scorecardresearch

घ्या उंच भरारी! हवाई दलात महिलांसाठीच्या संधी

हवाई दलात महिलांसाठीच्या संधी

घ्या उंच भरारी! हवाई दलात महिलांसाठीच्या संधी
हवाई दलात महिलांसाठीच्या संधी

सुरेश वांदिले

१) ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) – एरॉनॉटिकल इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स) – अर्हता-बीई/बीटेक आणि १२वी मध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले हवेत किंवा किंवा ६० टक्के गुणांसह असोसिएट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण किंवा ग्रॅज्युएट मेंबरशीप एक्झामिनेशन ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्सची परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (विषय सूची- कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल ॲण्ड कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग इत्यादी.) या परीक्षेला विद्यापीठाची मान्यता प्राप्त हवी. उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे. जून आणि डिसेंबरमध्ये या पदाच्या परीक्षेची जाहिरात भारतीय हवाई दलामार्फत प्रकाशित केली जाते.

ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)- एरॉनॉटिकल इंजिनीअर (मेकॅनिकल)- अर्हता-१२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. बीई/बीटेक किंवा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट इन इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी किंवा असोशिएट मेंबरशीप ऑफ इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया)च्या परीक्षेतील ए आणि बी भाग (सेक्शन) उत्तीर्ण किंवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या परीक्षेतील ए आणि बी भाग उत्तीर्ण. पुढील विषय किंवा शाखांमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक- एरोस्पेस इंजिनीअरिंग, एरोनॉ‍टिकल इंजिनीअरिंग, एअरक्रॉफ्ट मेंटनंन्स इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग ॲण्ड ऑटोमेशन, मेकॅनिकल इंजिनीअरिंग-प्रॉडक्शन, मेकॅनिकल इंजिनीअरिंग – रिपेअर ॲण्ड मेंटनन्स, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग.

संपर्क- एफसीएटी सेल, दूरध्वनी-०२०-२५५०३१०५, ईमेल- afcatcell@cdac.in

आणखी वाचा : लष्करातील संधी : रणरागिणी व्हा!

ग्राउंड ड्युटी (अतांत्रिक) – या अंतर्गत पुढील शाखांमध्ये निवड केली जाते.

(अ) ॲडमिनिस्ट्रेशन (प्रशासन) – ६० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील तीन वर्षे कालावधीची पदवी किंवा किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे.

(ब) शैक्षणिक -किमान अर्हता- एमबीए/एमसीए किंवा एमए/एमएस्सी इन इंग्रजी/ भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र/ सांख्यिकी/ आंतरराष्ट्रीय अभ्यास- इंटरनॅशनल स्टडीज / आंतरराष्ट्रीय संबंध- इंटरनॅशनल रिलेशन्स/ डिफेन्स स्टडीज- सुरक्षा अभ्यास/ मानसशास्त्र/ संगणकशास्त्र/ माहिती तंत्रज्ञान- इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ व्यवस्थापन/ मास कम्युनिकेशन/ पत्रकारिता/ जनसंपर्क. सर्व विषयांमध्ये सरासरी किमान ५० टक्के गुण आवश्यक. पदव्युत्तर पदवीचा कालावधी किमान दोन वर्षाचा असणे आवश्यक. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी हा कालावधी कमी आहे. पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक. उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे.

(क) अकांउट्स (लेखा)- ६० टक्के गुणांसह बी.कॉम पदवी, उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे.

आणखी वाचा : ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

(ड) लॉजिस्टिक्स (साधनसामग्री)- अर्हता-६० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी, किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे.

(इ) मेटिऑरॉलॉजी शाखा- अर्हता- पुढील शाखांमधील पदव्युत्तर पदवी- गणित/ सांख्यिकी/ भुगोल/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ एन्व्हायरॉन्मेंटल सायन्स/ ॲप्लाइड फिजिक्स/ ॲग्रिकल्चरल मेटिऑरॉलॉजी/ इकॉलॉजी ॲण्ड एन्व्हायरॉन्मेंट , एन्व्हायरॉन्मेंटल बॉयलॉजी, जिओ फिजिक्स. पदव्युत्तर पदवीच्या सर्व पेपरमध्ये सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. पदवी स्तरावर भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. या पेपरमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत.

ekank@hotmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How women can join indian air force as an officer know opportunities nrp

ताज्या बातम्या