Hurun Rich List : नुकतीच ‘हुरुन इंडिया रिच लिस्‍ट’ जाहीर करण्यात आली. या लिस्टनुसार सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक व्यवस्थापक (Professional Manager) म्हणून जयश्री उल्लाल यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्याकडे एकूण संपत्ती ३२ हजार १०० कोटी रुपये आहे. यावरून तुम्हाला कळेल की महिला प्रत्येक क्षेत्रात बाजी मारत आहे. अनेक महिलांना प्रेरणा देणाऱ्या जयश्री उल्लाल कोण आहेत, तुम्हाला माहीत आहे का? आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

भारतीय वंशाचे सुंदर पिचाई, सत्या नडेला यांची यशोगाथा तुम्ही अनेकदा ऐकली असेल. आज आपण भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल यांच्याविषयी जाणून घेऊ या. जयश्री यांनी २०२४ च्या ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’नुसार सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक व्यवस्थापक (Professional Manager) म्हणून स्थान मिळविले आहे.

Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Encroachment of vendors on footpaths of Rana Pratap Nagar nagpur
नागपूर:राणा प्रतापनगरचे पदपथ विक्रेत्यांच्या ताब्यात
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
Chandrashekhar Bawankule organization,
बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड, मविआ नेत्यांकडून भाजप लक्ष्य
Babasaheb Ambedkar, Shyam Manav,
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक पुत्र आणि ते…
janswasthya coffee table book loksatta
पुण्यात ‘लोकसत्ता’च्या ‘जनस्वास्थ्य’चे आज प्रकाशन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती

हेही वाचा : Sheetal Devi : जन्मताच दुर्मिळ आजाराने ग्रासले, आता ठरली सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू; १७ व्या वर्षी जागतिक स्पर्धा गाजवणारी शीतल देवी कोण?

जयश्री उल्लाल कोण आहेत?

जयश्री उल्लाल यांचा जन्म २७ मार्च १९६१ रोजी लंडनमध्ये भारतीय वंशाच्या एका कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यातील सुरुवातीचा काळ भारतात घालवला. शालेय शिक्षण त्यांनी दिल्ली येथे पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या युनायटेड स्टेट्‍सला गेल्या. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी सांता क्लारा विद्यापीठातून अभियांत्रिकी मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. पुढे कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या एका विजय उल्लाल यांच्याबरोबर जयश्री यांनी लग्न केले. या जोडप्याला दोन मुली आहेत.

जयश्री उल्लाल या अरिस्टा (Arista) नेटवर्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षा आहेत. २००८ पासून त्या Arista नेटवर्कचे नेतृत्व सांभाळत आहेत. ज्यावेळी कंपनीला पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते आणि कंपनीमध्ये फक्त ५० कर्मचारी होते, त्यावेळी जयश्री यांनी Arista नेटवर्कची धुरा सांभाळली आणि कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेले. २०१४ मध्ये अरिस्टा (Arista) नेटवर्कचा आयपीओ बाजारात आला होता आणि त्यावेळी कंपनीने कोट्यवधी रुपये कमावले होते. याचे संपूर्ण श्रेय जयश्री उल्लाल यांना जाते.

हेही वाचा : ‘ही’ आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला! संपत्तीचा आकडा वाचून व्हाल अवाक्; अंबानी, अदानींना देतेय टक्कर

जयश्री उल्लाल यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीनिमित्त त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. फोर्ब्सनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे सुंदर पिचाई, सत्या नडेला यांच्या संपत्तीपेक्षासुद्धा जयश्री उल्लाल यांची संपत्ती जास्त आहे.