नजिकच्या भविष्यामध्ये गेमिंगकडे करीअरचा उत्तम पर्याय म्हणून तरुण मुलींनी गांभीर्याने पाहिलं, तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असा निष्कर्ष ह्युलेट पॅकार्ड (एचपी) या संगणक निर्मितीच्या क्षेत्रातील कंपनीने या वर्षी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेला आहे. भारतीयांसाठी हे सर्वेक्षण अनेक अंगांनी महत्त्वाचे आहे. त्यात भारतीय महिलांचा या क्षेत्रातीस सहभाग हा लक्षणीय आहे. गेमिंग असे म्हटले की, केवळ तरुण मुलेच मोबाइल तसंच संगणकाचा वापर करून गेम्स खेळताहेत असे चित्रं नजरेसमोर येते. या चित्राला एचपीच्या या सर्वेक्षणाने सकारात्मक छेद दिला आहे. कारण या क्षेत्रातील महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून बहुतांश तरुण मुलींना गेमिंगचा पर्याय करिअर म्हणून स्वीकारावासा वाटतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच: कुत्र्यांची भीती वाटते?

गेमिंगचे जग काहीजणांसाठी निव्वळ टाइमपास असतं, तर काहींसाठी तो करीअरचाही भाग असतो. या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वेक्षणात सहभागी महिलांपैकी २९ टक्के महिलांनी त्यांना गेमिंगच्या क्षेत्रात पूर्णवेळ करिअर करायला आवडेल, असं सांगितलं. शिवाय ६९ टक्के महिलांना गेमिंगसाठी स्मार्टफोनऐवजी संगणकाचा स्क्रीन अधिक योग्य वाटतो, असंही त्या म्हणाल्या. ‘एचपी इंडिया गेमिंग लँडस्केप स्टडी २०२२’च्या अहवालामध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे, की स्मार्टफोनऐवजी संगणकाच्या स्क्रीनचा वापर करण्यामागे उत्तम प्रतीचा प्रोसेसर, डिझाइन आणि डिस्प्ले गेमर्सना अधिक भावतो. गेल्यावर्षी एचपीने भारतातील गेमिंगसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणातील नोंदी याही वर्षी साधारण सारख्याच आहेत. २०२२ साली एचपीने १४ लहानमोठ्या शहरांतून सुमारे दोन हजार वापरकर्त्यांचे सर्वेक्षण केले. २०१० सालच्या सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या दोन हजार जणांमधे ७५ टक्के पुरूष आणि २५ टक्के महिला असून बहुतांश महिला १८ ते ४० वयोगटातल्या आहेत. त्यांच्यापैकी साधारणपणे ६० टक्के संगणकाला प्राधान्य देणाऱ्या तर ४० टक्के स्मार्टफोन वापरकर्त्या होत्या. सर्वेक्षणात महिलांनी करीअर म्हणून गेमिंगचा सकारात्मक विचार करायला हवा असं म्हटलं आहे. एचपी इंडिया लँडस्केप स्टडी २०२२ ने असंही नोंदवलं आहे, की या सर्वेक्षणात पाच टक्के महिला गेमिंग करीअर म्हणून स्विकारायचे का, या विषयी मनात थोडी चलबिचल आहे.

आणखी वाचा : नातेसंबंध : बायको पडतेय तोंडघशी?

गेमिंगला करीअरबाबत ठाम असलेल्या युजर्सपैकी एचपी सर्वेक्षणानुसार दोन तृतीयांश कुशल गेमर्स पूर्णवेळ किंवा अर्धवेळ करीअरसाठी या क्षेत्राचा विचार करत आहेत. २०२१ आणि २०२२ दोन्ही वर्षी झालेल्या सर्वेक्षणादरम्यान बहुतांश गेमर्स गेमिंगसाठी संगणकाला अधिक प्राधान्य देत असल्याचंच अधोरेखित झालं आहे. ८२ टक्के युजर्सना असं वाटतं की संगणकावर गेमचे अधिक पर्याय उपलब्ध आहेत तर संगणकावर गेमिंगचा अनुभव अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो, असं ७० टक्के वापरकर्त्यांना वाटतं. संगणक गेमर्सना अधिक व्यापक अनुभव देतो, असं मत ५७ टक्के गेमर्सनी नोंदवलं आहे.

आणखी वाचा : तुमच्यासाठी ‘महिला’ म्हणजे प्रसिद्धीचं खेळणं आहेत का?

गेमिंग काहींसाठी मनोरंजनाचा तर काहींसाठी ताण हलका करण्याचे माध्यम असल्याचंही ९२ टक्के वापरकर्त्यांनी म्हटलं आहे. गेमिंगमुळे मानसिक क्षमता वाढल्याचं ५८ टक्क्यांनी तर ५२ टक्के वापरकर्त्यांनी आपण अधिक सोशलाइज झाल्याचं म्हटलं आहे. सर्वेक्षणात असे लक्षात आले की, ६८ टक्के वापरकर्ते पीसी अर्थात संगणकावर गेम खेळणे अधिक पसंत करतात. एचपी इंडिया गेमर्सना त्यांच्या गेमिंगच्या प्रवासात पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असून गेमर्सनी गेमिंगसाठी पीसीला दिलेलं प्राधान्य ही आमच्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपाची व्यावसायिक संधी आहे, असं प्रतिपादन एचपी इंडिया मार्केटच्या पर्सनल सिस्टम्सचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी यांनी केलं आहे. बेदींच्या म्हणण्यानुसार गेमिंग मार्केट मोबाईल आणि पीसी या दोन्हींमध्ये असले तरीदेखील सध्यातरी मोबाईल गेमिंगचा वरचष्मा आहे. परंतु एचपीच्या सर्वेक्षणानुसार सुमारे ३९ टक्के मोबाईल गेमर्स गेमिंगच्या अधिक चांगल्या अनुभवासाठी पीसीगेमिंगकडे वळू इच्छित आहेत.

(शब्दांकन : साक्षी सावे)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Participation of young girls are on rise in gaming new career opportunity vp
First published on: 30-11-2022 at 17:28 IST