तन्मयी बेहेरे

“हे शंकासुरा माझ्याशी समर कर…!” विष्णूदेवाचे हे आव्हान ऐकून दशावतारातला शंकासुर क्षणाचाही विलंब न करता ओरडतो ”तूच कर नी माका पण दी काळ्या वाटण्याचा साम्बारा” बाबा दशावतारी नाटकातील हा प्रसंग साभिनय करून दाखवायचे आणि असा काही हशा पिकायाचा की बस रे बस! म्हणूनच कदाचित काळ्या वाटाण्याच्या साम्बाऱ्याची चव ही तिच्या मनात लहानपणापासूनच घर करून होती. आज बाबांना सर्वपित्रीच्या निमित्ताने पान दाखवताना त्यात काळ्या वाटाण्याचं साम्बारा वाढताना विशाखाच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं “ताई , मी पैज लावून सांगतो बांगड्या नंतर काळा वाटाणाच जिंकेल” असं ते गमतीत म्हणायचे इतकं आवडायचं त्यांना काळ्या वाटण्याचा साम्बारा. श्रावणात तोंडाला चव देणारा, (मटणाची हे सायलेन्ट बरं) म्हणून वरदानच दिलंय इंद्र देवानं काळ्या वाटाण्याला असं म्हणायचे ते तिला.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

सिंगापूरहून फ्लाईटमध्ये बसायच्या आधी ती हाच विचार करत होती की सिंगापूरचं काही बाबांना आवडेल असं त्यांच्या पानावर ठेवायला घेऊन यावं पण बाबांना आवडणारे सगळेच पदार्थ इथलेच, स्थानिक किंबहुना अस्सल मालवणीच, शिरवाळे, पातोळ्या , केळफुलाची, फणसाची भाजी, कुळथाची पिठी , आंबोळी, घावणे, मुडदुशी, बांगडे, खेकडे, कोंबडी वडे आणि काळ्या वाटण्याचा साम्बारा. आणि साम्बाराच बरं का सांबार नाही. साम्बारा ला मालवणी मसाल्याचा गंध आहे. दीपक तिचा नवरा बंगळुरूचा असल्यामुळे हे नेहमी ती स्वतःला पुन्हा ठामपणे सांगते.

आपल्या लग्नानंतर आई बाबांच्या घरात, शांतपणे आई बाबांसोबत राहावं असं नेहमी वाटायचं. ते स्वप्न फार तग धरू शकलं नाही पण तरीही आता आईसोबत बाबांच्या आठवणी जागवण्यासाठी काही दिवस राहायला तिला यायचं असतं, करोनाच्या दुष्टचक्रामुळे गेली दोन वर्ष येता आलं नाही आणि आज घास दाखवायला पोहोचले. भातावर वाढलेल्या काळ्या वाटण्याच्या साम्बाऱ्याचा पहिलाच घास घेता घेता हे सर्व विचार तिच्या मनात रेंगाळत होते… तोच तिला जाणवलं… तीच चव…! सगळं तसंच, नेमकं… जे तिला अगदी लहानपणात घेऊन गेलं…

तिला आठवतं तेंव्हापासून ती खोकरी होती, त्यामुळे घरात काळे वाटणे असले की तिची आजी त्या उकळी आलेल्या पाण्यात फक्त मीठ घालून हे सूप तिला प्यायला द्यायची आणि तिच्या छातीवर हळू हळू हात फिरवायची. आजीच्या मांडीत बसून कधी पाठीवर लटकत चुली समोर पातेल्यातलं उकळतं सूप भुर्र्के मारत मारत ती गट्टम करायची आणि वर आजीकडून शाब्बास अशी वाहवा ही मिळवायची. या वेळात आजी मात्र पाट्यावर कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण करायला घ्यायची, एका लयीत चालणारे आजीचे हात आणि त्यामुळे तयार होणारं काचेच्या बांगड्यांचं, पाटा- वरवंट्याच लयबद्ध संगीत आणि त्याच वेळी आजीच्या तोंडून येणारे त्याच लयीतले स्स स्स असे आवाज म्हणजे जणू काही एखादी ओवीच गायली जाते आहे का काय असं वाटायचं तिला … पुढे येणारा पर्वणीचा क्षण म्हणजे त्या पातेल्यात जाणाऱ्या कांदा लसूण खोबऱ्याचा भाजका खमंग सुगंध जो घरभर दरवळायचा… त्यात मालवणी मसाला मिसळला, काळे वाटणे अलगद सोडले, वर एक आमसूल घातले की साम्बारा तयार… मग पूर्ण स्वयंपाक घर त्या सुगंधात व्यापून जायचं… आणि पोटात भुकेचे कावळे, उंदीर, अस्वलं, बेडूक सगळे एकच कल्ला करायचे… आजीला ते आपसूक उमजायचं आणि तिथेच ताटात पांढरा मोकळा भात, त्यावर चुलीवरच रटारटा उकळणारं काळ्या वाटण्याचा साम्बारा आणि सोबतीला तळलेली सांडगी मिरची… ब्रम्हानंदी टाळी!

“आई! अगं आपल्या घरात गणपतीसाठी, सत्यनारायणासाठी, लग्नकार्यासाठी ते अगदी श्राद्ध कार्य सुद्धा या काळ्या वाटण्याशिवाय पूर्ण होत नाही का ? म्हणजे मला आठवतंय गावात कोणाच्याही घरी लग्न कार्य असलं की गृहिणी आपापल्या घरातील विळी घेऊन त्या घरी पोहोचायच्या, आणि लग्नाची गाणी गात गात खोबरं किसत असायच्या. मग ते खोबरं सर्व पदार्थांमध्ये जाणार, डाळीत, फणसाच्या भाजीत आणि उरलेलं सगळं काळ्या वाटाण्याच्या साम्बाऱ्यात, हो ना ?” विशाखाने आईला न राहून विचारलं… आई ही म्हणाली ‘खरंय ग बाई, काळे वाटणे खाल्ल्याशिवाय ह्यांची पितरे स्वर्गात पोचत नाहीत.” आजोबाही तिला भरवताना सांगायचे, “गो बाय! साम्बारा खाऊक व्हाया, त्याने डोळे कसे टकटकीत रव्हतत, रोज खाऊन तर कसा सुळसुळीत होतस ता बघ.” सुळसुळीत म्हणजे गुटगुटीत होण्याचा एकाच उपाय ..काळे वाटणे…. आईकडे पाहून ती जरा हसली. जेवणं आटोपता क्षणी चाळा म्हणून मोबाईल काढून काळ्या वाटाण्यावर इंटरनेटवर तिने सर्च केलं… “अगं आई, आजोबा काही चूक नव्हते.. हे बघ ना .. काळे वाटणे म्हणे प्रोटिन्स, फायबर्स ,अँटिऑक्सिडंट ने समृद्ध असतात, हृदयाच्या, डोळ्यांच्या आणि पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उत्तम, मधुमेहींसाठी, वजन कमी करण्यासाठी इतकंच काय कर्करोगावर देखील गुणकारी आहेत. घर की मुर्गी दाल बराबर तसं काळा वाटण्याचं आहे ना? मला उगीच वाटायचं की मी जरा आवडीने जास्त खाल्ले तर जाड होईन म्हणून.” या माहिती मुळे विशाखाचं त्या काळ्या वाटाण्यावरच प्रेम जरा कणभर वाढलंच.

आईने ही तिला पुढे सांगितलं की वरण जसं प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने करतात तसं काळ्या वाटाण्याचं ही आहे. कुणी फोडणीवर टाकतात कुणी नाही, कुणी आमसूल घालतात कुणी नाही पण शो स्टॉपर मात्र मालवणी मसाला असतो. त्याच प्रमाण प्रत्येक घरातलं वेगवेगळं असतं मग तशी त्याची चव बदलते. म्हणून तुमच्या घरातली चव ही दुसऱ्याच्या घरी काय मिळूची नाय, आमची कुठेही शाखा नाही…

वेंगुर्ल्याला आजीच्या घरी होणारं काळ्या वाटाण्याचा साम्बारा मुंबईला तिच्याही घरी वरचेवर शिजत होतच. तिला आठवलं जेव्हा केव्हा आई तिला वाण्याकडे पाठवायची तेव्हा बजावायची “दोन प्रकारचे काळे वाटणे असतील त्यातला हिरवट काळ्या रंगाचा वाटाणा आण काळा कुट्ट असा वाटाणा अजिबात आणू नकोस, नाहीतर ते शिजणार नाहीत. पहाटे माझी पंचाईत करशील.” कालांतराने तिला कळलं की काळ्या वाटण्याचा साम्बारा केला की एका दगडात आई तीन चार पक्षी मारायची, भातावर वाढायला वेगळं काही करायची गरज नसते, पोळी भाकरी सोबत तीच भाजी म्हणूनही खपते, शाकाहार असलेल्या वाराला चिकन मटण रस्सा खाल्ल्याचा फील येतो आणि बाबा जरा जास्त ताव मारतात. आजही बाबांनी तसाच ताव मारला असेल असं वाटून विशाखाला पुन्हा दाटून आलं.

केवढ्या त्या आठवणी, फक्त त्या काळ्या वाटाण्याच्या साम्बाऱ्याच्या गंधामुळे आणि चवीमुळे शाबूत राहिलेल्या..आपल्या पितरांशी आपलं नातं अधिक दृढ करणाऱ्या…

सिंगापूरला गेल्या पासून विशाखाने या काळ्या वाटाण्याला जवळ जवळ त्यागलं होतं. न राहून तिला हे ही वाटलं की तिने नवरा पण कोकणातलाच करायला हवा होता. दीपकला काळ्या वाटण्याचं काही सोयरसुतक नाही पिहू ही ‘बॉर्न अन ब्रॉटप’ तिथली असल्यामुळे मराठी पदार्थांचं फार अप्रूप तिला नव्हतं. म्हणून मग या काळ्या वाटाण्यांना मात्र दुरावा मिळाला. यांना खाऊ घालता घालता आपण आपली आवड निवड विसरूनच गेलो. तिथल्या भारतीय रेस्तराँमध्ये मांदेलीच्या सारा पासून झुणका भाकरी सर्व मिळेल पण हे काळे वाटणे कधी त्या मेनूत इन काही झाले नाहीत त्यामुळे ती शक्यताही संपली.

बस, आता विशाखाने ठरवलं, मिशन काळ्या वाटण्याचा साम्बारा .. “आई, चांगले पाच किलो काळे वाटणे आणि तू बनवलेला दोन किलो मालवणी मसाला सिंगापूर ला घेऊन जाणार मी आणि हो तू साम्बारा तयार करतानाचा व्हिडियो ही शूट करू. काही चुकायला नको. मी माझ माझं करून खाईन पण मग दीपक आणि पिहू ला काय करावं हा प्रश्न उरतोच” “तो तर यक्षप्रश्न आहेच ग बाई “आई म्हणाली आणि ती देखील विशाखाच्या हसण्यात सामील झाली.

tanmayibehre@gmail.com