प्रिय आमची Mumbai Local,

पावसाळा सुरू झाला अन् माझ्या मनात एकदम धस्स झालं. कारण, माझ्या डोळ्यांसमोर ते सगळं लाईव्ह चित्र उभं राहिलं. ओल्याचिंब कपड्यांत, पोटावर बॅग अडकवून रेल्वे फलाटावरून वाकून वाकून तुझी वाट पाहणारी माझीच सावली मला दिसू लागली. मला माझं हे रुप दिसलं तरी रेल्वे प्रवास नको वाटतो. पण काय करणार? दोनवेळच्या अन्नासाठी तीस-चाळीस किलोमीटर प्रवास करावाच लागतो ना! हा त्रास असा वाढू नये म्हणून मी आज तुझ्यासाठी खास पत्रप्रपंच केला आहे.

Extension of 15 days for students to submit SEBC and Non Criminal Certificate
एसईबीसी व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
Nagpur orange, Nagpur famous orange, orange,
Nagpur orange : नागपूरच्या प्रसिद्ध संत्रीला बागेतच गळती
Badlapur Crime News
Badlapur sexual assault : “बदलापूरमधल्या शाळेने आरोपी कर्मचाऱ्याची माहिती तपासली नाही, सीसीटीव्हीही नाहीत, मग..” MSCPCR चे ताशेरे
Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?

तर, मी सरळ मुद्द्यावरच येते. पूर्वी तू (Mumbai Local) अगदीच वेळेत फलाटावर यायचीस अशातला भाग नाही. पण त्रागा होईल इतका वेळही लागायचा नाही तुला. हल्ली तू फारच उशिरा येतेस. अर्थात या उशिरा येण्याची तुझी नेहमीची कारणं फार वेगवेगळी असू शकतात. कधी ओव्हरहेड वायरच तुटते, कधी पावसामुळे तुला दिसायला कमी लागतं, कधी तुझे मोटरमनच संपावर जातात तर कधी कधी अगदी तुला सिग्नललाही फार वेळ थांबून राहावं लागतं. तुझ्या उशिरा येण्यामागे तुझी चुकी फार कमी असली तरीही आम्ही तुलाच बोल लावतो. कारण, जे सर्वांत जवळचं, प्रिय आणि आपलं असतं त्यालाच आपण हक्काने बोलू शकतो.

पावसाळा सुरू होऊन महिना झाला असेल. पण या महिन्यात तू (Mumbai Local) किती वेळा वेळेत फलाटावर आलीस याची गणती अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच होऊ शकते. परवा मैत्रिण सांगत होती, आधीच घरातून निघायला तिला उशीर झाला. तिची नेहमीची ट्रेन पकडावी म्हणून तिने घरातून निघताना नैसर्गिक विधीही आटोपला नाही. त्याच घाईत ती स्थानकावर आली. फलाटावर आल्यावर कळलं की ट्रेन अजून १५ ते २० मिनिटे उशिराने आहे. ट्रेन येईपर्यंत शौचालयात जावं तर शौचालय दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या टोकाला. तिथं जाऊन येईपर्यंत ट्रेन निघून गेली की पुन्हा अर्धा तास ट्रेन मिळायची नाही. ती बिचारी अशीच राहिली. तिची ठरलेली ट्रेन उशिरा का होईना, पण आली. त्या ट्रेनने ती तिच्या इच्छित स्थळी उतरली. तिथे उतरल्यावरही पुन्हा शौचालय दुसऱ्याच टोकाला. तिकडे जाऊन येईपर्यंत ऑफिसला जायला उशीर होईल म्हणून तिने थेट ऑफिसमध्ये जाऊनच कार्यक्रम उरकला. या मधल्या काळात तिने काय सहन केलं असेल हे महिला म्हणून आपण समजूच शकतो.

हेही वाचा >> हा तर महिलांचा अपमान! MumbaI Local मधील महिला प्रवाशांनी शरीरधर्म उरकण्यासाठी किती पायपीट करावी?

असे अनेक प्रसंग आहेत. कदाचित तुला याची जाणीव नसेल, पण तुझ्या वेळेत येण्याने आणि तुझ्या उशिरा येण्याने फार फरक पडत असतो. दर आठवड्याला प्रवाशांना वेठीस धरून मेगा ब्लॉक घेतला जातो खरा, पण त्याचा उपयोग काय असतो हे माझ्यासारख्या सामान्य प्रवाशाला अद्यापही कळलेलं नाही. भल्या पहाटे उठून, स्वयंपाक बनवून, मुलांच्या शाळेची तयारी करून निघेपर्यंत अर्धा जीव निघालेला असतो. आणि उरलेला अर्धा जीव तुझ्या प्रवासात जातो. त्यामुळे ऑफिसला जाऊन काम करण्यासाठी वेगळी उर्जाच शरीरात राहत नाही. नाही म्हणायला ट्रेनमधल्या मैत्रिणी असतात गप्पा मारून थकवा दूर करायला. पण तुला उशिर झाला की आम्हीही सर्व मैत्रिणी विखुरल्या जातो. जिला जी ट्रेन (Mumbai Local) मिळेल त्या ट्रेनला ती धावते आणि ऑफिस गाठायचा प्रयत्न करते. त्यामुळे धावपळीत मैत्रिणींबरोबर गप्पा माराव्या म्हटलं तरी ते शक्य होत नाही.

अवघ्या तीन महिन्यांची गरोदर असलेली माझी मैत्रीण परवा कल्याण स्थानकात आली. कल्याणहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये (Mumbai Local) बसायला मिळावं म्हणून ती लवकरच फलाटावर येऊन उभी राहते. पण तिची नेहमीची ट्रेन काही फलाटावर येईना. परिणामी गर्दी वाढत गेली. त्यामुळे धक्काबुक्की वाढत गेली. या गर्दीत तिचा जीव घाबरा-घुबरा झाला. त्यामुळे ऑफिसला पळणारी तिची पावलं अचानक घराच्या दिशेने पळू लागली आणि अशा अडनिड्या परिस्थिती स्वतःचा आणि पोटातल्या बाळाचा जीव धोक्यात टाकण्यापेक्षा तिनं नोकरीच सोडली. त्यामुळे तुझ्या उशिरा येण्याने फक्त ऑफिसला उशीरच होत नाही तर कधीकधी कामाचाच राजीनामा द्यावा लागतो. यामागचं गांभीर्य तुला कळत नसेल. पण आजच्या करिअर करणाऱ्या मुलींना याची फार बोच राहते गं मनात!

Mumbai Local मधून प्रवास करताना महिला प्रवाशांना अशी कसरत करावी लागते. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

रेल्वे प्रशासन काय करतंय, त्यांनी किती उपाययोजना आणल्या आहेत, अर्थसंकल्पात लोकलसाठी किती निधी दिलाय, स्टेशनवर वायफाय आहे की नाही, स्टेशनवर स्पा, ब्युटी पार्लर आहे की नाही, स्टेशनवरील शॉपिंग सेंटर्स याने माझ्यासारख्या सामान्य प्रवाशाला काहीही फरक पडत नाही. कारण, आमचं चाकावरचं आयुष्य आहे. घरातून निघाले की ऑफिस आणि ऑफिसमधून निघाले की घर इतकंच काय ते आमचं आणि स्टेशनचं नातं असतं. या काळात आम्ही कुठे स्पा सेंटर आणि शॉपिंग सेंटरमध्ये फिरणार आहोत? त्यामुळे या सुविधा देण्यापेक्षा आमची ट्रेन (Mumbai Local) वेळेत कशी येईल, याचा अभ्यास करा म्हणावं तुमच्या रेल्वे प्रशासनाला. कारण, ट्रेन उशिराने आल्याने ट्रेनमध्ये गर्दी वाढते. मुंगीही शिरणार नाही एवढ्युशा जागे महिला कधी पायाच्या बोटांवर तर कधी पायाच्या टाचांवर उभ्या राहतात. पावसामुळे लोकलचे स्टील गुळगुळीत झालेले असतात. त्यामुळे गर्दीत चुकून धक्का लागला तर गुळगुळीत स्टॅण्डवरून हात निसटतो नि थेट आपण रुळांखाली येतो. असे अनेक अपघात घडतात.

ही अवस्था फक्त पावसाळ्यातच होते, अशातला भाग नाही हं. वर्षातले १२ महिने आणि ३६५ दिवस कोणत्या तरी मार्गावरची कोणत्या तरी लोकलला (Mumbai Local) वे उशीर झालेलाच असतो. त्यामुळे कित्येकांच्या वेळेचा खोळंबा झालेला असतो, याची तुला कल्पना नसेल. पण पावसाळ्यात ही समस्या अधिक जाणवते, कारण या काळात सगळेच मार्ग अडले जातात. पावसाळ्यात रस्ते प्रवास वाहतूक कोंडीमुळे नको वाटतो, त्यामुळे आपली लोकल बरी वाटते. पण, तुझ्याही रुळांवर पाणी साचतं तुही रुसलेल्या नवरीसारखी अडून बसतेस. या सगळ्या गदारोळात घरच्यांचे, नातेवाईकांचे, मित्र मैत्रिणींचे काळजीपोटी फोन खणखणत राहतात. आपण घरी पोहोचत नाही तोवर त्यांच्या जीवात जीव नसतो आणि घरी पोहोचल्यानंतर आपल्या शरीरातील जीव निघून गेलेला असतो.

प्रत्येक सणावाराला तुला सजवतो, तुझी पूजा करत असतो आम्ही. एवढं तर आम्ही आमच्या घरातील स्त्रियांचंही कोडकौतुक करत नाही. असंच किंबहुना यापेक्षा जास्त कोडकौतुक आम्ही करत राहू, फक्त तू तुझा वक्तशीरपणा सांभाळ, एवढीच विनंती! बाकी रोज भेटूच!

तुझीच नेहमीची प्रवासी

-अनामिका