नातेसंबंध फ्रेन्डझोनमध्ये जास्त मुलगेच का | in relationship friendship girls and boys sexual life partners what is friend zone and how to deal with it vp-70 | Loksatta

नातेसंबंध -‘फ्रेन्डझोन’मध्ये जास्त मुलगेच का?

निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांच्या रचनेतच खूप फरक केलेला आहे. ‘स्केअरसिटी प्रिन्सिपल’नुसार जे दुर्लभ आहे, कमी आहे त्याची मागणी आणि मूल्य सर्वांत जास्त असते. शिवाय स्त्रीचा प्रजनन क्षमतेचा काळ पुरुषांपेक्षा कमी असल्याने आणि इतरही काही कारणांमुळे स्त्री ही आपले लैंगिक आयुष्य आणि जोडीदाराबाबत पुरुषांच्या तुलनेत खूप जास्त सजग आणि सावध असते.

नातेसंबंध -‘फ्रेन्डझोन’मध्ये जास्त मुलगेच का?
मुलींपेक्षाही मुलगेच फ्रेन्डझोनमध्ये अधिक अडकतात

तुमच्या मैत्रिणीवर वा मित्रावर आता तुमचं प्रेम जडलंय… त्याच्या किंवा तिच्यासाठी वेळ, पैसा आणि भावनेची गुंतवणूक करताय, पण समोरील व्यक्ती तुमचा फक्त फायदा घेतेय आणि तुमचं नातं फक्त मैत्रीपुरतं ठेवत असेल तर… तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी ‘फ्रेन्डझोन’मध्ये म्हणजे फक्त ‘मैत्री कक्षेतच’ आहात! जास्त काही नाही. गम्मत म्हणजे ‘फ्रेन्डझोन’ होण्याचा अनुभव मुलींपेक्षा मुलांना जास्त येतो. मुली मुलांना जास्त ‘तंगवत’ ठेवतात, असं दिसतंय आजूबाजूला.

आणखी वाचा : नातेसंबंध : ‘चिल’ मॉम!

एखादा मुलगा वेड्यासारखा एखाद्या मुलीच्या प्रेमात असतो. बऱ्याच अंशी त्या मुलीलाही तो आवडत असतो, पण आयुष्यभराचा जोडीदार म्हणून तिच्या अपेक्षांच्या यादीत तो कुठेतरी कमी पडत असेल तर ती मुलगी त्याला तसं स्पष्ट न सांगता मैत्रीचं नातं कायम ठेवत राहते, असाच बहुतांशी अनुभव येतो. कधीतरी आपण तिच्या पसंतीस येऊ म्हणून तो मुलगा तिच्यासाठी खास वेळ काढणं, कॉलेजला गाडीवरून सोडणं- आणणं, गिफ्टस् देत राहणं… करतच राहतो. ती मुलगी त्याच्याकडून मिळणाऱ्या या सेवा आनंदाने स्वीकारते, पण कायम एक मैत्रीण म्हणूनच!
हे असं का होतं? मुला-मुलींच्या नात्यात तुलनेने मुलगे जास्त ‘फ्रेन्डझोन’ का होतात?

आणखी वाचा : नातेसंबंध : जास्त इनव्हॉल्व्हमेंट नकोच!

समीर आणि सावी हे जवळपास तीन वर्षांपासून जवळचे मित्र होते. इतक्या वर्षांच्या सहवासानंतर समीर सावीच्या प्रेमात पडला. अर्थातच ते सावीच्या लक्षात आलं होतं, पण तिच्या मनात आपल्या जीवनसाथीबद्दलच्या अपेक्षा यादीत समीर पूर्णपणे बसत नव्हता. तिला काही बाबतीत त्याच्यापेक्षा सरस जोडीदार मिळेलच अशी आशा होती. समाजशास्त्राच्या ‘होमॉगमी’च्या नियमानुसार आपला जीवनसाथी आपल्याहून सरस नाहीतर किमान आपल्याइतका तुल्यबळ तरी असावा ही आपली स्वाभाविक इच्छा असते. सावीनेही समीरला स्पष्ट नकार न देता आपण फक्त मित्र आहोत, असं सांगून अधांतरी ठेवलं होतं. कुणी मनासारखा जोडीदार नाही मिळाला तर समीरचा पर्याय तिला खुला ठेवायचा होता. म्हणजे सावीसाठी समीर ‘फ्रेन्डझोन’ होता.

आणखी वाचा : नातेसंबंध : नात्यात नेमकं काय चुकतंय?

‘फ्रेन्डझोन’ होण्यात मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त का आहे याचं कारण समजावून घेण्यासाठी राघवने त्याच्या मानसशास्त्र शिकवणाऱ्या मावशीला गाठलं. “कसं आहे नं राघव, निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांच्या रचनेतच खूप फरक केलेला आहे. “स्केअरसिटी प्रिन्सिपल’नुसार जे दुर्लभ आहे, कमी आहे त्याची मागणी आणि मूल्य सर्वांत जास्त असते. शिवाय स्त्रीचा प्रजनन क्षमतेचा काळ पुरुषांपेक्षा कमी असल्याने आणि इतरही काही कारणांमुळे स्त्री ही आपले लैंगिक आयुष्य आणि जोडीदाराबाबत पुरुषांच्या तुलनेत खूप जास्त सजग आणि सावध असते. बहुतांश वेळा तिच्या निवड प्रक्रियेत अनेक चाळण्या असतात. पुढील आयुष्यात आपसूक येणाऱ्या अनेक जबाबदाऱ्यांची अंतस्थ जाणीव तिला खूप चोखंदळ करत जाते. शिवाय आपले बिघडलेले लिंग गुणोत्तरही याला कारणीभूत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असणं हा महत्त्वाचा भाग आहे …पुन्हा तेच …‘प्रिन्सिपल ऑफ स्केअरसिटी’!”

आणखी वाचा : विवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं!

“पण मावशी, मला कुणी ‘फ्रेन्डझोन’ करत असेल तर ते मला कसं समजणार?”
“समजा तुझं एखाद्या मुलीवर खूप प्रेम आहे. तू तिच्यासाठी खूप वेळ देतोस, तिच्या आवडीनिवडीची काळजी घेतोस, पण तिला तुझ्याबद्दल तितकंसं आकर्षण वाटत नसेल, अशा वेळी जर तू तिच्या मागे मागे केलंस तर तुझ्याकडे खूप रिकामा वेळ आहे हे गृहीत धरून ती सतत तुझी मदत घेईल. नेहमी तुझी खूप तारीफ करेल …तू खूप चांगला आहेस म्हणत राहील, तूही तिला खूप आवडतोस म्हणेल. मग तू जर तिच्याजवळ प्रेमाची कबुली दिलीस तर ती ते हसण्यावारी नेईल किंवा सांगेल की तू तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस, पण मित्र म्हणून! तुझ्यासमोर दुसऱ्या मित्राची तारीफ करेल. कदाचित ती तुला टाळू लागेल. तेव्हा तुझ्या लक्षात येईल की आपण ‘फ्रेन्डझोन’ झालो आहोत.”
“मग यातून बाहेर कसं यायचं ?”

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : सेक्स्च्युअल शेअरिंग म्हणजे काय गं?

“त्या व्यक्तीला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देणं आधी बंद करायचं. निव्वळ मैत्रीच्या नात्यातदेखील हे लागू होतं बरं का. तिला हवं तेव्हा तिच्या सोईने तू उपलब्ध होऊ शकणार नाहीस हे अगदी हळुवारपणे निदर्शनास आणून द्यायचं. तुला इतरही अनेक महत्त्वाची कामं आहेत हे आवर्जून जाणवू द्यायचं. म्हणजे तुझी किंमत तू टिकवायची. त्यानंतर ती तुला गृहीत धरणं बंद करेल आणि तुझ्या वेळेचा आदर करेल. त्या पश्चातही तिला तुझ्याबद्दल प्रेमभावना नाही वाटली, तर अर्थ समजून वेगळं व्हायचं. तेव्हढ्यापुरती मैत्री ठेवायची, बस, उगाच गुंतायचं नाही.”
मावशीशी बोलल्यानंतर राघवने समाधानाचा आणि सुटकेचा निःश्वास टाकला. त्याच्या मनातील भाव ओळखून मावशी मंदशी हसली…
adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एकवीरा आई तू डोंगरावरी…

संबंधित बातम्या

Heart Attack: हार्ट अटॅकपासून करायचा आहे स्वतःचा बचाव? ‘ही’ औषधाची गोळी नेहमी जवळ ठेवा
फ्लॉवरची भाजी आवडीने खाताय? पण ‘या’ आजारांमध्ये ही भाजी चुकूनही खाऊ नका, नाहीतर…
डोळे येण्याला ‘हे’ आहे इंग्रजी नाव; ‘या’ घरगुती उपचारांनी मिळेल लगेच आराम
बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण: फिफा विश्वचषकामध्ये फुटबॉलपटू ‘स्पोर्ट्स ब्रा’ का घालतात? काय आहे यामागील कारण जाणून घ्या
पिंपरी- चिंचवड की बिहार! अज्ञातांनी तीन ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत हवेत झाडल्या ८ गोळ्या, घटना सीसीटिव्हीत कैद
दिव्या अग्रवालच्या मराठमोळ्या बॉयफ्रेंडने दिलेल्या अंगठीने वेधलं सर्वांचेच लक्ष, अंगठीवर लिहिलंय…
Maharashtra Karnataka Border Dispute : “हा संपूर्ण विषय मी अमित शाहांच्या कानावर घालणार आहे, कारण…”; देवेंद्र फडणवीसांचं विधान!
अंगभर कपडे घालूनही मलायका झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले “अगं थोडी लाज बाळग…”