माळरानावर सहज उगवणारी पांढरी रूई आपल्याला यासाठी वापरता येईल. रूईपासून सुरेख असा जांभळा गर्द रंग तयार होतो. अगदी नेमकं सांगायचं तर हलका वाईन कलर जसा असावा तसा रंग तयार होतो. यात कपडा बुडवून कपड्याला रंगवता येते. म्हणजे एक वॉश देता येतो. जर हा रंग पेंटींगसाठी वापरायचा असेल तर त्यात गवार गम मिसळून तो वापरावा, म्हणजे रंगवणं सोपं जातं. झाडांच्या मुळांपासून जसे आपण रंग तयार करतो तसेच पानांपासून आणि झाडावर येणाऱ्या बुरशीपासूनसुद्धा रंग तयार करता येतात.
नैसर्गिक रंग तयार करत असताना निसर्गाची अनेक गुपिते उलगडत जातात. मूळ तयार रंगात तुरटी, चुन्याची निवळी, लिंबूरस अशा विविध घटकांचा वापर केला तर रंगावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. मूळ रंगांमध्ये हे घटक मिसळल्यावर अनेक वेगळ्या छटा मिळून जातात. कमी अधिक गडद परिणाम साधता येतात. फुलांपासून रंग तयार करण्याच्या काही पद्धती आपण मागील लेखात बघितल्या तर फुलांसोबत झाडाच्या सालींचा वापर करूनही अनेक गडद छटा मिळवता येतात.
आंबा, फणस, नारळ आणि रूई यांच्या मुळांपासून आणि रेषां पासून रंग निर्मिती करता येते. फुलांपेक्षा या प्रक्रियेला जरा जास्त वेळ लागतो, पण मिळणारे परिणामही तितकेच थक्क करणारे असतात. मुळांपासून तयार होणारे रंग हे अधिक गडद आणि टिकाऊ असतात. प्रत्यक्ष कृती करण्याआधी पुरेशा प्रमाणात आपण वाळलेल्या मुळ्या गोळा करून घ्याव्यात. मग पुरेशा पाण्यात साधारण आठ, दहा तास त्यांना भिजत ठेवावे. त्यानंतर फुलांप्रमाणे त्यांना उकळून घ्यावं. थंड झाल्यावर पाणी गाळून घ्यावे. असा तयार होईल मुख्य रंग. यात लिंबू रस, तुरटी, चुना मिसळून त्याच्या मदतीने आपण कमी अधिक गडद छटा तयार करू शकतो.
मुळांपासून बनवलेले रंग हे अधिक गडद आणि पक्के असतात. फुलांपासून तयार होणारे रंग हे तुलनेने थोडे फिक्के असतात आणि कालांतराने धुवट होतात. झाडांची मुळं वापरून जे रंग तयार होतात त्यात रूईच्या झाडांच्या मुळांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
माळरानावर सहज उगवणारी पांढरी रूई आपल्याला यासाठी वापरता येईल. रूईपासून सुरेख असा जांभळा गर्द रंग तयार होतो. अगदी नेमकं सांगायचं तर हलका वाईन कलर जसा असावा तसा रंग तयार होतो. यात कपडा बुडवून कपड्याला रंगवता येते. म्हणजे एक वॉश देता येतो. जर हा रंग पेंटींगसाठी वापरायचा असेल तर त्यात गवार गम मिसळून तो वापरावा, म्हणजे रंगवणं सोपं जातं. झाडांच्या मुळांपासून जसे आपण रंग तयार करतो तसेच पानांपासून आणि झाडावर येणाऱ्या बुरशीपासूनसुद्धा रंग तयार करता येतात.
नैसर्गिक रंगात बीट, गाजर, गाजराचा पाला, झाडांची पानं यांच्या रसाचा जसा वापर होतो तसाच माती, दगड यांचाही वापर होतो. यापासून मिळणारे रंग हे अधिक टवटवीत, मनाला शांतता देणारे, तजेलदार पण भडक नसलेले असे असतात. त्यामुळे यांच्या वापराने फार भपकेबाज परिणाम मिळत नाहीत, पण मनाला शांतता मिळते. त्वचेला अपाय होत नाही आणि नकळत आपण निसर्गाशी जोडले जातो.
नैसर्गिक रंग तयार करण्यात ही अशी सगळी मजा आहे. इथे आपण अनुभव घेत, प्रयोग करत शिकायचं असतं. त्यातूनच नव्या कल्पना सुचतात आणि नव्या कलाकृती घडवता येतात.
mythreye.kjkelkar@gmail.com