बरोब्बर वर्षभरापूर्वी म्हणजे २ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘पावनखिंड’ हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला होता. शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडत होते. चित्रपटातील अॅक्शन सीन्स, संवाद अशा अनेक दृश्यांची चर्चा प्रेक्षकांमध्ये होत होती. पण माझ्या मनात मात्र प्राजक्ता माळीचा चित्रपटातील अंगावर काटा आणणारा ‘तो’ सीन आजही खोलवर रुतून बसला आहे.

प्राजक्ता माळीने ‘पावनखिंड’ चित्रपटात रायाजीराव बांदल यांच्या पत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची भूमिका साकारली होती. रायाजीराव बांदल मोहिमेसाठी निघतात तेव्हा भवानीबाई आणि त्यांच्यातील संवादही फार अर्थपूर्ण आहे. रायाजीराव बांदल “चाललो म्या” असं म्हणतात तेव्हा लगेचच भवानीबाई त्यांना “चाललो नाही येतो म्हणावं”, असं सांगतात. मोहिमेवर जाण्याच्या आधी आरतीचं ताट घेऊन पतीचं औक्षण करणाऱ्या त्या पत्नीच्या मनात भावनाचं वादळ उठलेलं असतं आणि त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. “आधी कंदी येणार ते सांगा” या भवानीबाईंच्या प्रश्नातच आणि पाणवलेल्या डोळ्यांतच त्या पत्नीच्या लपवत्या न येणाऱ्या भावना दिसतात.

vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
one and a half months Recce is done for killing Vanraj Andekar
खुनाची दीड महिन्यांपासून रेकी, वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
vision women pune, vision young woman pune,
‘आयटी’तील तरुणीची दृष्टी अखेर वाचली! मद्यपीने भिरकाविलेल्या दगडामुळे गंभीर दुखापत; डॉक्टरांच्या ६ महिन्यांच्या प्रयत्नांना यश
Police deployment, badlapur, Rumors
बदलापूरातील चिमुकलीच्या प्रकृतीची अफवा अन् रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ठाणे पोलिसांचे आवाहन

“आधी कंदी येणार ते सांगा” या भवानीबाईंच्या प्रश्नावर “हे निरंजन इझायच्या आधी येतो, मग तर झालं” असं रायाजीराव म्हणतात. त्यानंतर भवानीबाई रायाजीरावांना ओवाळून त्यांचा मोहिमेचा मार्ग मोकळा करतात खऱ्या… पण, त्यांच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलेलं असतं. “हे निरंजन इझायच्या आधी येतो” रायाजीरावांचं हे वाक्य लक्षात ठेवून त्या डोळ्यांप्रमाणेच दिव्यातही तेल घालून त्यांच्या सुखरुप येण्याची वाट पाहत असतात. रायाजीराव पावनखिंडीत बलिदान देतात, तेव्हा अचानक जोराचा वारा-पाऊस येऊन भवानीबाईंनी तुळशीपाशी ठेवलेला दिवाही विझतो. पावसाची चाहूल लागलेली ही माऊली अंगणातील तुळशीकडचा दिवा तेवत ठेवण्याचा पूरेपूर प्रयत्न करताना दिसते.

आणखी वाचा>> काकू, आम्ही ऑफिसमध्ये काम करायला जातो, लग्नासाठी मुलं पाहायला नाही!

अंगणातील घोंगडी असो, चाळण असो वा साडीचा पदर…हाताला जे मिळेल त्याने दिवा विझू न देण्याची केविलवाणी धडपड भवानीबाई करताना दिसतात. पण, अखेर दिवा विझतो… तेव्हा आपल्या सासूकडे बघून (दीपाईआऊ बांदल) भवानीबाईंनी दिलेली “आई…” ही आर्त हाक काळजाचा ठोका चुकवते. प्राजक्ता माळीने उत्तमरित्या साकारलेला हा सीन पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. पूर्वीच्या काळातील बायकांच्या भोळ्याबाभड्या भावनांचं दर्शन या सीनमधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा सीन पाहिल्यानंतर तुमचं मन सुन्न झालं नाही तरच नवल…!

पूर्वीच्या काळी मोहिमेवर जाणाऱ्या शूरवीर मावळ्यांच्या पत्नीचं काय होत असेल? त्यांच्या मनात काय विचार येत असतील? कोणत्या आशेवर त्या एक एक दिवस पुढे ढकलत असतील? असे असंख्य प्रश्न पडतात. तेव्हा तर दळणवळणाची साधनंही नव्हती. मग, मोहिमेवर गेलेल्या आपल्या पतीची ख्यालीखुशाली त्यांना कशी समजत असेल? देवाकडे रोज हात जोडून प्रार्थना करण्याबरोबरच आपल्या आशेचा किरण तेवत ठेवण्यासाठी कित्येकींनी भवानीबाईंसारखीच धडपड केली असेल, कदाचित.

आणखी वाचा>> विधवा आहे आणि पैठणी नेसून मिरवतेय बघ कशी?

स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर मावळ्यांच्या पत्नींचं बलिदानही फार मोठं होतं. त्यांच्यासारखीच सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचीही अवस्था होत असेल का हो? आता पत्र, फोन ही दळणवळणाची साधनं आहेत. पण आपला नवरा सीमेवर देशाच्या रक्षणासाठी जात आहे, ही गर्वाची गोष्ट एकीकडे आणि पुन्हा सुस्थितीत आपण आपल्या नवऱ्याला पाहू शकणार की नाही… या विचाराने मन घटट् करत नवऱ्याला हसतमुखाने निरोप देणारी ती स्त्री एकीकडे! या सर्वच धैर्यशीलांच्या शूरवीर पत्नींनाही सलाम! त्यांचे असंख्य उपकार आपल्यावर आहेत, ज्याची परफेड आपण कधीच करू शकणार नाही!