अपर्णा देशपांडे

नात्यांशिवाय एकलकोंडं आयुष्य जगणं हा मनुष्याचा पिंडच नाही. असं असताना आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व आणि स्थान बोलून का दाखवतो? नात्यात सहजपणा असावा हे अगदी खरं… पण प्रत्येक वेळी तो तसा असतो का? ती सहजता टिकवावी म्हणूनही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात का? रक्ताची नाती बऱ्याचदा लादल्या का जातात? अनेकदा मैत्रीच्या नात्याला दुय्यम दर्जा का दिला जातो? एकदा दुभंगलेली नाती पुन्हा जोडता येतात की नाही? आजची तरुणाई या सगळ्या कंगोऱ्यांबद्दल काय विचार करते? कसा विचार करते? ते जाणून घेऊ या… दर मंगळवारी

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

आपली दुचाकी पार्क करून स्वरा घाईघाईत आत आली. तिला परीक्षेचे फॉर्म प्रिंटआऊट काढून, भरून पुन्हा स्कॅन प्रत मेल करायच्या होत्या. ती आत आली आणि तिचा चेहरा बदलला. आत बैठकीत आत्या आणि तिच्या सासरचे दोन जण बसले होते. आई लगबगीने सगळ्यांना गरम गरम पुऱ्या करून वाढत होती.

“आलीस स्वरू? चल पटकन आईला मदत कर बरं.” अगदी सहज अपेक्षेनं आत्या म्हणाली. “हो गं आत्या, नक्की केली असती मदत, पण मला तातडीने हे फॉर्म्स भरून द्यावे लागतील कारण परवाच शेवटची तारीख आहे. आणि आई, हे काय, तू चक्क सुट्टी दिलीस तुझ्या क्लासला? कूल राहात जा नं तू! बाहेरून ऑर्डर करायचं ना काहीतरी! मुलांचा अभ्यास बुडतो अशानं.” हे सगळं बोलताना स्वराचा स्वर सहज नव्हता…

आत्याला ते कदाचित आवडलं नसावं या भावनेनं आई अस्वस्थ झाली. तिनं स्वराच्या बोलण्याचा हेतू आत्याला समजावत वेळ सावरून नेली, पण सगळे गेल्यावर रात्री मात्र आई स्वरावर चिडली. स्वरा शांतपणे फॉर्म मेल करता करता म्हणाली, “चील मॉम! माझ्या माहितीनुसार आत्या आणि मंडळी रात्री येणार होती… ज्या वेळेस तुझ्या खासगी शिकवण्या पण संपलेल्या असतील… तू मोकळी असशील अशा वेळी. पण त्यांचा कार्यक्रम बदलला आणि न कळवता ते अचानक दुपारी चारलाच आले. तू पण अजिबात तक्रार न करता दोन बॅचना सुट्टी जाहीर केलीस. तसं लगेच व्हॉटस्अप ग्रुपवर कळवलं. हे असं वागणं मला नाही ‘झेपत’. तुझा स्वतःचा असा एक व्यवसाय आहे, ज्याचा आदर या ‘सो कॉल्ड’ नातेवाईकांनी ठेवायलाच हवा. कधीही कसे येऊ शकतात ते?”

“अगं, ही आत्या आणि ते आत्याच्या सासरचे लोक. असे नातेवाईक जपावे लागतात बाई! तुलाही जपायची आहेत नाती.” “मुळात इतकं जपून वागावं लागत असेल तर ते नातं जपायच्या लायकीचं नाही असं मी मानते. नात्यात एकमेकांचा सहज स्वीकार असावा ना? आणि ही नातं जपायची आवश्यकता एकाच बाजूने का? आत्याला नाही वाटलं, की आपले नातेवाईक असे अवेळी घेऊन जातोय तर वहिनीची खूप अडचण होईल म्हणून? आणि हे समजून घेण्याची कुवत नसलेली नाती जपायचीच कशाला? तू त्यांना स्पष्ट का नाही म्हणालीस की मला सुट्टी नाही देता येणार, तुम्ही बसा. आत्यानं बनवायचं काहीतरी… हे तिच्या भावाचंच घर ना? इतका पण मोकळेपणा नाही? तिचं माहेरचं नातं तिनं जपायला नको? मी असते तर तुला कामाला पाठवून स्वतः काहीतरी बनवून सगळ्यांना खाऊ घातलं असतं. सगळं एकतर्फीच का?” स्वरा भडाभडा बोलत होती. तिचं सगळंच म्हणणं चुकीचं नव्हतं…

आईला पटतही होतं, पण आईच्या दृष्टीने नाती जपण्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतात. मग ते आयुष्यभर एकतर्फी का असेनात! बदलत्या काळानुसार नात्यांमध्ये असलेलं अवघडलेपण कमी होतंय हे नक्की (कूल, यू नो!). हा बदल स्वागतार्ह आहे. पण जर सहजतेची मर्यादा ओलांडली गेली तर नात्यास अनादराचा दर्प नको यायला. ती काळजी दोहो बाजूने घेणे आवश्यक आहे, हे मात्र खरं

adaparnadeshpande@gmail.com