एकंदर पंधरा एक रंगछटा असलेले कुमुदिनीचे प्रकार जमा झाल्यावर बागेला एक प्रकारची शोभा आली. आलटून पालटून यांना फुलं येत होती. त्यामुळे बागेला सदैव एक वेगळंच सौंदर्य मिळत असे. या कमोदिनी मी मोठ्या टब सारख्या फायबर ग्लासच्या कुंड्यांमध्ये लावल्या होत्या, पण लावताना एक काळजी घेतली होती. आपल्या नेहमीच्या मध्यम आकाराच्या कुंड्यांमध्ये एक रोप अशी लागवड केली होती. मग अशा दोनतीन कुंड्या एका टबमध्ये ठेवून टब पूर्ण पाण्याने भरला.

वॉटर लीली लावताना ही पद्धत फारच उपयुक्त ठरते. असं केल्यानं प्रत्येक रोप स्वतंत्रपणे वेगळं बाहेर काढून घेऊन त्यांच्याकडे लक्ष पुरवता येतं. कुंडीमधे झालेली जास्तीची वाढ कमी करून मुळांना पसरायला वाव मिळतो. याशिवाय जास्तीची रोपंही तयार करता येतात.

behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
Farmers Problem and Bail Pola 2024 Celebration News in Marathi
Bail Pola Festival 2024 : बैलांचा साज महागला, संकटग्रस्त शेतकऱ्यांमुळे पोळ्यावर निराशेचे सावट
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…

कुमुदिनी जरी बारा महिने बत्तीस काळ पाण्यामधे बुडालेल्या असल्या तरी या पाण्यावर एक वेगळ्याच प्रकारचा तवंग आलेला असतो. त्या तवंगामुळे यांच्या सौंदर्यात थोडी कमतरता येते. मग अशावेळी ताजं पाणी देताना हा तवंग उतू जाईल असं बघावं लागतं. आता हे टब आणि त्यातलं पाणी हे कितीही झालं तरी साचलेलं पाणीच होतं. त्यासाठी वेगळी काळजी घ्यावी लागत होती. मग यावर उपाय म्हणून यात गप्पी मासे सोडले. जेणेकरून डासांची अंडी ते फस्त करतील आणि पाणी स्वच्छ ठेवतील.

आणखी वाचा-प्रशिक्षणासाठी नकार ते वर्ल्ड रेकॉर्ड; जगज्जेत्या महिला बॉक्सरची अफलातून कहाणी

माझा आणि झाडांचा जरी जवळून संबंध असला तरी माशांचा आणि माझा दुरान्वयेही संबंध नव्हता. मासे खाणं तर सोडाच मच्छी बाजारही न पाहिलेली मी, जेव्हा कुंडात सोडायला म्हणून मासे घेऊन आले तेव्हा मनात अनेक प्रश्न होते. यांना फीश फूड द्यावं लागेल का? रोज पाणी बदलावं लागेल का? पाणी घालताना ओव्हरफ्लो झालं तर मासे वाहून तर जाणार नाहीत ना? असे अनेक प्रश्न होते, पण यांची उत्तरं आपोआपच मिळत गेली.

एकतर या खादाड गप्पींना मुळीच फिशफूड द्यावं लागलं नाही. टबामधील वनस्पतींच्या अवशेषांवर ते मजेत वाढत होते. उघड्या गच्चीवर टब असल्याने हवेतला ऑक्सिजन पाण्यात विरघळत असल्याने वेगळा ऑक्सिजन पुरवायची गरज नव्हती. पाणी घालताना हे हुशार मासे वॉटरलीलीच्या पानांत स्वतःला लपवून ठेवत त्यामुळे ते वाहून मुळीच जात नसतं. सगळे प्रश्न अगदीच कुचकामी ठरल्यावर मी बिनधास्तपणे गप्पींची फौज पाण्यात सोडली. आता रोजच्या रोज हाताने कचरा साफ करावा लागत नसे. पाणी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी गप्पींनी उचलली होती. पण दोन नवीन समस्या मात्र होत्या. एक म्हणजे शेवाळ आणि दुसरी समस्या होती ती गोगलगायींची.

आणखी वाचा-शिक्षण आणि खेळ यांचा मेळ साधणारी गोल्डन ‘गॅबी’

वॉटरलीली या उबदार पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आहेत. यांना उन फार मानवतं. उन्हात यांच्या वाढीबरोबरच शेवाळ भरपूर वाढतं. काही दिवसांनी या शेवाळामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन पाण्याला एक कुबट वास येऊ लागतो. या शेवाळाची वाढ होऊ लागली की लगेच ते दूर करणे आणि त्याला कंपोस्ट बीनमधे टाकणे हे मी सुरू केलं. गप्पी मासे आपल्यापरीने शेवाळ फस्त करत होतेच. दुसरा प्रश्न होता तो पाण-गोगलगायींचा. लहानपणी ‘गोगलगाय अन् पोटात पाय’ अशी म्हण ऐकली होती, पण इथे मात्र पूर्ण वैतागून गेले होते. अतिशय खादाड असणाऱ्या या गोगलगायी रोपांची पानं तर खात, पण फुलंही कुरतडत असतं.

मी जेव्हा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधे एम्एस्सीला शिकत होते तेव्हा इन्स्टिट्यूटची एक मोठी बाग होती. आमच्या फ्री लेक्चरमध्ये आम्हाला या बागेत गोगलगायी वेचायला पाठवलं जाई. एक मोठी टोपली घेऊन सर्वजण या गोगलगायी वेचत असू. इवल्या शंखांच्या आकारापासून आंब्या एवढ्या मोठ्या गोगलगायी तिथे असत. या खादाड मावश्या आमची एवढी मोठी बाग बघता बघता फस्त करत. त्यामुळे त्यांना नेमकं वेचून वेगळं करावं लागे. गोगलगायींचे ते रचून ठेवलेले ढीग बघताना या प्राण्याबद्दल मला वाटतं असलेलं एक हळवेपण मात्र संपुष्टात आलं होतं.

आणखी वाचा-विरोध करणाऱ्यांनी आज घेतले डोक्यावर! आजोबांच्या भक्कम साथीने झाल्या आयएएस अधिकारी; वाचा प्रिया राणी यांचा संघर्षमय प्रवास

इथे समस्या होती ती पाण -गोगलगायींची. पूर्व अनुभवाने प्रत्येक तळ्यातून मी यांना वेचायला सुरुवात केली. पण यांची संख्या मात्र काही कमी होईना. थोडं निरीक्षण केल्यावर दिसून आलं की हिरव्यागार पानांच्या मागे यांची मुबलक प्रजा अंडी आणि अळ्यांच्या रूपात वाढत असते. असं गच्च वस्तीचं पानं जर खुडल नाही तर यांच्या प्रजेला आवर घातला येत नाही. मग मी अशी पानं शोधू लागले. ती वेळीच खुडून वेगळी करू लागले. या प्रयोगात थोडंफार यश आलं. पण हे सगळं करताना या वॉटर लिलींच्या एक- एक नवीनच गोष्टी कळत गेल्या. नकळतच माझं निसर्ग शिक्षण झालं. वनस्पती आणि भोवताल यांचं एक वेगळंच नातं असतं आणि ते हळूहळू समजून घ्यायचं असतं हा नवा धडा मी शिकले.

mythreye.kjkelkar@gmail.com