उंचीनुसार वजन किती हवं? डाएटमध्ये '८० टक्के' रुल काय?.. 'हे' ५ नियम पाळून लग्नसराई गाजवा! | Perfect Weight as per Height How 80 Percent Rule Of Diet Works As Per Ikigai Book Wedding Season Weight Loss Tips | Loksatta

उंचीनुसार वजन किती हवं? डाएटमध्ये ‘८० टक्के’ रुल काय?.. ‘हे’ ५ नियम पाळून लग्नसराई गाजवा!

Wedding Season Weight Loss Tips: जपानी बेस्टसेलर पुस्तक Ikigai चा ‘८०%’ जेवणाचा नियम तुम्ही पाळू शकता. आहारतज्ज्ञसुद्धा या नियमाचे पालन करण्याचा सल्ला देतात यानुसार…

उंचीनुसार वजन किती हवं? डाएटमध्ये ‘८० टक्के’ रुल काय?.. ‘हे’ ५ नियम पाळून लग्नसराई गाजवा!
उंचीनुसार वजन किती हवं? डाएटमध्ये '८० टक्के' रुल काय?.. 'हे' ५ नियम पाळून लग्नसराई गाजवा!

Wedding Season Weight Loss Tips: प्रत्येक मुलगी आयुष्यात एकदा तरी आपल्या स्वप्नांची यादी करतेच करते; यात अगदी करिअरपासून ते परदेशी सोलो ट्रिप पर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. या ‘विशलिस्ट’मध्ये असणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न. काहींच्या बाबत लग्नाला दिलेला प्राधान्यक्रम नंतरचा किंवा फार आधीचा असू शकतो, पण आपला एक खास दिवस आणि त्यादिवशी सजण्याची इच्छा जवळपास प्रत्येक तरुणीच्या मनात लहानपणापासूनच असते. एरवी अनेकदा स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांच्या गरजा पूर्ण करण्याचे धडे मुलींना लहानपणापासून दिले जातात पण लग्नाच्या दिवशी ती नववधू खऱ्या अर्थाने उत्सवमूर्ती असते. लग्नात आपण कसे दिसतोय, कपड्याचं फिटिंग बरोबर होतंय ना आणि सगळ्यात मुख्य म्हणजे फोटो चांगले येत आहेत ना याची आपल्याला किती चिंता असते हे वेगळं सांगायला नको.

‘परफेक्ट नवरी’ लुकसाठी ‘परफेक्ट फिगर’ हवी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी नक्की काय करता येईल हे आज आपण पाहणार आहोत. स्वतःच्याच नव्हे तर तुमच्या घरातील किंवा मित्रमैत्रिणींपैकी कोणाच्या लग्नासाठी तुम्हाला वजन कमी करावेसे वाटत असेल तरीही या काही खास टिप्स तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी डाएट करावे का?

वजन कमी करण्यासाठी डाएटचे अनेक प्रकार सध्या प्रचलित आहेत. अलीकडेच इंटरमिटंट फास्टिंग हा पर्यायही बराच चर्चेत आला आहे. तुमच्या शरीरानुसार कोणते डाएट योग्य ठरेल हे आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या. उपाशी राहण्याची चूक अजिबात करू नका. तुम्ही जेवण बंद करून नाही तर नियंत्रणात ठेवून वजन कमी करू शकता. तुम्ही वेळच्या वेळी जेवण केले नाही तर त्याचा थेट परिणाम चयापचय क्रियेवर होतो.

डाएटपेक्षा पाळा ‘८०%’ जेवणाचा नियम

जपानी बेस्टसेलर पुस्तक Ikigai चा ‘८०%’ जेवणाचा नियम तुम्ही पाळू शकता. आहारतज्ज्ञसुद्धा या नियमाचे पालन करण्याचा सल्ला देतात यामुळे तुमची पचनप्रक्रिया वेगाने होण्यास मदत होऊ शकते. हा नियम सांगतो की, तुम्ही जेवताना पोटभर जेवण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला ८०% पोट भरल्यासारखे वाटेल तेव्हा थांबायला हवे. म्हणजेच जर तुम्हाला कधी भात घेऊ का किंवा एक पोळी अजून खाऊ का असा प्रश्न पडतो तेव्हा त्याचे उत्तर ‘नाही’च असे समजून जावे. तुमच्या पोटाला भूक असेल तर आपला मेंदू आपल्याला खाण्याबाबत कोड्यात टाकत नाही, उलट तुम्ही थेट जेवण वाढून घेता पण जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा आपल्या पोटाची भूक संपलेली असते व मनाची इच्छा संभ्रम वाढवत असते.

कॅलरीजपेक्षा ‘हा’ प्रश्न आधी सोडवा..

तुम्ही शरीरात किती कॅलरीज घेता यापेक्षाही किती कॅलरीज रोज बर्न केल्या जातात हे महत्त्वाचे आहे. अर्थात यामुळेच तुम्ही नुसतं डाएट करून वजन कमी करू शकत नाही. आपल्याला किमान हालचालीची गरज आहे. एक लक्षात घ्या जिम मध्ये जाणे हा एक पर्याय आहे, एकमेव नाही! तुम्ही रोज सकाळी जॉगिंग करून, योगा किंवा अगदी वेगानी चालूनही वजन नियंत्रणात आणू शकता.

तुमच्या उंचीनुसार वजन किती हवं?

लग्नात किंवा इतर कोणत्याही कारणाने वजन कमी करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला कपडे किंवा इतरांकडे बघून स्वतःची परीक्षा करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या उंचीनुसार जर परफेक्ट वजनी गटात बसलात तर तुम्हाला सगळेच कपडे सुंदर दिसू शकतील. यासाठी तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. साधारण कल्पना हवी असल्यास तुमच्या उंचीनुसार वजन किती हवे हे सांगणारा हा तक्ता तपासून पाहा.

सगळ्यात महत्त्वाचं…

लग्नात तुमचे शरीर, तुमचे कपडे, तुमचे केस यासगळ्यापेक्षा तुमचा आनंद मोठा आहे. या आधीच्या तीन गोष्टी आनंद वाढण्यात मदत करू शकतात पण त्यांना एकमेव कारण समजू नका. तुम्ही वजन कमी करण्याची चिंता करत राहिल्यास मूळ परिणाम दिसतच नाही. यापेक्षा स्टेप बाय स्टेप वजन कमी करण्यावर लक्ष द्या. तुमचा लग्नाचा लेहेंगा किंवा साडी निवडताना फिटिंगकडे दुर्लक्ष करू नका, अनेकदा हट्टाने कमी साईझचे कपडे घेतले जातात पण त्यामुळे आपण मूळ शरीरापेक्षा आणखी जाड दिसू शकतो.

हे ही वाचा<< मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

एखादी डिझाईन आपल्या मापात बसवून घ्या जेणेकरून तुम्ही कम्फर्टेबलही दिसाल व सुंदर… त्या तर तुम्ही आहातच!

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-11-2022 at 13:08 IST
Next Story
विवाहपूर्व मार्गदर्शन : लग्नाच्या बाजारात नेमकं काय विकलं जातं?