international womens day 2024 आज जागतिक महिला दिन, या निमित्ताने जगभरात सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचा गौरव होईल, त्यांचे गुणगान गायले जाईल, महिलांचे सत्कार- सोहळेही होतील. त्यांच्या सद्य:स्थितीविषयी जगभरात चर्चासत्रे होतील आणि महिलांच्या भविष्याविषयी चर्चादेखील. पण मग या निमित्ताने आपल्याला हे जाणून घेता येईल का की, या जगातील पहिली महिला किंवा आद्यमहिला कोण होती? त्याही बाबतच्या कथा- दंतकथा जगभरातील सर्वच संस्कृतींमध्ये अस्तित्वात आहेत. पण त्याचा कोणताही खात्रीशीर पुरावा नाही. अशा वेळेस पुरातत्त्वशास्त्र आपल्याला जगातील सर्वात प्राचीन आद्यमहिलेचे पुरावे देते. मृत्यू झाला त्यावेळेस ती पंचविशीची होती. आणि तिच्या जीवाश्माचे वय आहे तब्बल ३१ लाख ८० हजार वर्षे!

आणखी वाचा : Women’s Day 2023: प्रत्येक भारतीय महिलेला माहित असायला हवेत संविधानाने दिलेले ‘हे’ महत्त्वपूर्ण अधिकार

Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
LIC special plan for women print eco news
‘एलआयसी’ची महिलांसाठी विशेष योजना; मिळणार ७ हजार रुपये महिना मानधन
Sunayana won gold medal in womens bodybuilding competition
खेडेगावातून थेट जागतिक भरारी, महिला काँस्टेबलची वृत्ती करारी
nashik 25 year old woman hanged herself
जिल्हा रुग्णालय आवारात महिलेची आत्महत्या

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात या मानवाच्या खापर- खापर- खापरपणजीचा सर्वप्रथम शोध लागला तो इथिओपियात, १९७४ साली. अमेरिकन पुरामानवशास्त्रज्ञ डोनाल्ड जोहान्सन व फ्रेंच भूगर्भशास्त्रज्ञ मॉरीस तायेब यांना इथिओपियात अफार भागात सर्वेक्षण करत असताना हडार येथे होमिनिड मादीच्या ४० टक्के हाडांचा शोध लागला. म्हणजेच एकूण ४७ हाडे त्यांनी या सर्वेक्षणाच्या माध्यमातून गोळा करून कपीतर मानवाच्या परिवर्तनाचा झाकोळलेला इतिहास जगासमोर आणला. तिला ल्युसी असे नाव देण्यात आले. मानवाच्या पूर्वजांपैकी सर्वात प्राचीन माहिती असलेला पूर्वज म्हणून जगाला आता तिची ओळख आहे.

आणखी वाचा : Blogs : २३०० वर्षांपर्यंत मागे जातो ‘धाराशिव’चा पुरातत्त्वीय इतिहास!

मनुष्य प्राण्याची उत्पत्ती ही माकडापासून झाली हे आपल्यापैकी अनेकांना माहीत असते. हे अर्धसत्य प्रचलित असले तरी सर्वार्थाने ते सत्य नाही. आधुनिक मानवाचा समावेश ‘प्रायमेट’ या गटात होतो. या गटातील आढळणारा कपी हा उत्क्रांतीच्या कालक्रम गणनेमध्ये बरोबर मध्यभागी आहे. म्हणजेच माकड व मानवेतर कपी अशी संज्ञा अभ्यासक वापरतात. मूलतः मानवाचा विकास हा मर्कट व मानवसदृश प्राण्यांच्या सामाईक पूर्वजांपासून झाला. सुमारे तीन कोटी वर्षांपूर्वी सध्याच्या माकडे व कपी यांचे पूर्वज वेगवेगळे झाले. तर सध्याच्या मानव व कपी यांचे पूर्वज साधारण ८० लाख वर्षांपूर्वी वेगळे झाले. या वेगळ्या झालेल्या पूर्वजांचे प्रतिनिधित्व १९७४ साली सापडलेली होमिनिड मादी अर्थात ल्युसी करते. म्हणूनच अभ्यासकांनी संपूर्ण मानव जातीची खापरपणजी म्हणून तिचा गौरव केला.

आणखी वाचा : Womens Day 2023: महिलांना काय आवडत? ‘वूमन्स डे’ला गिफ्ट द्यायचं तर हे ७ भन्नाट पर्याय बघाच

ल्युसी हे नाव तत्कालीन प्रसिद्ध अमेरिकन ब्रॅण्ड बीटल्स यांच्या ‘ल्युसी इन स्काय विथ द डायमंड्स’ या तुफान लोकप्रिय गाण्यावरून देण्यात आले. ल्युसीचे जीवाश्म इथिओपियात सापडल्याने तिचे स्थानिक नामकरण ‘डिंकनेश’ असे करण्यात आले होते. ‘डिंकनेश’ म्हणजे सुंदर. यावरूनच इतिहासातील तिचे महत्त्व लक्षात येते. ल्युसी ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस या प्रजातीची होती. तिच्या जीवाश्मांचे वय ३१.८ लाख वर्षे इतके आहे. तिच्या हाडांच्या अभ्यासातून ती दोन पायांवर चालत असावी, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला. माकडांमध्ये अंगठा हा इतर बोटांच्या विरुद्ध दिशेला असतो,तो ल्युसी या होमिनिड मादीमध्ये आढळून येत नाही. अंगठा तिच्या बोटांमध्येच दिसून येणारा बदल हा ल्युसीची उत्क्रांतावस्था दाखवतो. तिच्या हाडांची रचना ही उत्क्रांतावस्था दर्शवणारी असली तरी तिच्या मागच्या पायांची रचना ही झाडांमध्ये वावरण्यासाठी सुयोग्य अशीच होती असे लक्षात येते.

आणखी वाचा : अंतर्वस्त्र निवडताना ‘Period Panties’ ला महिला देतायत प्राधान्य; कसा करायचा वापर? जाणून घ्या फायदे

ल्युसीचा मेंदू हा आकाराने लहान होता तर तिचे वजन २४ किलो इतकेच होते. ऐन तारुण्यात म्हणजेच वयाच्या पंचविशीत तिचा मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याच्याविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. सध्या नव्याने झालेल्या अभ्यासानुसार तिचा मृत्यू हा झाडावरून पडून झाल्याची शक्यता संशोधकांना वाटते आहे. तिच्या उपलब्ध हाडांमध्ये तिचा पंजा व डाव्या हाताचा खांदा दुखावल्याचेही लक्षात आले आहे. उपलब्ध पुराव्यांवरून तिचे हात लांब व मजबूत होते. तिच्या हाडांवरील खुणा असे सांगतात की, कोणत्याही प्राण्याकडून तिची शिकार झालेली नाही तर केवळ उंचावरून पडल्याने झालेल्या दुखापतीमध्ये तिचा मृत्यू झाला आहे. सध्या तिची हाडे इथिओयाची राजधानी हादरपासून जवळ अदिस अबाबा येथील नॅशनल मुझियममध्ये आहेत. तिची उंची साडेतीन फूट इतकी होती. दरम्यान, हादरजवळच असलेल्या डिकिका येथे मध्यंतरी एका बालकाचे जीवाश्म सापडले. हे डिकिका बालक म्हणून प्रसिद्ध आहे. काही जण त्याची ओळख ल्युसीचे बाळ म्हणूनही करतात. परंतु त्या दोघांमध्ये जवळपास वीस हजार वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे ते बाळ तिचे असण्याची तिळमात्रही शक्यता नाही.

Story img Loader