डॉ. मेधा ओक

थॉमस वाॅर्टन याने १६५६ मध्ये गळ्यालगतच्या ग्रंथीचे थायरॉईड असे नामकरण केले. पण आयोडिन आणि गॉयटरचा संबंध व शोध मात्र १८११ मध्ये बर्नाड कर्टीसने लावून उपचारांची दिशा दाखवली. 

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

अंतस्त्रावी ग्रंथीमधील हॉर्मोन्स जेव्हा रक्तात मिसळतात तेव्हा त्या शरीरभर पसरून इतर अवयव नियंत्रित करतात. सूक्ष्म प्रमाणात असूनही त्यांचे कार्य मात्र खूप मोठे असते. मुख्य म्हणजे हे हॉर्मोन्स साठून राहत नाहीत. कार्य संपल्यावर हार्मोन्सचा त्वरित नाश होतो. 

थायराॅइड इतर हार्मोन्सच्या तुलनेत खूप हळू कार्य करते. शरीराची उंची, हाडे, स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांची वाढ, शुक्रजंतूंची उत्पत्ती, गर्भाची वाढ यावर थायरॉइडचे परिणाम खूप महत्त्वाचे आहेत. एकूणच शरीराची सुरळीत वाढ होण्यासाठी हार्मोन्सची पातळी व संतुलन खूप महत्त्वाचे आहे. 

प्रत्येक स्त्री जी आई होऊ इच्छिते तिची थायरॉइडची चाचणी गरजेची आहे, असे अमेरिकन एंडोक्राईन संस्थेचे मत आहे. गर्भारपणात TSH ची चाचणी दर चार ते सहा आठवड्यांनी करावी. गर्भवती स्त्रियांमध्ये होऊ घातलेल्या आईला आधीपासून थायरॉइडची गोळी चालू असेल तर गर्भारपणामध्ये जवळजवळ तीस ते पन्नास टक्के Levothyroxine (LT4) च्या डोस वाढीची गरज असते. हे हॉर्मोन्स मागणी तसा पुरवठा म्हणजेच डिमांड आणि सप्लाय या तत्वावर काम करते. औषधांची मात्रा रुग्णाच्या वजनावर ठरते. गर्भारपणामध्ये स्त्रियांचे वजन वाढते. तसेच खूप ऊर्जेची गरज असते. पोटात वाढणाऱ्या गर्भाला स्वतःच्या थायरॉईडची वाढ व्हायला जवळ जवळ १६ ते १८ आठवडे लागतात. तेव्हा बाळ सर्व थायरॉईडची गरज आईकडूनच भागवू शकतो. म्हणून आईचा डोस वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. 

TSH ची पातळी २ ते ३ mmlU/L फायदेशीर ठरते. प्रसूतीनंतर सहा आठवड्याने डोस कमी होऊ शकतो. पण दर वेळेस TSH चाचणी गरजेची आहे. 

गर्भवतींवर होणारा परिणाम

गर्भ राहण्यासाठी, टिकण्यासाठी, बाळाच्या मेंदूची वाढ होण्यासाठी, थायरॉईड हार्मोन महत्त्वाचे आहेत. नाळ-वार यांच्यातील दोष, उच्च रक्तदाब, रक्तस्त्राव, कमी वजनाचे बाळ आपुऱ्या दिवसांत प्रसूती, बाळाला जन्मताच हायपोथायरॉईडीझम किंवा बाळाला श्वास घेण्यास त्रास होणे असे बरेच दुष्परिणाम दिसू शकतात, म्हणून थायरॉईडवरील उपचार अत्यंत गरजेचे आहेत.

गर्भधारणेआधी, गर्भधारणा झाल्यावर व बाळतपणानंतर, तिन्ही टप्पे महत्त्वाचे आहेत. TSH पातळी दोन ते तीन किंवा कमी असल्यास फायदेशीर ठरते. स्त्रीबीज फलित होण्यासाठी थायरॉईड नियंत्रण महत्त्वाचे असते. ५० टक्क्यापेक्षा हार्मोन्स कमी स्त्रवले तर बरेच हानिकारक परिणाम दिसून येतात. सुरुवातीच्या गर्भारपणामध्ये बीटा HCG नावाचे अजून एक हार्मोन असते. त्याच्यात आणि TSH मध्ये खूप साधर्म्य आढळते. त्यामुळे TSH चे प्रमाण कमी दिसते हे लक्षात घेऊन उपचार देणे योग्य ठरते. तसेच इस्ट्रोजन या हार्मोन्सचाही परिणाम होतो. असंतुलित थायरॉइड गर्भपातास कारणीभूत ठरू शकते. 

थायरॉइड नियंत्रणासाठी गर्भवतींनी काय खावे?

आयोडीन बरोबरच व्हिटामिन बी आणि डी हे ही महत्त्वाचे आहेत. म्हणून अंडे, चिकन, मासे, कडधान्य, चीज, दूध, बदाम, अक्रोड, हिरव्या पालेभाज्या जेवणात असणे महत्त्वाचे आहे. तसेच दारू, सोया पीच, कॉफी हे टाळणे गरजेचे असते.  

बालकांमधील समस्या 

चार हजार नवजात अर्भकांपैकी एकामध्ये (केटिनिझम काॅन्जेनिटल हायपोथायरॉइडिझम- Cretinism Congenital Hypothyroidism) हा आजार आढळतो. थायरॉईड ग्रंथी तयारच होत नाहीत (agenesis) अथवा थायरॉईड ग्रंथीत दोष निर्माण होतात. (dyogenesis) स्त्री अर्भकांत हा दोष दुपटीने आढळतो जनुकीय बदल हे पण एक कारण आहे, म्हणून सर्व बालकांची चाचणी करणे योग्य ठरते. 

बालकांतील दोष कोणते आणि लक्षात कधी येतात?

बाळाचा जन्म झाल्यावर कावीळ दिसते (बराच काळ राहते), मोठे डोके शरीराचे तापमान अतिशय कमी असणे, हृदयाचे ठोके मंद असतात, फुगलेले पोट आणि बाळ नीट दूध पित नाही. विचित्र आवाजात रडते किंवा खूप कमी रडते आणि सतत झोपेत असते. इथे TSH ची पातळी ९ mlU/L पेक्षा अधिक असते आणि त्याच अनुषंगाने T4 खूप कमी असते. हाडांची व दातांची वाढ खुंटलेली दिसते. चेहरा विचित्र दिसतो, उंची वाढत नाही, बहिरेपणा, अकाली पाळी येणे अशी लक्षणे दिसतात. 

आईमध्ये व बाळामधे अॅण्टिबॉडीज चाचणी जरुरीची आहे. तसेच युरीन आयोडीन चाचणीही उपयोगी पडते. TSH पातळी लवकरात लवकर सामान्य करणे हा उपचारांचा मुख्य हेतू असतो. दर दोन ते चार आठवड्याने औषधांचा डोस निश्चित करतात. औषध तोंडावाटे दिले जाते. बाळाचे वजन, उंची, मेंदूची वाढ यावर नजर ठेवली जाते. TSH सामान्य झाले की सहा महिन्यांनी चाचणी करत राहणे इष्ट. एका सर्वेक्षणात असे आढळले की, ५ ते ७ वर्षे उपचारानंतर बऱ्याच बालकांचा IQ बौद्धिक पातळी सामान्य होती. तर काहींमध्ये त्यानंतरही काही हालचाली मंद आणि सदोष होत्या. 

आजाराची नीट माहिती व जागरूकता असेल तर हा आजार टाळता येणे सहज शक्य आहे.