“मानसी, मी काय सांगते आहे त्याचा नीट विचार कर. तुला अवंतीला खूप मोठ्ठं करायचं, ती करिअरमध्ये टॉपर राहावी असं तुला वाटतंय. तू त्यासाठी प्रयत्नही करते आहेस, पण तिच्या वर्तनातील बदल लक्षात घे. तिला आत्ता मानसिक उपचारांची गरज आहे. तिला काहीही झालं नाही असं म्हणत तू वास्तव स्वीकारत नाही आहेस. मानसोपचार घेतल्यामुळे समाजात तिच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघितलं जाईल असं तुला वाटतंय. पण ते चुकीचं आहे. तुझी आधी मानसिक तयारी कर आणि तिला डॉक्टरांकडे घेऊन जा.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुषमा मानसीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होती, पण काही केल्या आपल्या मुलीमध्ये काही कमतरता आहे, हे मान्य करायलाच ती तयार होत नव्हती. “सुषमा अगं, तिला खरंच काही झालं नाहीये. मी तिची आई आहे. मला तिचा स्वभाव माहिती आहे. ती मनातलं काही बोलत नाही. शांत राहते, त्यामुळं तिची थोडी घुसमट होते. दडपण येतं. त्यावेळी ती काहीच करू शकत नाही. एरव्ही ती नॉर्मल असते आणि आता मी तिच्यासाठी एक व्रत करते आहे. त्याची सांगता झाली की तिला नक्की बरं वाटेल. उगीचंच डॉक्टरांकडे जाण्याची काहीच गरज नाहीये.” मानसी बोलत असतानाच मंदार आला आणि म्हणाला,
“सुषमा, मी अवंतीला नक्की मानसोपचारतज्ञाकडं घेऊन जाईन. इतकी हुशार आणि बुद्धिमान मुलगी असूनही तिला काय झालं असेल?”
“ मंदार अरे, हा एक आजार आहे. आपल्याला खोकला,सर्दी-पडसं होतं तेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊन औषध उपचार करतोच ना? तसंच या मानसिक आजारावरही औषध आहेत. या आजाराचं निदान झालं, की काही उपचार आणि समुपदेशनांतर व्यक्ती पूर्ववत होऊ शकते.”
“सुषमा, पण हा मानसिक आजार आहे हे कसं ओळखायचं?”
“आपण अवंतीच्या बाबतीत विचार केला तर ती सध्या खूप चिडचिड करते. ती कुणाच्यातही मिसळत नाही. घरातही बोलत नाही. शून्यात पाहात बसते. कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेत नाही. ती रात्र-रात्र जागी असते. तिचं वागणं आणि बोलणं बदललं आहे. कदाचित तिला चिंता किंवा नैराश्याचा आजार झाला असण्याची शक्यता आहे.”
“पण हे असं अचानक कसं होतं?” मानसीनं विचारलं
“मंदार आणि मानसी, हे अचानक घडत नाही. आपण लहानपणापासून मनात काही भावना दाबून ठेवलेल्या असतात. मोठं झाल्यावरही त्याचे पडसाद आपल्या मनावर उमटत असतात. त्या भावना नियंत्रित करणं काही व्यक्तींना जमतं तर काहींना आजिबात जमतं नाही. आयुष्यातील काही बदलांमुळे या भावना पुन्हा उफाळून येतात आणि त्याचा त्रास व्हायला सुरुवात होते.”
हेही वाचा >>>स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
“अवंतीला मी लहानपणापासून ओळखते. ती लहान असताना अवखळ, थोडी भांडखोर होती. सोसायटीमधून आणि शाळेमधून ‘ती फार बडबड करते’ म्हणून तक्रारी यायच्या. स्वतःच्या मनासारखं झालं नाही तर हट्ट करून, रडून ती आपल्या मनासारखं करवून घेत असे. त्या तिच्या अस्सल व नैसर्गिक भावना होत्या. जशी ती मोठी होत गेली तसं तिला तुम्ही दोघांनीही वळण लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच समाजात स्वीकृत वर्तन कसं असतं त्याचे धडे देत गेलात. ‘मुलगी आहेस ना? असं भांडण, मारामारी मुलींनी करायची नसते. ‘मोठी झालीस, आता हट्टीपणा बंद. शहाण्यासारखं वागायचं.’ ,‘स्वतःच्या मनातील सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात नाहीतर आपली फसवणूकही होऊ शकते,’ अशा सारख्या गोष्टी ऐकून तिने स्वतःमध्ये बदल केला. भावना व्यक्त करण्याची तिची पद्धत तिने बदलली. राग आला तरी दाखवायचा नाही निराश व्हावं लागलं तरी चालेल, असं तिनं मनाला समजावलं. आलेला राग ती मनात साठवून ठेऊ लागली. व्यक्त होणं तिनं बंद केलं. कुणाशी तरी भांडून हट्ट करून ती मोकळी व्हायची. त्या तिच्या ‘रॅकेट फिलिंग’ होत्या. त्या तिनं मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवल्या. जेव्हा ती कॉलेजमध्ये गेली. हॉस्टेलमध्ये राहू लागली. सर्व निर्णय स्वतः घेण्याची वेळ आली तेव्हा तिची निर्णय क्षमता कमी पडत आहे. आई वडिलांपासून, सुरक्षित वातावरणापासून दूर राहण्याची पहिलीच वेळ, त्यामुळे त्या नव्या वातावरणात सामावून घेताना तिला त्रास होत आहे. स्वतःच्या भावना कशा नियंत्रित करायच्या हे तिला माहीत नाहीये, पण या सर्व गोष्टीतून तिला बाहेर काढण्यासाठी योग्य उपचार करणं महत्वाचं आहे. तिला वेळीच उपचार मिळाले नाहीत तर तिचा आजार वाढू शकतो.”
मानसिक आजाराबाबत व त्याच्या निदानाबाबत मंदार आणि मानसी यांनी सुषमाचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं. अवंतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा न करता तिच्या वर्तनाचं निदान होणं आणि तिच्यावर वेळेवर उपचार होणं महत्वाचं आहे हे दोघांनीही ठरवलं.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)