या प्रयोगासाठी आपण जर अगदी नवखे असू तर फार खर्च करत न बसता घरातल्या सामानाचा वापर करून प्रयोगांना सुरुवात करावी. सगळ्यात पहिल्यांदा हे ठरवायचं की ही बाग गोलाकार हंडीत करायची आहे की चौकोनी पेटीतते ठरलं की त्यानुसार निवड करता येते. गोलाकार हंडी किंवा चौकोनी पेट्या या फिशरीच्या दुकानात किंवा मत्सालयाच्या दुकानात मिळतात. तिथून आपल्या आवडीप्रमाणे योग्य आकारमानाची हंडी किंवा पेटी आणायची. घरात एखादं आकर्षक काचेचं भांड असेल तर त्याचाही वापर करता येईल.

काचेच्या हंडीत जी बाग तयार केली जाते तिला टेरारियम असं म्हणतात. ही बाग सहज कुठेही हलवता येते. अतिशय कल्पकतेने जंगल, रान, डोंगर त्यावरील दृश्य, टेकडीवरील टुमदार घरं, हिरवळीने भरलेले उंच सखल प्रदेश अशा विविध रचना यात करता येतात. थोडी कल्पकता आणि निरीक्षण एवढ्या गोष्टी मात्र हव्यात. कारण ही अशी बाग तयार करताना मुळात जलचक्र, विविध अधिवासात होणारी वनस्पतींची वाढ, वनस्पतींची अन्न निर्मिती प्रक्रिया या गोष्टींचा अभ्यास हवा. या सगळ्यांची सांगड घालत, सौंदर्यदृष्टीचा वापर करत अशी बाग तयार करणं मग सोपं होतं.

स्त्री आरोग्य : लघवीच्या ठिकाणी खाजतंय? दुर्लक्ष करू नका 
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
secrecy in marriage
वैवाहिक नात्यातही गोपनीयता महत्त्वाची!
guests at home, diwali celebration, tips
दिवाळीत पाहुण्यांना घरी बोलावताय? या टीप्स नक्की लक्षात ठेवा…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Nisargalipi, Indoor-outdoor tree design, tree,
निसर्गलिपी : इनडोअर – आऊटडोअर झाडांची रचना
physical presence of couple not insist in mutual consent divorce madras high court
सहमतीने घटस्फोटाकरता प्रत्यक्ष हजेरी आवश्यक नाही
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

हेही वाचा : पाम कौर… ‘एचएसबीसी’च्या सीएफओ

या प्रयोगासाठी आपण जर अगदी नवखे असू तर फार खर्च करत न बसता घरातल्या सामानाचा वापर करून प्रयोगांना सुरुवात करावी. सगळ्यात पहिल्यांदा हे ठरवायचं की ही बाग गोलाकार हंडीत करायची आहे की चौकोनी पेटीतते ठरलं की त्यानुसार निवड करता येते. गोलाकार हंडी किंवा चौकोनी पेट्या या फिशरीच्या दुकानात किंवा मत्सालयाच्या दुकानात मिळतात. तिथून आपल्या आवडीप्रमाणे योग्य आकारमानाची हंडी किंवा पेटी आणायची. घरात एखादं आकर्षक काचेचं भांड असेल तर त्याचाही वापर करता येईल. अगदीच काही नसेल तर आकर्षक ग्लास निवडून त्यातसुद्धा रचना करता येते, पण जे काही आपण निवडणार आहोत ते पारदर्शक काचेचं असणं आवश्यक आहे. पारदर्शकतेमुळे आपली बाग चहूबाजूंनी पाहता येते. तिचं सौंदर्य अधिकच वाढतं.

टेरारियम हे बंद रचनेच्या रूपातही करता येतं आणि खुल्या रूपातही. आपली बाग जर बंद स्वरूपात म्हणजे क्लोज टेरारियम स्वरूपात तयार करायची असेल तर मात्र जास्तीची काळजी घ्यावी लागते. खुल्या स्वरूपात करताना त्यामानाने बदल करायला बराच वाव असतो. या बागेची सतत काळजी घेणं महत्त्वाचं असतं. एकदा रचना केली आणि मग ती आपली आपण वाढत राहिलं असं होतं नाही. सातत्याने तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं. ज्या रोपांची वाढ जोमदार होतेय त्यांना वेळोवेळी आकार देऊन बागेचं सौंदर्य टिकवून ठेवावं लागतं. खुरटी, निस्तेज रोपं काढून बदलावी लागतात.हंडीतील तापमान, पाण्याची मात्रा यांचं प्रमाणही नेमकं लागतं. एवढी काळजी घ्यायची तर हे नाजूक साजूक काम करायचंच का? असा प्रश्न तुम्हाला सहज पडेल. पण खरं तर ही बाग म्हणजे एक जिवंत निसर्ग कविता आहे. या कवितेचा आनंद प्रत्येक बाग प्रेमी ने घ्यायला हवाच.

हेही वाचा : दिवाळीत पाहुण्यांना घरी बोलावताय? या टीप्स नक्की लक्षात ठेवा…

कुठेही सहज मांडता येईल, हलवता येईल अशी ही बाग आहे. हिला भरपूर जागा, प्रखर सूर्यप्रकाश अशा गोष्टींंची बिलकुल गरज नसते. घरातील सेंटर टेबलवर, स्टडीत, खिडकीतील एखाद्या कोपऱ्यात आपली ही रचना सुखाने नांदू शकते. टेरारियम ही कला आहे. हिला लिव्हिंग आर्ट असंही आपण म्हणू शकतो. टेरारियमचं प्रशिक्षण घ्यावं लागतं, महागड्या गोष्टी, टूल्स खरेदी करावी लागतात असं मुळीच नाही.

बाजारात मिळणाऱ्या टेरारियमच्या टूल्सचा उपयोग नक्कीच होतो, आपलं काम सोपं होतं, पण ती नसतील तर अडत मात्र नाही. टूथब्रश, लांब दांड्यांचे चमचे, डिसेक्शन बॉक्स मधील फोरसेप अशा घरात सापडणाऱ्या साधनांचा वापर यासाठी करता येतो. थोडक्यात काय तर हा प्रयोग करताना घरातील सामान वापरून सुरुवात करायची. हळूहळू प्रयोगाने आपल्याला अनेक गोष्टी कळून येतात. एकदा यात यश येऊ लागलं की अशा बागा सहज तयार करून आपण भेट म्हणून देऊ शकतो. अगदी स्वतः चा व्यवसायही सुरू करू शकतो. टेरारियम तयार करून देणं, टेरारियम लायब्ररी चालवणं अशा सारख्या स्वरूपात आपण आपली आवड जोपासत उत्पन्नाचं साधनही निर्माण करू शकतो.

हंडीतील बाग तयार करताना तुम्ही जर पूर्णपणे नवखे असाल तर उपलब्ध साहित्यातून प्रयोगाला सुरुवात करणं केव्हाही श्रेयस्कर. घरातील एखादा काचेचा ग्लास, बरणी, रिकामा फिश टॅंक, छोटी गोलाकार हंडी, रूंद तोंडाची जुनी काचेची बाटली, काचेचा बाऊल असं साहित्य यासाठी वापरता येईल. साधनं म्हणून लाकडी चमचे,फोरसेप, ओव्हनमधील ग्रील करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीक, टूथब्रश असं साहित्य हाताशी ठेवावं.

हेही वाचा : स्त्री आरोग्य : लघवीच्या ठिकाणी खाजतंय? दुर्लक्ष करू नका 

इतकी प्राथमिक तयारी झाली की सजावटीचं साहित्य एकत्र करावं. यासाठी वेगवेगळ्या रंगांचे, आकाराचे दगड, फरशीचे तुकडे, जांभ्या दगडाचे तुकडे, गारगोटीचे दगड, नदीतील छोटे गोटे असं सामान जमा करून ठेवायचं. रचनेनुसार त्याचा वापर करायचा. काच पात्रातील बाग तयार करताना पुढचा टप्पा म्हणजे माती. याला लागणारी माती फार काळजीपूर्वक तयार करावी लागते. तसेच झाडांची निवडही यात महत्त्वाची ठरते. या सगळ्याची आपण सविस्तर माहिती घेऊच. तोवर तुम्ही या नवीन बागेच्या साहित्याची जुळवाजुळव करून ठेवा.

mythreye.kjkelkar@gmail.com

Story img Loader