हल्ली धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपलं खाण्यापिण्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. त्यामुळे अनेकदा पोटाच्या तक्रारीही उद्भवतात. पोटाच्या तक्रारींमुळे शरीराचं चक्रच बिघडतं. काय खावं काय खाऊ नये यासाठी अनेक सल्ले दिले जातात. पण पोटाचे त्रास (Digestion Problems) असतील तर एक अगदी साधा सोपा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे.

हेही वाचा- घर आणि करिअर : सोनाली कुलकर्णी – मला सांभाळणारी माझी माणसं

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
1 in every 10 women in the world lives in extreme poverty
प्रत्येकी १० पैकी एका महिलेचं आयुष्य अत्यंत गरिबीत, युएन वुमेनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

महिलांना अनेकदा पोटाच्या तक्रारी अधिक असतात. कारण बहुतांश महिलांचा वेळ घरामध्येच चार भिंतींच्या आत जातो. अशा वेळेस त्यांच्यासाठी घरगुती उपाय खूप महत्त्वाचे ठरू शकतात. पोटाच्या तक्रारी आणि वाताच्या तक्रारी महिलांमध्ये सर्वाधिक असतात. या दोन्ही त्रासांवर काळे मीठ अगदी योग्य उपाय आहे. आपल्या आहारात रोज काळ्या मीठाचा वापर केल्यास पोटाच्या तक्रारी तर दूर होतातच पण वाताचा त्रास असेल तर तोही कमी होण्यास मदत होते.

वातदोषामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे मग गॅसेस, बध्दकोष्ठता, अपचन, पोटदुखी, ॲसिडीटी असे त्रास सुरु होतात. पोटाच्या सगळ्या तक्रारींवर काळे मीठ गुणकारी आहे, असं आयुर्वेदातील तज्ज्ञ सांगतात. आपल्या पांढऱ्या मिठापेक्षाही काळ्या मिठामध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असल्याने रोजच्या आहारातही याचा वापर फायदेशीर ठरतो. काळे मीठ (Black Salt) हे एक प्रकारचे खडे मीठ किंवा रॉक सॉल्ट आहे. यालाच सैंधव मीठ असेही म्हटले जाते. काळ्या मिठाचे हिमालयन सॉल्ट, पिंक सॉल्ट आणि रॉक सॉल्ट असे प्रकार मानले जातात. दक्षिण आशियामध्ये काळ्या मिठाचा भरपूर वापर केला जातो.

हेही वाचा- ‘अँटी एजिंग’ सौंदर्यप्रसाधनं कशी निवडाल?

काळ्या मिठाचे फायदे

१. काळे मीठ आणि कोमट पाणी-काळ्या मिठामध्ये आल्याचा एक छोटा चमचा रस मिसळा. हे मिश्रण कोमट पाण्याबरोबर सकाळ संध्याकाळ
प्या. कोमट पाण्याबरोबर काळे मीठ घेतल्यास पोटदुखी, गॅसेस, अपचन, ॲसिडीटीचा (Acidity) त्रास कमी होतो. कोमट पाण्यात लिंबाचा रस, पुदीन्याचा रस, मध घालून प्यायल्यास पोटदुखीचा त्रास दूर होतो.

२. ओवा आणि काळे मीठ- (Ajwain)

ओवा आणि काळे मीठ हा पोटदुखी दूर करण्याचा अगदी साधा उपाय आहे. ओवा तव्यावर थोडासा भाजून घ्या आणि त्यात काळे मीठ घाला. आता हे मिश्रण न चावता तसेच कोमट पाण्याबरोबर गिळून टाका. दिवसातून दोन वेळा हे मिश्रण घेतल्यास लवकर फरक पडू शकतो. प्रवासात असताना अनेकदा आपल्याला बाहेरचं खाल्यानं अपचनासारखे त्रास होतात. हे मिश्रण तयार करून एअरटाईट कंटेनरमध्ये सोबत घेऊ शकता.

३. काळे मीठ आणि लसणाचा रस- (Garlic)

पोटदुखीचा त्रास असेल तर लसूणाचा एक छोटा चमचा रस घ्या आणि त्यात चिमूटभर काळे मीठ टाकून तो रस प्या. रोज सकाळ संध्याकाळ लसणाचा रस आणि काळे मीठ घेतल्यास पोटदुखीचा त्रास थांबतो आणि गॅसेसची समस्याही दूर होते.

४. काळ्या मिठाचे चूर्ण

पोटात मुरडा येणे किंवा पोटदुखीचा सतत त्रास होत असेल तर त्यावर काळ्या मिठाचे नियमित सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. काळ्या मिठाचे चूर्णही तुम्ही तयार करून ठेवू शकता. यासाठी २ ग्रॅम सुंठ घ्या आणि त्यात २ ग्रॅम काळे मीठ, २ ग्रॅम हिंग पावडर घालून चूर्ण तयार करा. रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर हे चूर्ण घेतल्यास पचन चांगले होते. पचनक्रियाही सुधारते.

५ . काळे मीठ आणि हिंग

पोटात दुखत असल्यास २ ग्रॅम हिंग आणि २ ग्रॅम काळे मीठ एकत्र करा आणि त्यात मोहरीचे तेल घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट बेंबीच्या भोवती गोलाकार लावा. त्यामुळे पोटदुखी थांबेल. बध्दकोष्ठता दूर करण्यासाठीही याचा फायदा होतो.   याशिवाय हाय ब्लडप्रेशरच्या (High BP) रुग्णांसाठीही काळे मीठ अत्यंत फायदेशीर आहे. काळ्या मिठात सोडियमचं प्रमाण कमी असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. छातीमध्ये जळजळ होत असल्यास काळ्या मिठाचा वापर रोजच्या आहारात नक्की करावा. यामध्ये आयर्न (Iron) जास्त प्रमाणात आणि सोडिअम कमी प्रमाणात असते. त्यामुळे
जळजळ कमी होण्यास मदत होते. वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठीही काळे मीठ अत्यंत उपयुक्त आहे.

हेही वाचा- मसाल्याचा ‘हा’ पदार्थ पाळीच्या त्रासांवर आहे अत्यंत गुणकारी!

जेवणात सोडिअमचे (Sodium) प्रमाण जास्त असल्यास वजन वाढू शकते. पण काळ्या मिठात अँटी ओबेसिटी (AntiObesity) म्हणजेच लठ्ठपणाला प्रतिरोध करणारे गुण असतात असे संशोधनातून सिध्द झाले आहे. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. अर्थात त्याचबरोबर व्यायामही आवश्यक आहे. भाजी किंवा डाळीमध्ये रोजच्या पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. सॅलड्स, कोशिंबिरींमध्ये काळे मीठ भुरभुरल्यास त्याची चवही वाढते आणि फायदाही होतो. दहीवडा, भेळ,पाणीपुरी अशा चाटच्या पदार्थांमध्येही काळे मीठ वापरू शकता. पुदीन्याच्या चटणीत काळे मीठ घातल्यास त्याचा स्वादही वाढतो.

मात्र काळ्या मिठाचा अतिरेक केल्यास त्यानेही त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिवसभरात फक्त एक टेबलस्पूनच काळे मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात यासाठी तुम्ही तुमच्या आहारतज्ञांचा सल्ला घेणे जास्त योग्य. काळे मीठ जास्त काळ टिकवायचे असेल तर ते कोरडे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी ते एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. एकदम खूप जास्त खरेदी करण्यापेक्षा थोड्या प्रमाणात खरेदी करा म्हणजे साठवण्याचा त्रास होणार नाही. कशातही
मीठ घालताना कोरड्या स्वच्छ चमच्याचा वापर करा. इतर पदार्थांमधला किंवा ओलसर चमचा वापरल्यास काळे मीठ खराब होऊ शकते.

(शब्दांकन- केतकी जोशी)