काही जणांचेआयुष्य म्हणजे एक तपो साधनाअसते. अखंड कष्ट, मेहनतीतून तावून सुलाखून निघालेली त्यांची आयुष्यं इतरांचेही मार्ग उजळवून टाकतात.अशाच एक आहेत पद्मश्री बुधारीताती. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना नुकतेच पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले.बुधारीताती या मूळच्या छत्तीसगढच्या आहेत. छत्तीसगड मधील आदिवासी आणि नक्षलवाद्यांचात सेचतुलनेने मागासअसलेल्या प्रदेशात बुधारीताती यांनी अत्यंत निर्लेप पणे समाज कार्य केले आहे. त्याचाच गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.

अनेक दशकां पासून छत्तीसगडमधल्या नक्षलप्रभावित क्षेत्रांमधील महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या साठी बुधारीताती लढत आहेत. अशा ठिकाणी कित्येकदा सरकारी योजनाही पोचत नाहीत. शिक्षण, नोकरी, रोजगार अशा अनेक अत्यावश्यक गोष्टींसाठी ही त्यांना सातत्याने लढा द्यावा लागत आहेत. अशा परिस्थितीत बुधाजीताती गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या बरोबर उभ्यारा हिल्याआहेत. नक्षलप्रभावित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना सन्मानपूर्वक आयुष्य मिळावे यासाठी त्यांनी जीवाचे रान केले आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील ही रानार हे बुधारीताती यांचेमूळ गाव. त्यांचे संपूर्ण आयुष्यच संघर्ष आणि सेवा यांनी व्यापलेले आहे.

दक्षिण बस्त रसारख्या नक्षल प्रभावित आणि अत्यंत दुर्गम समज्या जाणाऱ्या भागात राहूनही त्यांनी समाज सेवेची ज्योत तेवती ठेवली आहे. या परिसरात शिक्षणाचा अभाव, गरीबी, बेरोजगारी, व्यसनाधिनता आणि विशेषत: लहान मुलींची शिक्षणाची दयनीय स्थिती या मुख्य समस्यांनी त्यांना व्यथित केले. त्यामुळे अगदी तरुण असतानाच त्यांनी समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. या परिसरात शिक्षणाची सुविधाही अत्यंत मर्यादित आहे. रोजगाराच्या संधी तर जवळ पास नाहीतच. विकासाची, प्रगतीची संसाधनेही मर्यादितच. पण बुधारीताती यांनी अजिबात हार मानली नाही. गेल्या जवळपास ४० वर्षां पासून त्यायाच परिसरात मागास, वंचित लोकांच्या प्रगतीसाठी धडपडत आहेत.

१९८४ पासून त्यांचा हा संघर्षमय प्रवास सुरू झाला आहे. व्यसनमुक्ती, साक्षरतेसाठी अविरत काम आणि आरोग्य तसेच सामाजिक जागृतीसाठी त्यासातत्याने काम करत आहेत. १५सप्टेंबर१९६६ रोजी जन्मलेल्या बुधारीताती यांना सुरुवातीपासूनच शिक्षण आणि सामाजिक कार्याचे आकर्षण होते. छत्तीसगड आणि विशेषत:दंतेवाडातील अनेक मागासठिकाणी साधी वाहतुकीचीही सोय नव्हती. पण बुधारीताती जवळपास ५७० गावांमध्ये पायी फिरल्या आहेत. अनेक आदिवासी कुटुंबांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरोग्यभान आणि सरकारी योजनांचा लाभ त्यांच्या पर्यंत पोचावायासाठी त्यांनी मैलोन् मैल पायपीट केली. या लोकांसाठी काम करायचे तर त्यांच्यामध्येच राहिले पाहिजे हे त्यांनी जाणले.

त्यामुळे या भागातील महिला तर सगळ्यात जास्त दुर्लक्षित घटक. त्यामुळे बुधारीताती यांचा मुख्य भर महिलांवर राहिला. महिलांना एकत्र करून, संघटित करून त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळावेयासाठी प्रयत्न केले. हजारो महिलांना बचत, स्वयं रोजगाराच्या माध्यमातून त्यांनी स्वत:च्या पायावर उभेकेले. त्यांना आर्थिक सक्षमीकरणाचे महत्व पटवून दिले.स्वावलंबनाची गरज अधोरेखित केली. महिलांच्या सक्षमी करणासाठी त्यांनी अगदी तळागाळापासून चळवळ उभी केली. ही चळवळ या संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरली.

नागपूरच्या वनवासी कल्याण आश्रमातून त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर रायपूर आणि जगदल पूर मध्ये राहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव गेतला. जगदल पूरच्या भनपुरी भागात त्यांनी भाड्याच्या एका छोट्याशा जागेत त्यांनी वसतीगृहाची सुरुवात केली. हेच आता ‘राणी दुर्गावती वसतीगृह’ओळखले जाते. या वसतीगृहात राहून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आता डॉक्टर, शिक्षक आणि विविध सरकारी सेवांमध्ये अधिकारी पदांवर कार्यरत आहेत.

आरोग्य क्षेत्रात ही बुधारीताती यांचे अमूल्य योगदान आहे. या परिसरात सिकलसेलचे आजार, अशक्तपणा, कावीळ, गंभीर स्वरुपाची डोकेदुखी, बालकु पोषण आणि किडनीशी संबंधित आजार यांविषयी त्यांनी जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध मोहीमा हाती घेतल्या. अनेक उपक्रम राबवले. पारंपरिक औषधोप चारां बद्दल अधिक सजगता निर्माण करून त्यांनी ग्रामस्थांना या आजारांच्या लक्षणांविषयी जागृत केले तसेच उपचारांमध्ये हयगय करू नये यासाठी वारंवार आवाहन करत राहिल्या. व्यसनाधिनतेने हा परिसर पोखरला गेला होता.

गावागावांमध्ये जाऊन बैठका घेऊन त्यांनी संवाद साधला आणि व्यसन मुक्तीसाठी जागरुकता निर्माण केली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज या नक्षल प्रभावित भागातही आरोग्य सेवाआणि शिक्षण क्षेत्रातमोठे बदल झालेले पाहायला मिळतात. बुधारीताती यांना‘दंतेवाडाची कर्मयोगिनी’म्हणून ओळखले जाते. त्यांना मिळालेला‘पद्मश्री’ पुरस्कार हा सन्मानफक्त एका व्यक्तीचा नाही तर त्यांच्यासारख्या अत्यंत कठीण, प्रतिकूल परिस्थितीत राहूनही, समाजकार्याची मशाल पेटतीठेवणाऱ्या असंख्य समाज सेवकांचा हा सन्मान आहे.