नुकतीच दिल्ली येथे सामुहिक बलात्काराची घटना घडली. १७ वर्षांची एक तरुणी आपल्या मित्रासह काकाजी मंदिरात संध्याकाळी ७ च्यासुमारास गेली होती. त्याच वेळी पोलिसांचा वेष धारण केलेले तीन पुरुष तिथे आले आणि त्या दोघांना शस्त्रांचा धाक दाखवून मंदिर परिसरात असलेल्या बागेत एकांतात नेऊ नतिच्या वर सामुहिकरित्या बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर श्रीराम कॉलेज फॉर वूमन या महाविद्यालयाने त्यांचे दररोजचे होणारे वर्ग रद्द करून ऑन- लाईन वर्ग घेण्याचे ठरविलेआहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असे महाविद्यालय व्यवस्थापनाने म्हटलेआहे.

या घटने संदर्भातील पोलीस तपास सुरू आहे. परंतु या घटनेनंतर दिल्लीतील तरुणी, महिला खूपच आक्रमक झाल्या आहेत.या विरोधातत्यांनी आंदोलन छेडले असून, यात ज्या स्वरूपाची घोषणाबाजी केली जात आहे, त्यावरून एक गोष्ट सहज लक्षात येते की, महिला आता आपला आवाज दबलेला ठेवायला तयार नाहीत.‘एककचोरी दो समोसा’, मर्द का क्या भरोसा’, ‘मेरे सिर में दर्द है, इसका कारण मर्द है’, ‘एकसुटा दो चाय, मर्द जात हाय हाय’, ‘नारी अपने आप की, नही किसी के बाप की’….

तसं पाहिलं तर महिला आंदोलनामध्ये ज्या स्वरूपाची नारेबाजी अपेक्षित असते, त्याच्यापेक्षावेगळ्यापद्धतीची ही नारेबाजी आहे.ज्या मधून स्त्रीच्या मनातला खदखदणारा राग व्यक्त होत आहे. हा राग समस्त पुरुष जाती विरोधातला नसून, त्या पुरुषांच्या विरोधात आहे, जे स्त्रीला एक खेळणं समजतात.कुणीही यावं, कधी उठावं, आपली लैंगिक वासना शमवावी आणि निघून जावं.इतकं सहज सोपं झालयं का बलात्कार करणं की आज कायद्याचाधाकच उरला नाही लोकांमध्ये, असा संतप्त सवाल या आंदोलन कर्त्या समाजाला विचारतआहे.

घरातून बाहेर पडल्या पासून ते अपेक्षित कामाचे ठिकाण असो वा शाळा किंवा मंदिर असो वा बाजार अथवा बाग, कोणतेच ठिकाण आज महिलांसाठी सुरक्षित राहिलेले दिसत नाही. प्रवास मग तो बसचाअसो वा मेट्रोचाकिंवा लोकलचा, इथे असणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन कित्येक पुरुष स्त्रियांची छेडछाड सहजरि त्याकरीत असतात. परिणामी, अशावेळेला कायम त्यास्त्रीलाच दोषी ठरविलेजाते.जसे अशा गर्दीच्या डब्यात चढायचेच कशाला?, गर्दी म्हंटले की असे थोडेफार प्रकार घडणारच.

पण मग स्त्रियांसाठी गर्दी नसलेल्या गाड्या सोडल्या जातात का? कधी कधी परिस्थितीच अशी असते की, गर्दीतून प्रवास करणं भाग पडतं, अशा वेळी प्रवासच करू नये का?अशा या पुरुषी मानसिकतेच्या विरोधात उभे राहण्यासाठी कुटुंबातून, समाजातूनस्त्रीला प्रेरित करण्याऐवजी उलटा तिच्यावरच दबाव आणला जातो. लैंगिक अत्याचारा विरोधात कायदे आहेत, पण ते फक्त कागदावरचआहेत. या कायद्याची भीड अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या कोणत्याच पुरुषाला नसते.

दिल्लीतील आंदोलन कर्त्यांची घोषणाबाजी समाजाला हेच सांगू इच्छित आहे की, कायद्याचा धाक इतकाबळकट करा की, लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला त्याविषयी दहशत बसली पाहिजे. कोणत्याही मुलीचे आयुष्य आपण सहज उद्ध्वस्त करू शकतो, असा विचार त्यापुरुषाच्या मनात येण्यापेक्षा, मी जर त्यामुलीबरोबर गैरवर्तन केले तर माझेचआयुष्य उद्ध्वस्त होईल, असा विचार त्या पुरुषाच्या मनात निर्माण होणं अपेक्षित आहे.यासाठी प्रशासना बरोबर समाजातही अपेक्षित बदल होणे गरजेचे आहे.

जिथेजिथे अंधारी जागा आहेत त्याठिकाणी सीसी टीव्ही व्यवस्था चालू स्थितीत ठेवणे, महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची गस्त ठेवणे. घरांघरातून, कुटुंबा-कुटुंबातून मुलीकडे मग तीघरातलीअसो वा परकीतिला आदरपूर्वक वागणूक देणे, ही शिकवण लहान पणा पासूनमुलग्यांनादेणे अपेक्षित आहे.फक्त गावातच नाही तर शहरांमध्ये देखील कित्येक घरांमध्ये स्त्रियांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. परिणामी लहानपणापासून घरातली बाई म्हणजे काय तर बिनडोक, मुले जन्माला घालण्याचे मशिन आणि घर कामासाठी हक्काचा नोकर अशीच महिलांकडे बघण्याची दृष्टी तयार केली जाते. ज्यावेळेला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा घरापासून, समाजापासूनआदराचा राहिल, त्यावेळेला परिस्थितीमध्ये बदल घडू शकतो अशी आशा धरायला हरकत नाही.