॅम्पूमध्ये पावडरसारखे बारीक बारीक कण असतात, ते केसांच्या मुळाशी असलेला तेलकटपणा, चिकटपणा, धूळ आपल्यात सामावून/ शोषून घेतात, केस कोरडे करतात आणि त्यांना ‘व्हॉल्यूम’ देतात. शिवाय साध्या शॅम्पूप्रमाणे यातल्या बहुतेक शॅम्पूना मोहक वास असतो, त्यामुळे फ्रेशनेस मिळतो.

ड्राय शॅम्पूचा स्प्रे फार जवळून डोक्यावर मारला, तर केसांच्या मुळाशी पावडरचे पांढरे कण दिसू शकतात. याला शॅम्पूचा ‘रेसिड्यू’ म्हणतात आणि ते जवळून केसात कोंडा झाल्यासारखं दिसू शकतं. याचं भान ठेवायला हवं. हल्ली ‘नो रेसिड्यू’ ड्राय शॅम्पूसुद्धा मिळतात.

या ड्राय शॅम्पू रेसिड्यूवर हेअर स्टायलिस्ट मंडळी एक उपाय वापरतात. ड्राय शॅम्पू करून केस विंचरून झाले, की हेअर ड्रायरचा वापर करून केसांच्या मुळांशी हवेचा झोत मारला जातो आणि पुन्हा केस सेट केले जातात. मात्र यात हेअर ड्रायरमधून येणारी हवा अजिबात गरम असणार नाही असं सेटिंग केलं जातं. फक्त हवेच्या झोतानं ड्राय शॅम्पूचे कण उडवून दिले जातात. या कणांमध्ये केसांच्या मुळाशी असलेला तेलकटपणा शोषून घेतलेला असतो, त्यामुळे यानंतर केसात पावडरचा रेसिड्यू राहात नाही.

ड्राय शॅम्पू तुम्हाला कितीही आवडला, तरी तो रोज नक्कीच वापरू नये, असं वापरणारे सांगतात. काहींच्या मते आठवड्यात १ ते २ पेक्षा अधिक वेळा ड्राय शॅम्पू वापरू नये.