डॉ. उल्का नातू – गडम

आत्तापर्यंत आपण बैठकस्थितीतील आसनांचा सराव पाहिला. आसनांचे लाभ पहाताना ‘आसनेन रुजो हन्ति’ म्हणजेच आसनाने रोग नाहीसे होतात असे ‘गोरक्षशतक’ नावाचा ग्रंथ म्हणतो. ‘आसनेन रजो हन्ति’ म्हणजेच आसनांच्या सरावाने आळस नाहीसा होतो, असे हठप्रदीपिका म्हणते. आसनांच्या सरावाने स्थिरता, अंगलाघव – म्हणजेच फ्लेक्सिबिलिटी प्राप्त होते.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा

आळस दूर करणारे व तजेला आणणारे दंडस्थितीतील एक उत्तम आसन म्हणजे ताडासन.

हे आसन करण्यासाठी दंडस्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित अंतर व दोन्ही पावले एकमेकांना समांतर असूद्यात.

tadasana

दोन्ही हात शरीराच्या मागे, उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडा. आता आसनाची पूर्वस्थिती घ्या. शक्य असेल तर दोन्ही पावले एकमेकांना जोडून घ्या. जर तोल सांभाळणे कठीण होईल असे वाटले तर दोन्ही पायात अंतर घ्या.

हात शरीराच्या बाजूला घ्या. आता एक श्वास सोडून द्या. एक दीर्घ व खोलवर श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. अलगद दोन्ही पायांच्या बोटांवर शरीराचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा. कठीण वाटल्यास दोन्ही पायांत अंतर घ्या.

शरीराला वरच्या बाजूला खेच अथवा ताण आणा. अंतिम स्थितीत डोळे मिटल्यास तोल जाण्याची व पडण्याची भीती आहे. त्यामुळे नीट सराव होईपर्यंत डोळे मिटू नका.

चार ते पाच श्वास या स्थितीत स्थिर राहिल्यावर उलट चाल करून दोन्ही हात पुन्हा शरीराच्या बाजूला घ्या. दोन्ही पावले नीट जमिनीवर आणा. दोनही पायांत अंतर व नंतर दंडस्थितीत विश्रांती घ्या. मान पाठीमागे झुकवा.

या आसनाच्या सरावाने पाठकण्यास उभ्या कक्षेत खेच मिळाल्याने पाठकण्याचे आरोग्य सुधारते. पायांचे स्नायू / खांद्यांचे स्नायू यांचे आरोग्य सुधारते. गुडघे व घोट्यांचे आरोग्य सुधारते. शंख प्रक्षालन शुद्धिक्रियेसाठी या आसनाचा सराव उपयुक्त आहे.
ulka.natu@gmail.com