“तुझ्यासाठी कितीही केलं तरी तुला त्याची काही किंमतच नाही.”
“काय केलंस माझ्यासाठी? घरातील सर्व खर्च करणं, बायकोची काळजी घेणं, आणि कधीतरी गिफ़्ट देणं हे सगळेच नवरे करतात. त्यात काय मोठ्ठं?
“माझी आज महत्त्वाची मीटिंग होती, मी कामात खूप बिझी होतो. तरीही मी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ साठी आठवणीनं तुझ्यासाठी गिफ्ट मागवलं, पण तुला त्याची जाण नाही. कितीही केलं तरी तुझं समाधानच होत नाही.”
“बायकोचं समाधान नक्की कशात असतं हे तुला कळलं असतं तर बरं झालं असतं.”
“हो. मला काही कळतच नाही. मी मूर्खच आहे. जाऊ दे. कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी नेहमी मीच चुकीचा ठरतो. मी आत्ता घरात न थांबलेलेच बरं.” असं म्हणून नितेश गाडीची चावी घेऊन घराबाहेर पडला.

आणखी वाचा : नातेसंबंध: एकत्र राहून कोंडमारा होतोय?

actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Wife killed her husband, woman kills husband with wood
प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यात वाद; पतीचा खून
husband threw acid on wife, Amravati,
दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे, अखेर पतीने चक्क ॲसिड…
Guy went to marry for the second time without getting divorced first wife creates ruckus in marriage hall video goes viral
नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल
Wife vs. Girlfriend: Men’s spending habits explored in new research
Wife vs. mistress: पत्नी की प्रेयसी? पुरुष जास्त पैसे कोणावर खर्च करतात? संशोधन काय सांगते?

नितेश आणि नम्रतामध्ये आज पुन्हा वाद झाले. हल्ली हे अशा प्रकारचे वाद होण्याचं प्रमाण जास्त वाढलं होतं. अनिताताई सगळं बघत होत्या. मुलांच्या भांडणात कधीही पडायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं त्यामुळे त्या कधीच त्यात लक्ष घालत नसत. पण आज डोक्यात राग घालून नितेश बाहेर पडला होता आणि नम्रताचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. अशा वेळेला दोघांनाही काही गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे, असं त्यांना वाटलं. त्या नम्रताच्या रूममध्ये गेल्या. नम्रता रडत बसली होती. त्या दोघींमध्ये सासू-सुनांपेक्षा मैत्रिणीचं नातं अधिक चांगलं होतं, म्हणून त्यांनीच जवळ जाऊन तिचा हात हातात घेतला आणि तिला विचारलं, “नम्रता, नक्की काय झालंय? कसलं वाईट वाटतंय तुला? नितेश तुला काही त्रास देतोय का?”

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : घरातले लोक असं का वागतात?

“नाही हो आई, तो मला काहीच त्रास देत नाही, त्याचं माझ्यावर खरंच प्रेम आहे हे कळतंय मला, पण मी आनंदी नाही एवढं मात्र नक्की. आता कालचंच पाहा ना, ‘व्हॅलेंटाइन्स डे’साठी त्यानं मला महागडं गिफ़्ट ऑनलाइन मागवलं, पण त्यापेक्षाही मला त्याचा वेळ, त्याचा सहवास हवा होता. दोघांनीच कुठंतरी लाँग ड्राइव्हला जावं, मनातलं साठलेलं सगळं मनमोकळं बोलावं असं मला वाटत होतं, पण त्याच्या कामातून थोडाही वेळ तो माझ्यासाठी काढत नाही, मला केवळ अशी गिफ्ट नको आहेत.”

“पण बेटा, तुझ्या मनात काय आहे, हे त्याला कसं कळणार? सगळ्या गोष्टी न सांगता त्याला समजाव्यात अशी तुझी अपेक्षा आहे, पण सर्वांनाच हे प्रत्येक वेळी जमतं असं नाही. अशा वेळी मनातील इच्छा व्यक्त करायला काय हरकत आहे? तुझं म्हणणं अगदी रास्त आहे, पण व्यक्त होताना तू त्याच्यावर रागावून बोललीस, त्यामुळं तो दुखावला गेला. त्याने दिलेल्या गिफ्टमागे त्याच्याही काही भावना असतील, त्याही समजावून घेणं, त्याची प्रशंसा करणं आणि मग आपला मुद्दा मांडणं महत्त्वाचं होतं, त्याच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्याही लक्षात घ्यायला हव्यात. तुमच्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे, एकमेकांसाठी काहीतरी करावं असंही वाटतं, पण ते करताना आपल्या जोडीदाराचं मन वाचणंही आवश्यक आहे, म्हणजे दोघांना त्रास होणार नाही.”

आणखी वाचा : मूत्रविसर्जनाबाबत खास स्त्रियांसाठीच्या सहा चांगल्या सवयी..

“तुमचं खरंय आई, मी एवढं रिॲक्ट व्हायला नको होतं, माझी चिडचिड कमी करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. माझ्या रागावण्यामुळे आहे त्या क्षणाचा आनंद घेणंही मी विसरून गेले होते. त्यामुळे ना त्याला आनंद मिळाला आणि ना मला. घरातील वातावरण मात्र बिघडलं.”
“तुला समजलं ना, मग आता कसं वागायचं ते आपणच ठरवायचं, घरातील वातावरण शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.”

अनिताताई नम्रताशी बोलत असतानाच दरवाजाची बेल वाजली. नितेश परतला होता. अनिता ताई त्याच्यासाठी पाणी घेऊन आल्या. आज त्यांच्याशीही बोलणं गरजेचं होतं. “घे, एवढं ग्लासभर पाणी पिऊन शांत बस बर आधी, असा डोक्यात राग घालून बाहेर निघून जाणं योग्य नाही. बसून प्रश्न सोडवायचे, एकमेकांशी बोलून मार्ग काढायचा.”
“आई, अगं ती मला समजूनच घेत नाही.”
“दोघांनी एकमेकांना समजावून घ्यायला नको का?”
“पण मी काहीही केलं तरी ती वेगळेच अर्थ काढते.”
“कारण दोघांनाही वाटतं, जोडीदारानं आपल्याला समजून घ्यावं. माझं मन ओळखून वागावं, पण आपल्यालाही दुसऱ्याच्या मनाचा विचार करायला हवा ना, तू नम्रतासाठी गिफ़्ट मागवलंस, पण तिला नक्की काय हवंय याचा विचार केला नाहीस. तुला चांगलं माहिती आहे, जेव्हा तू तिच्यासाठी वेळ काढतोस, तिला बाहेर घेऊन जातोस तेव्हा ती अधिक खूश असते. तुमच्या लग्नाला आता दोन वर्षं पूर्ण होतील. आपला जोडीदार केव्हा खूश होतो, केव्हा नाराज होतो, केव्हा चिडचिड करतो याचा अंदाज आपल्याला येतो आणि तो यायलाच हवा आणि त्या पद्धतीनं आपण मोल्ड होणंही गरजेचं असतं. प्रत्येकाची ‘लव्ह बँक’वेगळी असते, ती समजून घ्यायला हवी.”

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : जोडिदाराच्या भावनांचीही कदर व्हावी

“पण आपला जोडीदार आपल्याला समजून घेत नसेल तर काय करायचं?”
“सुरुवात स्वतःपासून करायची, त्यानं समजून घ्यावं मग मी घेईन, अशी अपेक्षा ठेवायची नाही.”
अनिताताईंच्या समजून सांगण्यानं दोघांनाही समजलं की संसार म्हणजे त्याग असतो, तडजोड असते आणि एकमेकांना खऱ्या अर्थानं समजून घेणं असतं. एकमेकांना गुणदोषांसहित स्वीकारणं असतं. त्या दोघांनाही आपल्या चुका मनोमन कळल्या असाव्यात कारण संध्याकाळी नितेश टूरवर जाण्यासाठी सुट्टीचे प्लॅनिंग करत होता आणि नम्रता त्याने दिलेल्या गिफ़्टचं कौतुक आईला सांगत होती. ते बघून अनिताताई समाधानानं हसल्या.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

Story img Loader