Shivsena’s First Women Minister Neelam Gorhe : राज्याच्या विधान परिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या असलेल्या नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने हा दर्जा मिळालेय त्या शिवसेनेच्या त्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या आहेत. दरम्यान, नीलम गोऱ्हे यांची राजकीय पार्श्वभूमी अशीच प्रेरणादायी आणि संघर्षमय राहिली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नीलम गोऱ्हे या पदापर्यंत कशा पोहोचल्या हे जाणून घेउयात.

पेशाने डॉक्टर असलेल्या नीलम गोऱ्हे यांची ओळख शिवसेनेतील फायर ब्रॅण्ड नेत्या अशी आहे. महिला आणि दलितांच्या प्रश्नासह अनेक मुद्द्यांवरून त्यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटाची बाजू लावून धरली होती. महिला आघाडीची तोफ नीलम गोऱ्हे यांनी कायम धडाडत ठेवली. परंतु, काही महिन्यांपूर्वी त्या शिंदे गटात सामील झाल्या, त्यामुळे त्यांचं उपसभापती पद धोक्यात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पक्षांतर केल्याचा दावा करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी विधान परिषदेत केली. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कायदेशीर बाजू स्पष्ट केली. त्यामुळे त्यांचं हे पद कायम राहिलं.

Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Assembly Election 2024 NCP Congress Ajit Pawar Group BJP Uddhav Thackeray Group
अजित पवार गटामुळे भाजपला गळती?
Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis, BJP, Congress, Anil Wadpalliwar, High Court, women s schemes, election strategy, Eknath Shinde, Nana Patole, Maharashtra politics,
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीच्या निशाण्यावर आलेले वडपल्लीवार आहेत तरी कोण ?
ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Women sugarcane, ladki bahin yojana,
५०० ते ६०० टन ऊस असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ; अजित पवार म्हणाले…

महिला चळवळींपुरती मर्यादित नव्हती चौकट

महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता नीलम गोऱ्हे यांनी १९७७ साली युवक क्रांती दलातून सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. परंतु, त्यांनी त्यांची चौकट केवळ महिला चळवळीपुरती मर्यादित ठेवली नाही. ऊसतोडणी कामगार, शोषित, मजूर, भूमीहीन दलित, मजुरांसाठीही त्यांनी चळवळ उभारली. ज्या काळात राजकारणात पुरुषी वातावरण होतं, त्या काळात नीलम गोऱ्हे यांनी आपली राजकीय कारकिर्द जोरात सुरू केली. त्यांनी लक्ष वेधलेल्या महिलांच्या प्रश्नांमुळे राजकारणाच्या पटलावर नवा अजेंडा निर्माण होत होता. महिलांचे प्रश्न सोडवण्याकरता समाजकारणासह राजकारणही गरजेचं असल्याचं त्यांना कळलं, म्हणून त्यांनी आपली राजकीय वाटचालही सुरू केली. महिलांचे प्रश्न, दलितांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी १९८७ साली रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला. राज्याच्या राजकारणात नीलम गोऱ्हेंचा झंझावात वाढत गेला. प्रखर महत्त्वाकांक्षा असलेलं निडर व्यक्तिमत्त्व नीलम गोऱ्हेंच्या रुपाने मिळत होतं. त्यातूनच, त्यांनी पुढे शिवसेनेची वाट निवडली.

हेही वाचा >> Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांना मिळाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा, ठरल्या शिवसेनेच्या पहिल्या महिला मंत्री!

शिवसेनेतील महिला आघाडी नीलम गोऱ्हेंनी मजबूत केली

बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसेना अशीच निडर आणि आक्रमक होती. त्यामुळे नीलम गोऱ्हेंच्या स्वभावाशी शिवसेनेचा स्वभाव जुळला. यातून नीलम गोऱ्हेंचं पक्षातील वर्चस्व वाढत गेलं. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न मांडले. शिवसेनेतील महिला आघाडी गोऱ्हेंनी मजबूत केली. गोऱ्हेंच्या कामाचा झंझावात पाहून त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आलं. २००२ साली त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्या. २००२ पासून विधान परिषदेच्या आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हे यांना २०१९ साली उपसभापती पदाची जबाबदारी मिळाली.

२०१९ साली बिनविरोध निवड

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती पदावर काँग्रेसनेही दावा केला होता. काँग्रेसकडून जोगेंद्र कवाडे यांचं नाव चर्चेत होतं. परंतु, या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली. त्यामुळे, नीलम गोऱ्हे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत त्या उपसभपाती आहे. उपसभापतीचं कर्तव्य बजावताना अत्यंत संवेदनशीलतेने अनेक प्रकरणे हाताळली आहे. त्यामुळे आता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने आगामी काळात त्यांच्यावर आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे.