एखाद्या उंच कड्याच्या टोकाला एखादे झाड वाढावे व ते दरीच्या बाजूला कललेले असावे तशी कास्केड ही रचना असते. आपली कल्पकता व निसर्ग निरीक्षण यातून आपण हा प्रकार साध्य करू शकतो.
यातलाच कमी झुकाव दाखवणारा प्रकार म्हणजे सेमी कास्केड. ट्वीन ट्रंक या प्रकारात एकाच मूळ संस्थेतून दोन खोडे तयार केली जातात. यात एक खोड उंच तर दुसरे थोडे लहान असते. या पद्धतीत बोन्साय फार भरीव, आकर्षक आणि कमालीचे नैसर्गिक वाटते. सुरुवातीपासूनच काळजी घेत प्रयत्न पूर्वक ही रचना साधावी लागते, पण एकदा जमली की मात्र फक्त आवश्यक तेवढी छाटणी करत ती टिकवून ठेवता येते.
बोन्साय तयार करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याची जमवाजमव केली की मुख्य बांधणीला सुरुवात करावी. आपण निवडलेल्या झाडानुसार, त्याच्या आकार प्रकारानुसार बोन्साय कशा पद्धतीचे हवे ते ठरवावे लागते.
फॉर्मल अपराईट, इन्फॉर्मल अपराईट, स्लँटिंग, कास्केड, सेमी कास्केड, ट्वीन ट्रंक, मल्टिपल ट्रंक असे बोन्सायचे बरेच प्रकार आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपण झाडाला योग्य तो आकार देत त्यांच्या वाढीला दिशा देऊ शकतो. झाडाला वळण देण्यासाठी तारेचा उपयोग होतो. ही तार नेहमी तांब्याचीच असावी, जेणेकरून ती वापरणं, तसंच काढणं ही सोपं होतं. लोखंडी तारांना गंज लागतो आणि लोखंडी तार झाडाच्या खोडात किंवा फांदीत रुतून तिला इजा होते.
त्यामुळे आवश्यकतेनुसार लागणाऱ्या कमी अधिक जाडीच्या तांब्याच्या तारांचा वापर करावा.
फॉर्मल अपराईट या प्रकारात झाडं जसे निसर्गतः वाढते, म्हणजे जमिनीत मुळांचा पसारा व जमिनीवर दोन्ही दिशेला वाढणाऱ्या प्रमाणशीर फांद्या आणि आभाळाकडे निघालेला शेंडा या प्रकारे आपण त्याला आकार देऊ शकतो.
रोपाला आकार देतं, तारा गुंडाळत आपण फॉर्मल अपराईट म्हणजेच सरळ उभ्या पद्धतीने झाडाला दिशा द्यायची असते. यातला दुसरा प्रकार म्हणजे इन्फार्मल अपराईट. यात झाडं एका दिशेनं झुकलेलं, वक्राकार अशी खोडाची वाढ झालेले असे असते. अर्थात तारांच्या मदतीने आपण हा प्रकार साधू शकतो. तिरपे म्हणजेच स्लांटिंग या प्रकारात झाडं संपूर्णपणे एका बाजूला तिरपे वाढते. या त्याच्या तिरप्या वाढीमुळे त्याची मुळे त्याचा भार सहन करतात. फांद्या एका बाजूला तिरप्या वाढतात आणि त्याच्या विरुद्ध बाजूला मजबूत मुळांचा पसारा असतो ही रचना खूपच सुंदर दिसते.
एखाद्या उंच कड्याच्या टोकाला एखादे झाड वाढावे व ते दरीच्या बाजूला कललेले असावे तशी कास्केड ही रचना असते. आपली कल्पकता व निसर्ग निरीक्षण यातून आपण हा प्रकार साध्य करू शकतो.
यातलाच कमी झुकाव दाखवणारा प्रकार म्हणजे सेमी कास्केड. ट्वीन ट्रंक या प्रकारात एकाच मूळ संस्थेतून दोन खोडे तयार केली जातात. यात एक खोड उंच तर दुसरे थोडे लहान असते. या पद्धतीत बोन्साय फार भरीव, आकर्षक आणि कमालीचे नैसर्गिक वाटते. सुरुवातीपासूनच काळजी घेत प्रयत्न पूर्वक ही रचना साधावी लागते, पण एकदा जमली की मात्र फक्त आवश्यक तेवढी छाटणी करत ती टिकवून ठेवता येते.
मल्टीपल ट्रंक प्रकारात अनेक खोडे एकाच मुळांच्या पसाऱ्यातून आकार घेतात. हा प्रकार फारच सुंदर दिसतो आणि सांभाळणं ही सोपं असतं. या व्यतिरिक्त रॉक स्टाईल, ब्रुम स्टाईल असे इतरही बरेच प्रकार बोन्सायमध्ये आहेत. नावावरूनच त्यांच्या रचनेचा अंदाज येतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर निसर्गात डौलाने वाढणारे विविध वृक्ष अवलोकून, त्यांच्या वाढीचा अभ्यास करून या पद्धती ठरवल्या गेल्या आहेत. असे आकार आपल्या कुंडीत वाढणाऱ्या झाडाला देणं हे खरं कौशल्य आहे. बोन्सायला आकार दिला तरी तो आकार टिकवून ठेवणं यासाठी थोडी मेहनत करावी लागते. वेळोवेळी छाटणी करणे, झाडावर पडणाऱ्या रोगांची माहिती करून घेत त्यानुसार औषध फवारणी करणे याही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बोन्साय हा छोट्या कुंडीत मोठा आभास निर्माण करणारा प्रकार असल्याने रोपांची सुदृढ वाढ होणे आवश्यक असते, त्यामुळेच पुरेसं सेंद्रिय खत, योग्य तेवढं पाणी योग्य सूर्य प्रकाश याचं गणित जुळवावं लागतं. थोडक्यात काय तर, नैसर्गिक अधिवासातील वृक्षांना, कृत्रिम पद्धतीने नैसर्गिक आकारात साकार करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बोन्साय किंवा वामन वृक्ष कला.
mythreye.kjkelkar@gmail.com