रसिका शिंदे

सणासुदीचे दिवस सुरु झालेत, उत्सवांचा उत्साह वातावरणात जाणवू लागला आहे. समृद्ध इतिहास, संस्कृती आणि वारसा यांची भूमी असलेल्या भारतात दागिन्यांना नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे. महिलांच्या दृष्टीने सणासुदीची खरी शोभा असते ती दागिन्यांमध्येच. सणांचा खरा उत्साह, आनंद द्विगुणित करण्याची किमया दागिने अतिशय लोभस पद्धतीने पार पाडतात. उत्साहाच्या आणि चैतन्याच्या वातावरणात सध्या आपण नवरात्र साजरी करत आहोत. नवरात्र म्हटलं की साज श्रृंगार आला आणि श्रृगांर म्हटला की डोळ्यांसमोर येते ती दागिन्यांनी नटलेली लाघवी स्री. स्रियांसाठीच्या खास उत्सवात अर्थात नवरात्रीत स्रिया नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे तर परिधान करतातच शिवाय त्यांचं सौदर्य खुलविणारे दाग-दागिने घालून दांडिया खेळत मनमुराद आनंदही लूटताना दिसतात. तसं, पाहायला गेलं तर स्रियांचं सौदर्य साध्या काजळानेही खुलतं. पण सण-उत्सवात कपडे, मेकअप जरी ठरलेला असला तरी कोणत्या कपड्यांवर कोणते दागिने घालावेत? हा प्रश्न स्रियांना सर्रास पडलेला असतो. तर या नवरात्रीत तुम्ही कोणते दागिने घालू शकता? बाजारात कोणत्या दागिन्यांचा ट्रेण्ड सुरु आहे? याबद्दल जाणून घेऊयात…

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

आणखी वाचा : Navratri 2022: असा करा गरबा-दांडियासाठी मेकअप

ऑक्सिडाईज दागिने

सध्या ऑक्सिडाईज दागिन्यांना जास्त मागणी असल्याने बाजारात मिळणारे प्लेन ऑक्सिडाईज चोकर, मोठ्या माळा, कानातले, अंगठ्या असा पूर्ण सेट तुम्ही घालू शकता. तर, काही ऑक्सिडाईज दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे दागिनेही बाजारात उपलब्ध आहेत ते  तुम्ही घालू शकता. तसेच, बाजारात टू इन वन म्हणजे गळ्यालगतचा ऑक्सिडाईज हार आणि मोठा हार असा एकत्रित सेट देखील मिळतो, तो ही तुम्ही नक्कीच वापरू शकता.

आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

एक ग्रॅम दागिने

उत्सवांच्या काळात शक्यतो महिला सोन्याचे दागिने घालत नाहीत. त्यामुळे नऊ दिवसांपैकी एका दिवशी तुम्ही खणाची किंवा मोठ्या बॉर्डरची साडी नेसलात तर त्यावर सोन्याच्या दागिन्यांऐवजी तुम्ही एक ग्रॅमचे दागिने घालू शकता. ज्यात तुम्ही गळ्यात ठूशी, किंवा मोठी माळ, कानात कुड्या किंवा झूमके आणि हातात तोडे असा लूक देखील ठेवू शकता.

आणखी वाचा : नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?

विविध रंगांच्या धाग्यापासून तयार केलेले दागिने

सध्या हॅण्डमेड दागिने वापरण्याचाही ट्रेण्ड आहे. त्यामुळे लाल, पिवळा, निळा, गुलाबी अशा विविध रंगाच्या धाग्यांपासून बनलेले चोकर, छोटे किंवा मोठे हार आणि त्यावर लावलेले खडे, किंवा शंखांचे तुकडे अशी ज्वेलरी देखील तुम्ही वापरू शकता. घागरा-चोळी तुम्ही घातली असेल तर हे दागिने तुमचं सौदर्यं आणखीनच खुलवू शकतात.

कमरपट्टा

बाजारात बारीक साखळीचे, जाड साखळीचे, काचा लावलेले कमरपट्टे उपलब्ध आहेत. तुम्ही स्कर्ट आणि टॉप घालणार असाल तर त्यावर कमरेला यापैकी एक कमरपट्टा तुम्ही लावू शकता. कानात मोठ्ठे कानातले, हातात बांगड्या आणि कमरपट्टा हा लूक तुम्हाला छान दिसेल यात शंकाच नाही.

काचेचे दागिने

नवरात्रीत जास्त प्रमाणात घागरा-चोळी, टॉप आणि स्कर्ट अशीच वेशभूषा करत असते. त्यामुळे नवरात्रीत काच लावेले किंवा मिररचे दागिने स्रियांचे खास लक्ष वेधून घेताना दिसतात. विविध रंगांच्या धाग्यांची गुंफण असणारे दागिनेही तुम्ही वापरू शकता. काचकाम असणारे कानातले, गळ्यातले हार, कपाळावरील बिंदी, बांगड्या तुम्ही वापरू शकता.