योनीतून होणारा स्त्राव ही प्रत्येक स्त्रीला भेडसावणारी समस्या आहे. योनीतून होणारा स्त्राव व्हाईट डिस्चार्ज म्हणूनही ओळखला जातो. योनीतून होणारा स्त्राव स्त्रियांना योनिमार्गाच्या संसर्गापासून वाचवतो. शारीरिक संबंधादरम्यान हा स्त्राव ग्रीस म्हणून काम करतो. योनि स्राव सर्व स्त्रियांना होतो. हा पांढरा पदार्थ काही काळ मर्यादित प्रमाणात बाहेर पडल्यामुळे शरीराला कोणतीही समस्या येत नाही, परंतु जेव्हा या स्त्रावाचे प्रमाण अधिक होते तेव्हा योनीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्त्रियांना डिस्चार्ज अनेक टप्प्यात होतो. काही महिलांना मासिक पाळीपूर्वी तर काही महिलांना मासिक पाळीनंतर स्त्राव होतो. व्हाईट डिस्चार्जमुळे महिलांचे योनिमार्गाचे आरोग्य सुधारते. जास्त व्हाईट डिस्चार्ज हा ल्युकोरिया नावाचा आजार आहे. हा आजार महिलांना अधिक त्रास देतो. शरीरात पोषक तत्वांची कमतरता, योनीमार्गात बॅक्टेरिया, जास्त मानसिक ताण, जास्त काम, जास्त व्यायाम यांमुळे महिलांना ल्युकोरिया आजार होऊ शकतो.

( हे ही वाचा: Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा)

व्हाईट डिस्चार्ज नेहमीच आरोग्यास हानी पोहोचवत नाही. स्त्रियांच्या योनिमार्गाच्या आरोग्यासाठी मर्यादित प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज अनेक बाबतीत चांगला असतो. तुम्हाला माहिती आहे का की कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून येणारा व्हाईट डिस्चार्ज सामान्य मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया व्हाईट डिस्चार्ज कोणत्या परिस्थितीत सामान्य मानला जातो. आणि जर डिस्चार्ज जास्त असेल तर ते कसे नियंत्रित करावे.

व्हाईट डिस्चार्ज कधी आणि कोणत्या परिस्थितीत सामान्य असतो?

  • जर मासिक पाळीच्या आधी आणि नंतर डिस्चार्ज होत असेल तर ते सामान्य मानले जाते, ज्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका नसतो.
  • जेव्हा हार्मोन्समध्ये बदल होतो तेव्हा योनीतून निघणारा स्त्राव सामान्य मानला जातो.
  • गरोदरपणात व्हाईट डिस्चार्ज सामान्य मानला जातो.
  • मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी, पेशी आणि द्रवांनी भरलेला व्हाईट डिस्चार्ज सामान्य असतो. या स्त्रावाचा रंग हलका पिवळा असतो.
  • ओव्हुलेशनच्या वेळी पांढरा मलईदार स्त्राव सामान्य मानला जातो. हा स्त्राव तुमच्या शरीरात ओव्हुलेशन होत असल्याचा पुरावा आहे.

( हे ही वाचा: मासिक पाळीदरम्यान सेक्स? तर… हे नक्की वाचा)

जास्त स्त्राव होण्याची कारणे

योनिमार्गाच्या फंगल इन्फेक्शनमुळे स्त्रियांना जास्त प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज होतो. या संसर्गाची अनेक कारणे असू शकतात, जसे की अवयवांमध्ये यीस्टची झपाट्याने वाढ, हार्मोन्समध्ये बदल, स्तनपान, शारीरिक संबंध, मधुमेह, एंटीबायोटिक्स, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यामुळे देखील ही समस्या वाढू शकते. पुनरुत्पादक अवयवांमध्ये चांगले बॅक्टेरिया मरल्यामुळे, योनीमध्ये फंगल अधिक वाढू लागते. त्यामुळे जास्त स्त्राव होतो.

योनीमार्गाच्या संसर्गापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय

  • व्हाईट डिस्चार्ज रोखण्यासाठी महिलांनी आहारात ताक जास्त प्रमाणात सेवन करावे. यामुळे शरीरात चांगले बॅक्टेरिया वाढतात.
  • महिलांनी खोबरेल तेल वापरावे. अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध, हे तेल योनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
  • टी ट्री ऑईल फंगस, बॅक्टेरिया आणि विषाणू मारण्यासाठी प्रभावी ठरते. याच्या वापराने योनिमार्गातील संसर्ग बरा होतो.
मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In which condition white discharge is normal in women know the cause and prevention gps
First published on: 27-10-2022 at 19:05 IST