करिअर ही काही पुरुषांची मक्तेदारी उरलेली नाहीच. महिलांसाठी करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेतच. त्यातले काही पर्याय पुढीलप्रमाणे असू शकतील का, याचा विचार चतुरांनी जरूर करावा.

१. उद्योजकता ( Entrepreneurship)
ज्या महिलांना सुरुवातीपासूनच आपला स्वतःचा व्ययसाय उभा करण्याची आवड आहे अशा महिलांसाठी उद्योजकता हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. प्रत्येक उद्योगासाठी घराबाहेर पडणेच गरजेचे असते असे नव्हे. काही उद्योग तुम्ही घर सांभाळून अथवा घरातूनही करू शकता. मात्र असा उद्योग कोणता याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. काळजी नसावी कारण इंटरनेट हात जोडून सगळी माहिती द्यायला बसलेलेच आहे. त्यामुळे अशाप्रकारे व्यवसाय नक्कीच करू शकतो. महिलांना त्यांच्या सोयीस्कर असलेल्या ठिकाणाहून आणि त्यांच्या वेळेनुसार काम करता येणार आहे. त्यामुळे व्यवसाय आणि कुटूंब या दोन्ही कामामध्ये समतोल राखता येणं शक्य आहे.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

तुमच्यासाठी हे एक नवीन आव्हानदेखील ठरू शकते. कारण यामध्ये प्रत्येक निर्णय हा तुमचा स्वतःचा असतो आणि तुमच्या सोबत काम करणारे तुमचे कर्मचारी हे त्यांच्या उपजीविकेसाठी तुमच्यावर अवलंबून असतात याद्वारे तुमचे समाजहिताचेदेखील काम होते. इतर कंपन्यांसाठी नफा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी, ते प्रयत्न स्वतःसाठी अधिक नफा कमावण्याच्या दिशेने का करू नयेत?

२. माहिती-तंत्रज्ञान (IT)
माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांची वाढ झपाझप होताना दिसतेय. या क्षेत्रात अनेकजणी कार्यरत आहेत. संगणक विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रात प्रमाणपत्र किंवा पदवी मिळवल्यानंतर तरुणी या क्षेत्रात करिअर करू शकतात. सर्व वयोगटातील महिलांसाठी अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सध्या या क्षेत्रामध्ये अनेक संधी तरुणींसाठी उपलब्ध आहे.

इंटरनेटवर काम करणे, सॉफ्टवेअर तसेच अॅप्स डिझाइन करणे, व्यवसायांसाठी ‘आयटी’ सोल्यूशन्स लागू करणे, सुरक्षा, गेमिंग, स्मार्टफोन्स या सर्व संधी या क्षेत्रात आहेत. हे आणखी एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही आपले कौशल्य दाखवून चांगले उत्पन्न मिळवू शकता. अर्थात या क्षेत्रात करिअर करायचे तर त्याचे योग्य ते ज्ञान अथवा प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.

३. औषध (Medicine)
मेडिसिन या क्षेत्रामध्ये तरुणींना अनेक संधी उपलब्ध आहेत जसे की, फार्मासिस्ट, सर्जन किंवा नर्स. वैद्यकीय क्षेत्रातील करिअर महिलांना यश आणि संपत्ती मिळवण्याची क्षमता प्रदान करते. शिवाय यामध्ये नोकरीची चांगली सुरक्षा आहे. एक समर्थ व्यावसायिक म्हणून, तुम्हाला नेहमीच जास्त मागणी असेल आणि एकदा तुम्ही महत्त्वपूर्ण कामाचा अनुभव प्राप्त केल्यानंतर, मागे वळून पाहण्याची गरज नाही.

४. अध्यापन (Teaching)
हे क्षेत्र महिलांसाठी नेहमीच अनुकूल मानले जाते. कारण यामध्ये महिलांना त्यांच्या कुटुंबियांसोबत पुरेसा वेळ घालवता येतो. तणावही थोडा कमी असतो. घर आणि कामाचा समतोल साधता येतो. अध्यापन क्षेत्रात असण्याचा सर्वात चांगला भाग म्हणजे मंदी असो किंवा नसो, तुमच्या कौशल्याला नेहमीच मागणी असेल. शिवाय उत्तम शिकवत असाल तर मानही मिळतो. उत्तम विद्यार्थी घडवण्याचे समाधान मिळते.

५. मानवबळ विकास (HUMAN RESOURCE)
कॉर्पोरेट जगतात काम करण्याची आणि संस्थात्मक समस्या सोडवण्यासाठी लोकांशी संवाद साधण्याची आवड असलेल्या महिलांसाठी हे क्षेत्र योग्य आहे.

नोकरीमध्ये उमेदवारांची शॉर्टलिस्ट करणे आणि मुलाखत घेणे, त्यांना नियुक्त करणे आणि प्रशिक्षण देणे, त्यांचे वेतन, फायदे आणि भत्ते निश्चित करणे, मूल्यांकन प्रणालीची रचना करणे, धोरणे आणि रजा संरचना तयार करणे, कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आणि विवादांचे निराकरण करणे हे या क्षेत्रामधील कामे आहे.

प्रत्येक मोठ्या संस्थेला पात्र आणि अनुभवी एचआर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते आणि त्यांनाही चांगले पैसे दिले जातात.

६. मानसशास्त्र (Psychology)
स्त्रियांसारखे प्रश्न कोणी सोडवू शकत नाही, असे म्हटले जाते. बहुतेक स्त्रिया चांगल्या निरीक्षक, सहानुभूतीशील श्रोत्या आणि उत्तम संवादक असतात. ही सर्व सॉफ्ट स्किल्स कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत असताना लक्षात घेतली जातात. ही कौशल्ये असलेली व्यक्ती मानसशास्त्रज्ञ किंवा थेरपिस्ट म्हणून उत्कृष्ट काम करू शकतात, असे म्हटले जाते.

या क्षेत्रातील करिअर तुम्हाला वेगवेगळ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्यांवर मात करण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना मदत करू देते. भरीव कामाच्या अनुभवासह, तुम्ही भरपूर पैसेदेखील मिळवू शकता.

७. गृहसजावट (Interior Design)
घराची अंतर्गत सजावट करण्यात स्त्रिया आघाडीवर असतात. अनेकजणी कोणतेही प्रशिक्षण न घेता आपल्या घरासाठी हे काम उत्तम पद्धतीने करत असतात. कारण त्यांच्याकडे ती सौंदर्यदृष्टी असते. कपाट किंवा वार्डरोबसाठी योग्य हँगर्स निवडण्यापासून ते सर्वात उत्कृष्ट लॅम्पशेड निवडण्यापर्यंत, घर सुंदर बनवण्यासाठी काय आवश्यक आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या या क्षमतेचा आणखी थोडा विस्तार करून, इतरांनाही त्यांचे घर सजवण्यात मदत करता येऊ शकते. त्याचबरोबर पैसेही मिळवता येऊ शकतात.
इंटिरिअर डिझायनर म्हणून आपला व्यवसायही करू शकता. नोकरी नको असेल तरी व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. उत्तम पैसे मिळवून देणारे क्षेत्र आहे हे.

८. प्रसारमाध्यमे (Media)
स्त्रियांचा आवाज आणि संवादाची एक साधारण पद्धत संवाद आणि संप्रेषणासाठी उत्तम असते. लोकांशी संवाद साधण्याची, संशोधन करण्याची आवड असेल, त्यांच्यासाठी प्रसारमाध्यमे हे एक उत्तम क्षेत्र आहे. सध्या सर्व कंपन्यांकडे सोशल मीडियाची खाती आहेत. ती उत्तम पद्धतीने चालवण्यासाठी त्यांना कुशल माणसांची गरज भासते. त्यामुळे प्राथमिक विपणन आणि पीआर विभागांव्यतिरिक्त या समाजमाध्यम व्यवस्थापनातही करिअरची संधी आहे. लेखन, जाहिरात, जनसंपर्क, पत्रकारिता, फोटोग्राफी मीडियामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

संधी अनेक आहेत आणि असतीलही. पण, गरज असते आपल्यासाठी योग्य संधी कोणती हे शोधण्याची आणि ती मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत करण्याची. ‘चतुरा’ अर्थातच हे सगळे करतील, याची अपेक्षा आहेच. तेव्हा शुभेच्छा!