भारतीय वंशांच्या अमेरिकी नागरिक अरुणा मिलर यांची नुकतीच अमेरिकेतील मेरिलँड राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवड झाली आहे. अमेरिकेचं उपराष्ट्राध्यक्षपद भारतीय वंशाच्या कमला हॅरिस समर्थपणे सांभाळत आहेत. त्यानंतर आता मेरिलँड राज्याच्या महत्त्वाच्या पदावर ५७ वर्षीय मिलर यांची निवड होणे ही, मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाची पावती आहे. दरम्यान, वेस मोर यांची गव्हर्नरपदी निवड झाली आहे. मेरिलँडचे पहिले कृष्णवर्णीय गव्हर्नर होत त्यांनी इतिहास रचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेन्टॉरशिप : सुप्रिया सुळे -‘उत्तम ते सर्वोत्तम’ या प्रवासात लाभले अनेक मेन्टॉर्स!

“लोकशाहीत मतदानाद्वारे एक लहान पण प्रभावशाली राज्य काय करू शकतं, हे मेरिलँडने देशाला दाखवून दिलं आहे. या राज्यातील जनतेनं फाळणीपेक्षा ऐक्य निवडलं, अधिकारांवर बंधनं घालण्यापेक्षा त्या अधिकारांच्या विस्ताराचा स्वीकार केला, या जनतेनं भीतीऐवजी आशा बाळगली”, अशा भावना राज्याच्या जनतेचे आभार मानताना मिलर यांनी व्यक्त केल्या आहेत.

मासिक पाळी दरम्यान ‘या’ चुका टाळाच; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

जन्म, बालपण आणि शिक्षण

अरुणा मिलर यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९६४ साली हैदराबादमध्ये झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत याच शहरात मिलर यांचं बालपण गेलं. त्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील पघिकपसी शहरात स्थायिक झालं. याच शहरात ‘आयबीएम’ या कंपनीत त्यांच्या वडिलांनी मॅकेनिकल अभियंता म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. अपस्टेट न्यूयॉर्क (Upstate New York) आणि मिसुरी राज्यातील बॉलवीन (Ballwin) या शहरात अरुणा यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मिसुरी विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये पदवी संपादन केली. अरुणा यांनी डेव्हिड मिलर यांच्याशी लग्न केलं. या दाम्पत्याला तीन मुली आहेत.

यशस्विनी : ‘ती’चे रूग्णांना सहाय्यकारी संशोधन (उत्तरार्ध)

मिलर यांचं राजकारणात पदार्पण

कॅलिफोर्निया, व्हर्जिनिया आणि हवाई या राज्यांमध्ये मिलर यांनी स्थानिक सरकारमध्ये वाहतूक अभियंता म्हणून काही वर्ष काम केलं. त्यानंतर १९९० मध्ये त्या मेरिलँड राज्यात परतल्या. या ठिकाणी ‘मॉन्टगोमेरी काउंटी डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन’मध्ये त्या काम करू लागल्या. अभियंता म्हणून करिअरची सुरुवात केल्यानंतर सामाजिक क्षेत्रातील त्यांची रुची दिसून येत होती. २००० साली अमेरिकेचं नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केलं. त्यानंतर राजकारणात पदार्पण केल्यानंतर त्यांनी विविध पदं भुषवली. २०१० ते २०१८ या काळात त्यांनी ‘मेरीलँड हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’मध्ये १५ जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व केलं. २०१८ साली झालेल्या संसदेच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर पदासाठी मिलर यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उमेदवारी जाहीर केली. ही निवडणूक जिंकून त्यांनी इतिहास रचला.

हिंदूत्ववादी असल्याचा आरोप

निधी संकलनासाठी हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अरुणा यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन त्या हिंदूत्ववादी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. देणगीच्या नोंदी आणि त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे त्यांचे हिंदूत्ववाद्यांशी असलेल्या संबंधांकडे टीकाकारांनी लक्ष वेधलं होतं.

G-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने लिंगसमानतेला महत्त्व द्यावे – ‘यूएन विमेन’ची अपेक्षा

लेफ्टनंट गव्हर्नरची भूमिका काय आहे?

अमेरिकेतील राज्यात गव्हर्नरनंतर दुसरं सर्वोच्च पद लेफ्टनंट गव्हर्नरचं आहे. गव्हर्नरच्या अनुपस्थितीत लेफ्टनंट गव्हर्नर त्यांची भूमिका बजावतात. गव्हर्नर यांचा मृत्यू, राजीनामा किंवा त्यांना पदावरुन काढून टाकल्याची परिस्थिती उद्भवल्यास त्यांच्या जागी लेफ्टनंट गव्हर्नर कारभार सांभाळतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian american aruna miller becomes lieutenant governor of maryland in america life journey explained rvs
First published on: 11-11-2022 at 11:05 IST