इंडिगोने बुधवारी महिला प्रवाशांसाठी त्यांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी विशेष उपक्रमाची घोषणा केली. इंडिगोच्या महिला प्रवाशांना आता वेब चेक-इनच्या वेळी इतर महिला फ्लायर्सने कोणत्या जागा प्री-बुक केल्या आहेत हे पाहू शकणार आहेत. या सोयीमुळे महिला प्रवाशांना त्यांची जागा त्यांच्या सोयीयानुसार निवडता येणार आहे. तसंच, सोयीनुसार इतर महिला प्रवाशांच्या बाजूचीही जागा बूक करता येणार आहे.

महिला प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी ही सुविधा मार्केट रिसर्चनंतर देण्यात येत असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. “आमच्या महिला प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर बनवण्याचे उद्दिष्ट असलेल्या नवीन वैशिष्ट्याची घोषणा करताना इंडिगोला अभिमान वाटतो. हे मार्केट रिसर्चच्या आधारे सादर केले गेले आहे. सध्या आमच्या #GirlPower अंतर्गत हा पायलट प्रोजेक्ट आहे”, असं एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.

mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
puneri pati viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

हेही वाचा >> कोणत्या वर्षी महिलांनी प्रवासी बसचालक क्षेत्रात पाऊल ठेवले? कोण होती जिल विनर जाणून घ्या….

एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना होणार फायदा

“आम्ही आमच्या सर्व प्रवाशांना अतुलनीय प्रवासाचा अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि हे नवीन वैशिष्ट्य हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही उचलत असलेल्या अनेक पावलांपैकी एक आहे”, असंही इंडिगोने पुढे स्पष्ट केलं. एकट्यानेच किंवा कौटुंबिक बुकींगसाठी हे वैशिष्ट्य महिला प्रवाशांसह पॅसेंजर नेम रेकॉर्ड (PNR) साठी तयार केले आहे.

सुरक्षित प्रवाशासाठी कंपनीचा निर्णय

गेल्या काही महिन्यांत महिलांशी संबंधित काही घटना समोर आल्या होत्या. एअर इंडियाच्या विमानातही एक धक्कादायक घटना घडली होती. एका पुरुष प्रवाशाने सहप्रवासी असलेल्या महिलेवर लघुशंका केली होती. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर त्याच्यावर कारवाईही करण्यात आली. इंडिगोमधील आणखी एका धक्कादायक घटनेत जुलै २०२३ मध्ये दिल्ली-मुंबई मार्गावर प्रवास करताना एका प्राध्यापकाने विमानातील एका डॉक्टरचा लैंगिक छळ केला, त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई-गुवाहाटी इंडिगो फ्लाइट दरम्यान एका महिलेचा छळ करण्यात आला. अशा घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे विमान कंपनीची प्रतिमा खराब होते. परिणामी कंपनीची प्रतिमा खराब होऊ नये आणि प्रवासी संख्या वाढू नये याकरता इंडिगोने हा निर्णय घेतला आहे