शीर्षक वाचून हसायला येतंय न? अहो, काही गोष्टी इतरांना हसण्यावारी नेण्यासारख्या वाटल्या तरी त्या गोष्टी निस्तरता निस्तरता घरातील बाईच्या नाकीनऊ येतात त्याचं काय? नाही समजलं? म्हणजे असं, आपण जेव्हा एकत्र कुटुंबात राहतो तेव्हा बऱ्याचदा नवरा-बायकोला काही गोष्टी उघडपणे सांगता येत नाही. उगाच चर्चा नको, वाद नको, कुणाच्या भावना दुखवायला नको, म्हणून घरी नेमकं काय आणि किती सांगायचं हे ते नवरा-बायको मिळून ठरवतात आणि बहुतांश वेळा ती बिचारी शब्दाला जागत ठरल्याप्रमाणे बोलते, पण नवरा मात्र सर्रास विसरून जातो. खरं काय ते सांगून मोकळा होतो आणि ती तोंडावर पडते.

आणखी वाचा : तुमच्यासाठी ‘महिला’ म्हणजे प्रसिद्धीचं खेळणं आहेत का?

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा
How Much Green Tea Should One Drink In A Day?
Green Tea: ग्रीन टी दिवसातून किती वेळा घ्यावी? ग्रीन टी पिताना ‘या’ चुका करु नका

एक अगदी साधंसं उदाहरण सांगायचं तर, कधी कधी नवरा-बायको कामावरून येताना सहज गाड्यावर थांबून पाणीपुरी, भेळ असं काही तरी खातात. घरी पूर्ण स्वयंपाक तयार असतो. मग दोघं ठरवतात, की ऑफिसमध्ये काही तरी खाणं झालं असं सांगू या. नवरोबा मान हलवून हो म्हणतो. या खोटं बोलण्यात कुणाला दुखावण्याचा हेतू नसतो, उलट घरचं अन्न वाया जाईल ही बोच असते. ते उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी खाण्याची तयारीही असते; पण हे इतकं सहज घडवून आणेल तो नवरा कसा? घरी मातोश्रींनी जेवणाचं विचारलं की, ‘निरागस चिरंजीव’ म्हणतात, “भूक नाही गं, आम्ही नं, चाट खाऊन आलो.” मातोश्री खट्याळ नजरेनं सुनेकडे बघतात, कारण सूनबाईनी ठरल्याप्रमाणे दुसरं कारण सांगितलेलं असतं. आपण काही तरी लपवायचं ठरवलं होतं हे नवऱ्यामंडळींना अजिबात लक्षात राहात नाही आणि बायको तोंडघशी पडते.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मुलीला मासिकपाळीची माहिती कधी द्यावी?

कधी तिच्या माहेरी तिच्या भावाला किंवा बहिणीला शिक्षणासाठी पैसे द्यायची वेळ येते. अशा मदतीची चर्चा न करता गप्प राहाण्याचं ठरतं; पण बोलता बोलता नवरोजी आईवडिलांना सांगून टाकतात आणि तिला विनाकारण लपवालपवी केल्याचा अपराधभाव सहन करावा लागतो. असे दोन-तीन प्रसंग घडले, की तिच्या सासू-सासऱ्यांना तिच्याबद्दल नकळत साशंकता वाटायला लागते. आपला मुलगाच काय तो आपला, सून तर ऊठसूट खोटं बोलते असा समज होतो.
पती मंडळीस हे लक्षात घ्यावं लागेल, की घरातील मोठी मंडळी म्हणजे आपलेच आईवडील आहेत. मुलाच्या दहा चुका माफ असणार आहेत, कारण ते शेवटी जन्मदाते आहेत; पण आपली पत्नी या घरात नवीन आहे, जी आपल्या आईवडिलांचं मन जिंकण्यासाठी झटतेय. अशा वरवर किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींनी कालांतराने तिच्या प्रतिमेला थोडा का होईना धक्का लागू शकतो. त्यामुळे बोलताना थोडं भान ठेवून बोलण्याची आणि ठरलेलं न विसरता बोलण्याचीही गरज आहे. ही सांभाळून घेण्याची गरज अर्थातच दोन्ही बाजूंनी व्हायला हवी. पत्नीनंदेखील स्वतःवर ताबा ठेवत नवऱ्याला (वेळोवेळी चुकीचं बोलल्या गेल्यामुळे) खजील होण्यापासून वाचवलं पाहिजे, सावरून घेतलं पाहिजे; पण घरात होणाऱ्या प्रसंगात बहुतांश वेळी त्याच्याकडून चूक होते असा अनुभव आहे.

आणखी वाचा : दर अकराव्या मिनिटाला जगात एक स्त्रीहत्या! हत्या करणारे नातेवाईक किंवा जवळचेच- संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

नयनाला तिच्या ऑफिसकडून तीन महिने अमेरिकेला ट्रेनिंगसाठी जाण्याची संधी मिळाली. नेमकं त्याच काळात तिच्या नणंदेचं बाळंतपण होणार होतं आणि सासूबाई आजारी होत्या म्हणून ती काळजीत पडली होती. घरात तिच्या कामाचा आदर होता; पण वेळ अडचणीची होती म्हणून तीच विचार करत होती. घरी आत्ता काहीच बोलू नये, ट्रेनिंग पुढे ढकलता येतं का बघू या, असा दोघांनी विचार केला; पण शेवटी गोंधळ झालाच! नवरोबा बोलता बोलता काय ते बोलून गेलेच! नयनानं आधी सांगितलं नाही म्हणून सासूबाईंनी बरीच चिडचिड केली. घरातलं वातावरण तापलं. हे टाळता आलं असतं. क्षुल्लक गोष्टींचा ब्रह्मराक्षस होण्यापासून वाचवताना पतीपत्नीला जिभेवर ताबा ठेवता आला पाहिजे. अन्यथा ही आईवडिलांची मोठी ‘बाळं’ त्यांच्या बायकांना तोंडावर पाडण्यात जराही कमी पडणार नाहीत बरं!
adaparnadeshpande@gmail.com