Kargil War Female Heroes : भारतीय सशस्त्र दलांनी दाखवलेल्या उल्लेखनीय धैर्य आणि शौर्यामुळे कारगिल युद्धाची इतिहासात नोंद झाली आहे. या संघर्षात अनेक जवान शहीद झाले. अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बलिदान दिले. तसंच, फ्लाईट लेफ्टनंट गुंजर सक्सेना आणि श्रीविद्या राजन या महिला वैमानिकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दोघीही पहिल्या महिला लढाऊ वैमानिक होत्या. या युद्धातील त्यांच्या शौर्यामुळे लष्करातील महिलांची वाट मोकळी झाली असं म्हटलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारगिल गर्ल – गुंजन सक्सेना

कारगिल गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात मोठा प्रभाव पाडला होता. शत्रूविरोधात महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्यांनी त्यांच्या धैर्याची चुणूक दाखवली. उंचावरील भूप्रदेश, थंड हवामान यासारखी अनेक भौगोलिक आव्हाने त्यांच्यासमोर होती. परंतु, अशा प्रतिकूल परिस्थितीतही गुंजन यांच्या उड्डाण कौशल्याचा या युद्धादरम्यान फायदा झाला. जखमी सैनिकांना युद्धभूमीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सक्रिय लढाऊ क्षेत्रांमध्ये प्रवेश करून जखमी जवानांना सुरक्षित एअरलिफ्ट करून त्यांना जीवदान देण्यासाठी गुंजन यांची ओळख आहे. त्यांच्या या जलद आणि धाडसी वृत्तीमुळे त्यांनी अनेकांचे जीव वाचवून त्यांचं मनोबल उंचावण्यास मदत केली. एवढंच नव्हे तर दुर्गम भागात दारुगोळा, अन्न आणि वैद्यकीय उपकरणे आदी अत्यावश्य वस्तूंचं वितरण करण्यासही मदत केली. त्यांच्या अफाट शौर्याबद्दल गुंजन सक्सेना यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आलं होतं. शौर्यासाठी सर्वोच्च लष्करी सन्मानांपैकी हे एक चक्र आहे. त्यांच्या एकूण कृती आणि वृत्तीमुळे या क्षेत्रात येणाऱ्या महिलांना वेगळीच प्रेरणा मिळाली आहे.

हेही वाचा >> Kargil Vijay Diwas: वीर जवान सलाम तुमच्या बलिदानाला! कारगिल विजय दिनानिमित्त Facebook आणि WhatsApp वर पाठवा ‘हे’ खास संदेश

गुंजन सक्सेना यांचा जन्म १९७५ सालचा असून त्या सध्या भारतीय हवाई दलात अधिकारीपदावर आहेत. १९६६ साली त्या भारतीय हवाई दलात सामील झाल्या होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन इतर महिलांना प्रोत्साहन देण्याकरता २०२० साली ‘गुंजन सक्सेना- दि कारगिल गर्ल’ या नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा >> Key Announcement for Women in Budget : नमो ड्रोन दीदी ते शक्ती मिशन; महिलांच्या प्रगतीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून निधीचा पाऊस!

श्रीविद्या राजन (Kargil War Female Heroes)

गुंजन सक्सेना यांच्याप्रमाणेच श्रीविद्या राजन यांनीही कारगिल युद्धात मोलाची भूमिका पार पाडली होती. कारगिल युद्धात आव्हानात्मक भूभागांवर असंख्य मोहिमा त्यांनी पार पाडल्या आहेत. त्यांची अचूक निरिक्षणशक्ती आणि बुद्धीमत्ता यामुळे त्या सैन्याच्या धोरणात्मक ऑपरेशन्समध्ये निर्णयाक भूमिका बजावत होत्या. यामुळे त्यांनी लष्करी कारवाईचे यशस्वी नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. लहरी हवामानाविरोधात श्रीविद्या यांनी असाधरण वैमानिक कौशल्य आणि शौर्य दाखवलं होतं. जखमी सैनिकांना बाहेर काढून त्यांना वेळेवर उपचार पोहोचवण्यात यांचाही हातभार होता. अत्यंत धोकादायक परिस्थितीत पुढाकार घेऊन सैनिकांना जीवदान देण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

श्रीविद्या राजन या केरळमधील एका लहानशा गावातून आल्या असून त्यांच्या आई शाळेत शिक्षिका होत्या. तर त्यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. त्यांच्या वडिलांनीच त्यांना सशस्त्र दलाचा भाग होण्यासाठी प्रेरित केले होते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kargil war female heroes who are gunjan saxena and sreevidya rajan indias first female combat pilots chdc sgk