scorecardresearch

Premium

विवाहपूर्व मार्गदर्शन – लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच

“रिलेशनशिपमध्ये असणे, ब्रेकअप्स होणे, याचे आपल्याला आता काहीच वाटेनासे झाले आहे. अनेकांची मल्टिपल रिलेशन्स झालेली असतात. त्यात अनेकांनी सेक्सही अनुभवलेला असतो. तरुण वयात शरीराच्या गरजा एखाद्या उसळलेल्या समुद्रासारख्या असतात. पण लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच.” कारण…

sex pre marital, multiple sex partners
बदलत्या सेक्स पार्टनर्समध्ये धोकेच अधिक आहेत

वंदना सुधीर कुलकर्णी
कधी नव्हे तो पम्या आज विचारात पडला होता…
‘आपण लैंगिक संबंधाकडे किती उथळ पद्धतीने बघत होतो… अगदी रात गयी, बात गयी…पद्धतीने!’, त्याला स्वत:चच आश्चर्य वाटत होतं. आपण त्याकडे शरीर-संबंधांचा आनंद घेण्याची ‘बे घडी गंमत’ म्हणूनच बघत होतो. मनोमीलनानंतर होणारे शारीरिक संबंध म्हणजे लैंगिक संबंध याची काही जाणीव, साधी माहितीही आपल्याला नव्हती. त्यामुळे मनात आलं घेतला अनुभव… यात पार्टनरही बदलत राहतात आणि ते किती गंभीर असू शकतं… परवा सम्या म्हणाला ते खरं आहे… सेक्स इज सो इजिली अवेलेबल दीज डेज’

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – परस्त्रीचं आकर्षण ?

weight loss tips
बदाम खा आणि झटपट वजन कमी करा; जाणून घ्या बदाम खाण्याचे आणखी फायदे
showed the horoscope and asked how to convince an angry girlfriend they made jyotish unconscious and took away all the belongings from the house in kanpur
“रागावलेल्या प्रेयसीची समजूत काढण्याचा मार्ग सांगा” कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने आले अन् ज्योतिषालाच लुटून गेले
Weird Man Masturbates While Chasing Van Of Female Students On Bike Hides Face With Helmet Video Makes people Angry
तरुणींच्या गाडीचा बाईकवरून पाठलाग करत विकृत करत होता हस्तमैथुन! Video मध्ये कैद झाला गलिच्छ प्रकार
World Heart Day 2023 How stress affects heart health and 7 ways to reduce stress
World Heart Day 2023: तणावाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? तणाव कमी करण्याचे सोपे मार्ग, जाणून घ्या

पम्याचं मन त्याला खाऊ लागलं होतं… तो प्रचंड अस्वस्थ झालेला दिसत होता.
ग्रुपमधील कुणालाच पम्याचं हे रूप बघायची सवय नव्हती. सगळे चक्रावले…
“काय रे पम्या, आज झालंय तरी काय तुला?”
पम्या गप्पच होता…
“ए मुग्धा, तू काय काय डोक्यात घातले आहेस ना आमच्या, आता बघ त्या पम्याच्या डोक्यावर कसा परिणाम झाला आहे…” सम्या टवाळी करण्याच्या मूड मध्ये होता.
पण पम्या एकदमच उसळलाच.
“ए, उलट मुग्धाने आपली टाळकी जाग्यावर आणली आहेत. आभार माना तिचे…दोष काय देताय?”
पम्याचा हा प्रतिसाद मुग्धालाही चक्रावणारा होता.

आणखी वाचा : नातेसंबंध -‘फ्रेन्डझोन’मध्ये जास्त मुलगेच का?

ती म्हणाली, “रिलेशनशिपमध्ये असणे, ब्रेक अप्स होणे, याचे आपल्याला आता काहीच वाटेनासे झाले आहे. अनेकांची मल्टिपल रिलेशन्स झालेली असतात. त्यात अनेकांनी सेक्सही अनुभवलेला असतो. तरुण वयात शरीराच्या गरजा एखाद्या उसळलेल्या समुद्रासारख्या असतात. लग्न मात्र व्यावसायिकदृष्ट्या सेटल झाल्याशिवाय करता येत नाही.”
“हो ना, एकीकडे तारुण्यातलं पदार्पण अलीकडे येत चालले आहे तर दुसरीकडे लग्नाचे वय लांबत चालले आहे. पूर्वी किंवा आजही काही जण ही नैसर्गिक गरज दाबून ठेवतात किंवा त्यांचा त्यांच्या मनावर ताबा ठेवतात. आज काल तरुणांमध्ये या सगळ्याचा इतका सहज स्वीकार झाला आहे, की यात काही वावगं असू शकतं असं कुणाच्या मनातही येत नाही. हा करतो, ती करते, अनेक जण करतात…‘सो, ओके’…अशीच भावना होते मग..” अनय त्याच्या मनातील भावना व्यक्त करता झाला…

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : सेक्स्च्युअल शेअरिंग म्हणजे काय गं?

“ मग काय बरोबर काय चूक हे कसं ठरवायचं गं मुग्धा? स्वप्नाने विचारले.”
“ आत्ता मी जरी सोलो ट्रॅव्हलिंगला गेले होते तरी माझ्यासारखे इतर सोलो ट्राव्हलर्स मला भेटले. आय डिड स्पेंड कपल ऑफ नाइटस विथ देम… मग हे योग्य नाही का?” आता सगळ्यांचे डोळे मुग्धा काय उत्तर देते याकडे लागले….कारण सोलो ट्रॅव्हलिंग न करताही अनेकांचा हा अनुभव होता.
मुग्धा म्हणाली, “वर्कशॉपमध्ये जे दुसरे वक्ते होते जे सेक्शुअल शेअरिंग बद्दल बोलले ते स्वतः यंग सायकियाट्रिस्ट आहेत, उत्तम सेक्स कॉन्सिलरही आहेत. आश्चर्यकारकरित्या ही डिस्करेज्ड प्री- मॅरिटल सेक्स! लग्नापूर्वी सेक्स नकोच, म्हणाले ते. अनेकांच्या उंचावलेल्या भुवया पाहून त्यांनी शांतपणे त्या मागील शास्त्रीय कारण सांगितले.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : वहिनीविषयी आकर्षण वाढलंय, काय करू?

“ आपण सेक्स करतो तेव्हा आपला मेंदू खूप ऑक्झिटोसिन oxytocin हे संप्रेरक सोडतो. हा बाँडिंग एजंट आहे. ब्रेन अॅक्च्युअली वॉण्टस् टू बॉण्ड दोज टू पीपल हू आर हॅविंग सेक्स. दे विल स्टे कमिटेड फॉर देअर ऑफस्प्रिंग्ज. आपण पार्टनर्स बदलत राहतो तेव्हा आपला मेंदू गोंधळतो, आपल्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्याचा पुढे विवाहातील लैंगिक नात्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न मेंदूला पडतो.”
“दुसऱ्या वक्त्याने याचे छान उदाहरण दिले. ‘बेवक्त बारिश’ हा एक सिनेमा आला होता म्हणे. अयोग्य वयात अयोग्य व्यक्तीशी सेक्स होताना काळजी घेतली जात नाही आणि त्यातून तिला एड्स होतो आणि त्याचे किती विपरीत परिणाम तिच्यावर आणि तिच्या कुटुंबियांवर होतात असे काहीसे ते कथासूत्र होते. त्यांचं म्हणणं, पाऊस हा पिकांसाठी गरजेचाच आहे; पण तो अवेळी झाला तर पिकांचे जसे नुकसान करतो तसेच माणसांचेही असते त्यामुळे ‘रात गयी बात गयी’ इतका हा साधा मामला नाही. यू हॅव टू ओन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑप यूवर अॅक्ट.”

आणखी वाचा : दर्द होता है, वही मर्द होता है!

“दुसरं त्यांनी सांगितलं, की प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ ठरवली आहे. त्यावेळी ती केली तरच त्यात एक्साईटमेंट, ओढ, आकर्षण राहतं. लग्नाच्या आधीच सर्व करून झाले असेल तर नावीन्य काहीच राहिलेलं नसतं. त्यामुळे जोडीदाराबरोबरचं ‘बोअरडम’ फार लवकर येतं. मन वेगळ्या, अधिक आकर्षक वाटणाऱ्या व्यक्तीकडे ओढलं जाऊ शकतं. यातून विवाहबाह्य संबंध तयार होतात. यात फसवणूक तर होतेच, शिवाय विश्वासाला तडा जातो. नातेसंबंध बिघडतात. त्यातूनच फोन चेक करत राहाणं वगैरे प्रकार घडतात. त्यातून लपवालपवी अधिकच वाढते. वैवाहिक नाते दुरावायला लागते. या सगळ्यातून आनंद, समाधान वजा होत जातं. लग्न करण्याचा हेतूच साध्य होत नाही. नातं कोरड होतं, समाजाला दाखवण्यापुरत उरतं. अशा अनेक केसेस त्यांच्याकडे सतत येत असतात असं ते दोघेही सांगत होते.”
पम्याची अस्वस्थता किती योग्य होती हे सगळ्यांनाच जाणवलं.
“मुग्धा तुझी कमाल आहे हं. तू पम्याला सुद्धा ‘सीरियस’ बनवलंयस’ असं म्हणत सगळे हसत सुटले, पण चेहऱ्यावरचे गंभीर भाव ठेवूनच…
vankulk57@yahoo.co.in

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Relationship marriage counselling sex before marriage and multiple sex partners why to avoid vp

First published on: 11-10-2022 at 19:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×