“मे आय कम इन मॅम?”
“यस. प्लीज कम.”
“मॅम, मी अनघा.”
“अरे, अनघा तू? ये ना, अगं कित्ती दिवसांनी आलीस. ये, ये.”
“मॅम, मला प्रमोशन मिळालं म्हणून तुम्हाला भेटायला आले. माझ्या गुरू आहात तुम्ही, तुम्ही मला शिकवलंत, अगदी बारावीपासून मी कोणत्या क्षेत्रात जावं यासाठी सतत मार्गदर्शन केलंत, मला घडवलंत म्हणून मी हे यश मिळवू शकले.” अनघा ही सुषमा मॅमच्या सायन्स कोचिंग क्लासमधील आवडती विद्यार्थिनी. तिला इतर मुलींपेक्षा वेगळं काही तरी करायचं होतं आणि खरोखरच तिनं ते करूनही दाखवलं. आज ‘एअर इंडिया’मधील नोकरीमध्ये तिला वरच्या पदावरची बढती मिळाली होती. सुषमा मॅमने तिचं भरभरून कौतुक केलं.
“अनघा, तुझं खूप खूप अभिनंदन, पण आता संसारात पुढचं प्रमोशन केव्हा घेणार आहेस?”

आणखी वाचा : य़शस्विनी : २१ हजार फूट उंचीवर लिंगभेदाला मूठमाती… कशी, ते जाणून घ्या !

heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

“मॅडम, संसारातील प्रमोशन म्हणजे? माझ्या काही लक्षात आलं नाही.”
“अगं, तुझ्या आणि आनंदच्या संसारात तू सध्या पत्नीची भूमिका निभावते आहेस, पण आईची भूमिका केव्हा करणार? म्हणजे आता पुढचा विचार केव्हा करणार.”
“मॅम मला वाटलं नव्हतं, की तुम्हीही हा प्रश्न मला विचाराल. गेले काही दिवस माझे आई-वडील, सासू-सासरे आणि नातेवाईक यांनी हाच प्रश्न विचारून मला भंडावून सोडलं आहे. संसारात यशस्वी होणं म्हणजे मूलबाळ होणं आणि आई होणं एवढंच आहे का?”
“अनघा, तुझ्या लग्नाला पाच वर्षं झाली आहेत, तुझं वय आता ३३ वर्षे आहे, आता किती दिवस वाट बघणार आहेस? काही गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हव्यात. तसं तुझ्याबाबतीत उशीरच झाला आहे, पण तुझं ध्येय पूर्ण केल्याशिवाय तू मुलांच्या बाबतीत विचार करणार नाहीस हे मी जाणून होते, पण आता तुला हव्या त्या पदावर तू पोहोचली आहेस, मग विचार करायला काय हरकत आहे?”
“मॅम, मला हा विचार करायचाच नाहीये.”
“म्हणजे काय?”

आणखी वाचा : …तर काळजी नसावी!

“म्हणजे, मला मुलं नकोत. आताशी कुठं माझं करिअर सुरू झालंय, आता मी काही आव्हानात्मक काम सुरू करणार आहे. माझ्या क्षेत्रात मी पुढं पुढं जाणार आहे. मग ती अडचण कशाला? प्रेग्नेन्सी म्हटलं की कामावर बंधनं आली. नंतर लहान मूल, त्याची जबाबदारी म्हणून कामावर बंधनं, शिवाय मला त्या कारणासाठी कदाचित वरच्या पदासाठी डावलले जाणार. माझ्या करिअरमध्ये अडचणी येणार, माझी इतक्या वर्षांची मेहनत वाया जाईल आणि म्हणूनच तो विचारच मी करणार नाहीये. माझं कोणीही समजून घेत नाही, किमान तुम्ही तरी माझी बाजू समजून घ्या.”
अनघा आपली बाजू सुषमा मॅमसमोर मांडत होती. तिला मूल नको आहे आणि पुढच्या करिअरच्या दृष्टीनं ते कसं योग्य आहे हे पटवून देण्याचा ती प्रयत्न करीत होती. खरं तर आनंदला स्वतःचं मूल हवं होतं, त्यानं अनघाला अनेक वेळा या गोष्टीबाबत विचार करण्याची विनंती केली होती, पण तुला मूल हवं असेल तर आपण दत्तक घेऊ असं तिचं म्हणणं होतं.
सुषमाताईंनी तिचं सर्व ऐकून घेतलं. एक स्त्री करिअरमध्ये मुलांच्या जबाबदारीमुळे मागे पडते यामध्ये काही बाबतीत तथ्य असलं तरी त्यासाठी मुलंच होऊ न देणं हा पर्याय होऊच शकत नाही हेच तिला समजावून सांगण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या.

आणखी वाचा : ‘वर्क फ्रॉम होम’ची संधी शोधताय? घरबसल्या ‘या’ कामातून मिळवू शकता बक्कळ पैसे

“अनघा, मुलं होऊ देणं हे निसर्गाने स्त्रीवर टाकलं असलं तरी ते सांभाळण्याची, वाढवण्याची जबाबदारी दोघांची आणि कुटुंबीयांचीसुद्धा असते, त्यामुळे सर्व जबाबदारी तुझ्यावरच असेल ही मनातील भीती तू काढून टाक. तू इतकी यशस्वी आहेस. नोकरीवर तुला टीम करता येते तर घरीही सपोर्ट सिस्टीम तयार करता येईल आणि सासू-सासरे, आई-वडील यांची मदत तू घेऊ शकतेस. प्रेग्नेन्सीच्या काळात काही बंधनं तुझ्यावर नक्कीच असतील पण त्यासाठी तुझं करिअर थांबेल, मागे पडेल असा विचार तू का करतेस? तो तुझ्या पुढील भविष्यासाठी घेतलेला एक पॉज असेल. करिअर हा आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असला तरी ते संपूर्ण आयुष्य नाही. कारण काही वर्षांनंतर त्यालाही कुठं तरी स्टॉप आहेच, त्यामुळे आयुष्यात करिअरव्यतिरिक्त साध्य करण्याच्या काही गोष्टी असतातच त्याचाही विचार करायला नको का? करिअरमधील यशस्वीता आणि आयुष्यातील समाधान याची कुठं तरी सांगड घालणं गरजेचं असतं याचा विचार कर. फक्त करिअरसाठी तू तुझ्या स्त्रीसुलभ भावनांचा बळी देऊ नकोस. एक नवीन जीव जन्माला घालणं, आई होणं यातील आनंद वेगळाच असतो. घरामधील त्या लहानग्याच्या इवल्याशा पावलांचं दुडुदुडु धावणं, बोबड्या बोलांनी आपल्याला साद घालणं, त्याच्यासोबत खेळणं यामध्ये आपलं बालपण आपण पुन्हा अनुभवत असतो. आपण कामावरून दमून आल्यानंतर त्यांचा हसरा चेहरा पाहून त्यांचे बालिश हट्ट पुरवताना आपले ताणतणाव सहज निघून जातात. एक चैतन्यमय आणि उत्साही वातावरण घरात असते. त्याच्या आगमनामुळे पतीपत्नीमधील नातंही अधिक घट्ट होतं. व्यावसायिक आयुष्याबरोबर व्यक्तिगत आयुष्याचा विचार करणंही महत्त्वाचं आहे.”
“मॅम, माझं करिअर आणि व्यक्तिगत आयुष्य या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, पण मी त्या एकत्र करीत होते. तुमचं म्हणणं पटतंय मला, मी याचा जरूर विचार करेन, पण आता तर पेढे घ्या.”

आणखी वाचा : Urfi Javed तुला लागली कोणाची ‘उर्फी’…!

“येस, नक्कीच ही गोड बातमी आहेच त्यामुळे मी पेढे नक्की घेणार, पण यापेक्षाही स्वीट असणाऱ्या बातमीची वाट पाहणार आहे.”
आता मात्र अनघा चक्क लाजली आणि एक उच्च पदस्थ करिअरिस्ट अधिकारी असूनही तिच्यातील स्त्रीसुलभ भावना जागृत झाली.
(लेखिका विवाह समुपदेशक आहेत.)
(smitajoshi606@gmail.com)