आराधना जोशी
मुलांचे मूलभूत अधिकार आणि त्यातही मुलींच्या अधिकाराबाबत आपल्याकडे फारशी जागरुकता नाही. मुळात अधिकार, हक्क मिळण्यासाठी तिने जन्म घेण्याची गरज असते. पण आजही भारतातल्या अनेक भागांमध्ये मुलीला जन्माला येण्याचा अधिकारच हिरावून घेतला जातो. स्त्रीभ्रूण हत्येवर कायद्याने बंदी असूनही अनेक छुप्या पद्धतीने मुलीला जन्माला घालण्यावर निर्बंध घातले जातात. यातूनही समजा तो गर्भ वाढून मुलगी जन्माला आलीच तरी मुलगा – मुलगी भेदाभेद, दडपशाही, विटंबना तिच्या वाट्याला येते. आरोग्य, शिक्षण आणि प्रगतीच्या संधी तिच्यापासून हिरावून घेतल्या जातात. पितृसत्ताक समाजव्यवस्थेत होणाऱ्या संभाव्य अत्याचार आणि लैंगिक भेदाभेदीमुळे ४७% मुलींचे वयाच्या १८ वर्षांआधीच लग्न लावून दिलं जातं. अशावेळी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपरिपक्व असणाऱ्या या मुलींवर जर गर्भारपण लादलं गेलं तर अनेकदा या कुपोषणग्रस्त मुली कुपोषित मुलांना जन्म देतात.
Premium
भारतात मुलींचे हक्क, अधिकारांबाबत उदासीनता! ‘तिचे’ हिंसाचार, कुपोषण, बलात्काराच्या घटनांमधून कसे होईल संरक्षण?
युनिसेफच्याच एका अहवालानुसार जगभरात दर १० मिनिटांनी एका अल्पवयीन मुलीला हिंसाचाराला बळी पडावं लागतं. मारहाण, लग्न, छेडछाड, बलात्कार, अपहरण, वेश्या व्यवसायात ढकलले जाणं यापैकी कोणत्यातरी एका हिंसाचाराचा तिला सामना करावा लागतो.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
मुंबई
Updated: या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-01-2024 at 15:51 IST
मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indifference about the rights and rights of girls in india how will her be protected from incidents of violence malnutrition rape sgk