थोडीशी थंडी सुरू होताच फॅशनप्रेमी ‘चतुरा’ खास हिवाळ्यात घालण्यासाठीचे कपडे आणि ॲक्सेसरीज् कधी आणि कशा वापरता येतील याचा विचार करून ठेवतात. अशीच आवर्जून हिवाळ्यात घातल्या जाणाऱ्या टी-शर्ट किंवा स्वेटरची फॅशन म्हणजे ‘टर्टल नेक’.

आणखी वाचा : ‘डंगरी’ आणि ‘बीनी’ची चलती!

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

नावाची मजा
या फॅशनला ‘टर्टल नेक’ का म्हणतात याचं उत्तरही त्याच्या नावातच आहे. गळ्यापाशी पुंगळीसारखी रचना असलेल्या- अर्थात ‘ट्युब्युलर नेकलाईन’ची दोन नावं तुम्ही कदाचित ऐकली असतील. ‘पोलो नेक’ आणि ‘टर्टल नेक’. मजा म्हणजे या दोन्ही फॅशन्स साधारण एकसारख्याच असतात. अमेरिकेत त्याला ‘टर्टल नेक’ म्हणतात, तर युनायटेड किंग्डममध्ये ‘पोलो नेक’ (इथे ‘पोलो नेक’ ही गळ्याची फॅशन आणि ‘पोलो शर्ट’ हा टी-शर्ट या फॅशन्सची गल्लत करू नका बरं! कारण त्या दोन्हीत मात्र काहीच साम्य नाही.) आपल्याकडे ट्युब्युलर नेकलाईनसाठी टर्टल नेक हेच नाव आता रूढ झालं आहे. या फॅशनमध्ये गळा आणि मान झाकली जात असल्यानं कासवानं मान कवचाच्या आत घ्यावी आणि बाहेर काढावी, ती उपमा त्याला देण्यात आली आहे.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : अनुभवांचं संचित हेच मेन्टॉर!

मटेरियल
सर्वसाधारणपणे टर्टल नेक हे स्वेटरच्या कापडात- म्हणजे वूलन- विणलेल्या कापडात पुलोव्हर प्रकारात मिळतात. परंतु आपल्याला थंडीत प्रत्येक वेळी स्वेटरची गरज भासेलच असं नाही, त्यामुळे थोड्याशा थंडीत वापरायची असेल तर पॉलिस्टरच्या, लांब बाह्यांच्या टर्टलनेक पुलोव्हर टी-शर्टच्या रूपात ही फॅशन परिधान करता येते. हे पॉलिस्टरचं मटेरिअल वूलन फील देणारं, काहीसं उबदार आणि ‘रिब्ड टेक्स्चर’ असलेलं असतं.

आणखी वाचा : तो’ Metrosexual आहे म्हणजे… अशी मुलं ज्यांना स्त्रियांचे…

अशी करता येईल टर्टल नेकची फॅशन
संध्याकाळी किंवा रात्री फिरायला जाताना, प्रवास करताना टर्टल नेक टी-शर्ट किंवा स्वेटर छान मिरवता येतात. हल्ली स्लीव्हलेस टर्टल नेक टी-शर्ट्स आणि स्लीव्हलेस टर्टल नेक क्रॉपटॉप्सचीही चलती दिसते आहे. स्लीव्हलेस असल्यानं त्यांचा थंडीच्या दृष्टीनं काही उपयोग होत नाही, परंतु ते ‘यंग’ आणि ‘कॅज्युअल’ लूक देत असल्यानं मुलींची त्यांना पसंती दिसते.
लांब बाह्यांचे टर्टल नेक टी-शर्ट वा स्वेटर साध्या जीन्सवर छान दिसतातच, पण आणखी काही पद्धतीनं त्यांची फॅशन करायची असेल, तर त्याबद्दल वेगवेगळ्या फॅशनतज्ञांनी काय सांगून ठेवलंय, ते पाहू या.

आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

ऑफिसवेअरसाठी
– ट्राऊझर आणि त्याला सूट होणारं फॉर्मल जॅकेट किंवा ब्लेझर याबरोबर टर्टल नेक टी-शर्ट खूप छान दिसतो. हल्ली अनेक क्षेत्रांमध्ये ऑफिसेसमध्ये कायम ‘फॉर्मल’च कपडे वापरायला हवेत असा नियम नसतो. तिथे डेनिमचे कपडेही वापरले जातात. अशा वेळी रोजच्या जीन्सबरोबर टर्टल नेक टी-शर्ट घालून त्यावर डेनिमचं किंवा इतर कुठलंही कम्फर्टेबल जॅकेट घालून लूक पूर्ण करता येईल.

आणखी वाचा : प्रिन्सेस डायनाच्या दुर्मिळ शिल्पकृतीचा होणार लिलाव, किंमत तब्बल…

‘कॅज्युअल वेअर’साठी
– स्कर्टवर टर्टल नेक
गुडघ्यापर्यंतच्या किंवा मिडी वा मिनी स्कर्टवरही टर्टल नेक छान दिसतो. यात स्कर्ट जर ‘फ्लेअर्ड’ प्रकारचा असेल, तर वरचा टर्टल नेक अंगाबरोबर बसणारा असावा, असं बहुतेक फॅशनतज्ञ सुचवतात. स्कर्ट घट्ट फिटिंगचा किंवा अंगाबरोबर बसणारा- म्हणजे ‘ए-लाईन’ किंवा ‘पेन्सिल’ स्कर्ट असेल, तर टर्टल नेक थोडा ‘ओव्हरसाईज्ड’ म्हणजे घोळदार चांगला दिसेल, असं सांगितलं जातं.
– जीन्सवर टर्टल नेक
जीन्सवर टर्टल नेक टी-शर्ट ‘इन’ करून त्यावर थंडीसाठीचा ओव्हरसाईज्ड कोट घालणंही फॅशनमध्ये आहे.
– टर्टल नेकची थोडी ‘अनयूज्वल’ अशी फॅशन हल्ली दिसते, त्यात जीन्सवर टर्टलनेक घालून त्यावर आणखी एक पूर्ण बाह्यांचा, कॉलरचा कॉटन शर्ट घातलेला असतो. यात टर्टल नेकचा केवळ नेकच वर घातलेल्या शर्टमधून दिसून येतो. ही फॅशन ऐकायला जरा विचित्र वाटली, तरी ती काही सेलिब्रिटी लोकांकडून केलेली बघायला मिळाली आहे. कदाचित परदेशातल्या अती थंडीवरचा हा फॅशनेबल उपाय असावा.