आपल्याकडे मुलाने आणि विशेषतः मुलीने उत्तम शिक्षण घेणे आणि भरपूर पगाराची नोकरी मिळवणे यामागे त्यांनी एक संपन्न आयुष्य जगावे हा उद्देश तर असतोच, पण त्यामुळे सवोत्तम जोडिदार मिळावा हाही उद्देश असतो. मुलीच्या बाबतीत तर तिचं लग्न चागलं पार पडून ती श्रीमंत आणि मोठ्या घरात ‘पडावी’(?) हा छुपा उद्देश असतोच. पालकांच्या बाजूने लौकिक अर्थाने आयुष्य नीट मार्गी लावण्याच्या व्याख्येत उत्तम जीवनसाथी आणि उत्तम स्थळ मिळणे हे असतंच! त्यामुळे मुलीचं शिक्षण संपून ती कमावती झाली, की घरून लग्नासाठी आग्रह सुरू होतो. मात्र सर्वसाधारण विशेषत: शहरी मुलींचा आजकालचा अनुभव असा आहे, की ( प्रेम विवाह नसल्यास ) या मुलींना कधीच लवकर लग्न करून नवीन जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नसते.

आणखी वाचा : INDW vs IREW: धोनी, कोहली आणि रोहितला मागे टाकत हरमनप्रीत कौरने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली क्रिकेटपटू

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

लग्नानंतर नवीन नात्यात गुंतवून घेणे, पर्यायाने येणारी बंधनं स्वीकारणे, आणि आपल्या आयुष्याची दोरी इतर अनोळखी लोकांच्या हातात देणे हे मुलींना नकोसं वाटतं. या शिवाय एक अत्यंत सार्वत्रिक अनुभव म्हणजे लग्नाच्या बाजारात (?) उभं राहताना काही अग्रगण्य वर वधु संशोधन विवाह संस्थांसाठी ऑनलाइन नोंदणी करणं, हा आजच्या काळात ठरवून लग्न करताना योग्य उमेदवार शोधण्याचा एक उत्तम मार्ग आहे हे जरी खरं असलं, तरी त्या सगळ्या ‘साईट्स’ म्हणजे मुलींना ‘खुली किताब’ वाटतात. आपले विवाह विषयक प्रोफाईल असं लोकांसमोर मांडताना त्यांना थोडं अवघडल्या सारखं होतं. काही मुलं मुली ही प्रक्रिया आनंदाने आणि खेळकरपणाने पार पाडतात, पण तितका मोकळेपणा सर्वांनाच जमतो असं नाही. एकंदर काय, तर लग्न कर म्हणून आई वडील मुला मुलींच्या मागे लागतात, आणि लग्नाळू अपत्य मात्र ती याचिका फेटाळून लावतात .

आणखी वाचा : आता एकटी मुस्लिम महिलाही करु शकणार ‘हज’ यात्रा; ‘मेहरम’अर्थात गार्डियनसंदर्भातला नियम शिथील

आनंदीची आई देखील अशीच तिच्या मागे लागली होती. “आनंदी, अगं, प्रज्ञा मावशीनं एक मुलगा सुचवला आहे बघ. प्लीज त्याचं प्रोफाईल बघून घेतेस का?” आता मुलगी चिडणार हे गृहीत धरून आईनं प्रस्ताव मांडला. “आई, तू हे स्थळ स्थळ खेळून थकत नाहीस का गं?” हे किमान बारावं स्थळ असेल आता. मला इतक्यात लग्नच नाही करायचं.”
“इतक्यात म्हणजे? सत्तावीस वर्ष झाली आता. आता नाही तर काय म्हातारी झाल्यावर लग्न करणार आहेस का?”
“मला लग्न करून सुखाचा जीव दुःखात टाकणारा नवरा नकोय आई. तुमच्या पिढीनं पदोपदी मन मारून त्याग करून संसार केलाय … मला तसं नाही जमणार. मुलगा माझा जीवनसाथी म्हणून योग्य असल्याची पूर्ण खात्री पटल्यावरच मी लग्न करेन.”.
“अशी खात्री कोण देणार ? आणि लग्नानंतर निराशा वाटली तर ?”
“तर मी संसार रेटत नाही बसणार . इतके कष्ट घेऊन शिक्षण घेतलं ते आयुष्याचा नरक करण्यासाठी नाही ना, योग्य जोडीदार मिळण्यास उशीर होत असेल तर तेच सही, पण नको ती ‘रिस्क’ नाही घ्यायची.” आनंदी आपल्या मतावर ठाम होती.

आणखी वाचा : सॅलीला सॅल्यूट! …एक धाव मदतकार्यासाठी!

स्वरानं घरच्या तगाद्यामुळे बी. ए झाल्याबरोबर लग्न केलं. वय जेमतेम एकवीस. उत्तम श्रीमंत स्थळ आलं म्हणून नातेवाईकांनी देखील बराच दबाव आणला होता. खरं तर स्वराला उच्च पदवी घ्यायची होती, आपल्या पायावर उभं राहायचं होतं … पण सासरकडच्यांनी तिच्या पुढील शिक्षणास मनाई केली. एका अपघातात तिच्या पतीचं निधन झालं आणि चार वर्षाच्या मुलीला घेऊन तिला माहेरी परतावं लागलं. आजच्या काळाची अनिश्चितता बघता मुलगी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याशिवाय लग्नाची घाई करू नये ही समज येण्यासाठी असा दुर्दैवी अनुभव घ्यावा लागला.

आणखी वाचा : चॉकलेटमुळे फक्त मनच नाही त्वचेलाही वाटतं ‘फील गुड’

मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाचा विषय आणि त्यावरील चर्चा करताना घरात खूप सहज आणि खेळीमेळीचं वातावरण असल्यास आपल्या मुलामुलीची बाजू काय आहे, अपेक्षा काय आहे ते नीट समजेल. मोकळा संवाद नसेल तर विनाकारण मागे लागले म्हणून मुली पालकांचा राग करतात. त्यांना आपली आत्ताच लग्न न करण्याबाबतची भूमिका समजावून सांगितल्यावर ते समजून घेतील असा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर अशा काळात घराघरात वादाला तोंड फुटून तो शिगेला जाऊन समर प्रसंग उद्भवतात. घायकुतीला येऊन निर्णय घेतल्यास पुढे मनस्ताप सहन करावा लागतो. हे सगळं टाळता येऊ शकतं, त्यासाठी लग्नाळू अपत्यांना खुल्या मनाने मोठ्यांना समजेल अशा शब्दात आपली बाजू मांडावी लागेल .
adaparnadeshpande@gmail.com

Story img Loader