हातापायांवर किंवा चेहऱ्यावर येणारे केस स्त्रिया वॅक्सिंग, शेव्हिंग किंवा हेअर रीमूव्हल क्रीम्स वापरून काढून टाकतात. ही प्रक्रिया जशी आठवणीनं ठरावीक दिवसांनी केली जाते, तसंच ‘त्या’ ठिकाणचे केस- अर्थात ‘प्युबिक हेअर’सुद्धा ठरावीक कालावधीनं ‘ट्रिम’ करणं आवश्यक आहे. त्यामुळे जननेंद्रियांची स्वच्छता राखणं सोपं होतं आणि स्त्रियांना तिथे होणारे ‘युरिन इन्फेक्शन’सारखे संसर्ग होणं टाळणंही आटोक्यात येतं. (हे केस पूर्णतः काढून टाकावेत का, याबद्दल मात्र प्रवाद आहे. ) प्युबिक हेअर केस ट्रिम करताना काय काळजी घ्यावी याबद्दल ‘एएडी’ अर्थात ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी असोसिएशन’नं काही टिप्स दिल्या आहेत. त्या पाहू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : केवळ ३१ टक्के भारतीय महिलांहाती मोबाईल! ; डिजिटल दरी वाढतेय!

‘त्या’ ठिकाणचे केस उभं राहूनच ट्रिम करा
उभं राहिल्यावर आपण नेमके कशा प्रकारे केस ट्रिम करतोय हे नीट दिसतं. त्यामुळे प्युबिक हेअर ट्रिम करताना बसून करण्यापेक्षा उभं राहूनच केलेले चांगले. म्हणजे अपघाताची वा कापण्याची शक्यता कमी होईल.

‘ते’ केस ट्रिम करण्यासाठी इतरांची मदत नको
तुम्ही जेव्हा घरच्या घरी प्युबिक हेअर ट्रिम करता, तेव्हा ते आपले आपणच करणं आवश्यक आहे. इतर कुणाला ते काम करायला सांगू नका. याचं कारण हेच, की तुम्हाला तुमच्या त्वचेचा, अवयवांचा अंदाज अधिक चांगला असतो. यामुळे कुठे ट्रिम करायचं, कुठे नाही, हे तुम्हालाच जास्त चांगलं समजेल. इतर व्यक्ती कितीही जवळची असली, प्रशिक्षित असली, तरी केस ट्रिम करताना हात कुठे सैल सोडावा, कुठे ट्रिम करून नये, याचा तिला तुमच्याइतका चांगला अंदाज येणार नाही. त्यामुळे आपलं आपण ट्रिम केल्यास अपघात व्हायची शक्यता कमी होईल.

आणखी वाचा : मेनिक्युअर-पेडिक्युअर करताय?… नखांसाठी लक्षात घ्या या टिप्स

रेझर वापरताना…
तुम्ही जर केस ‘शेव्ह’ करणार असाल तर ‘त्या’ ठिकाणी वापरण्यासाठीचं रेझर वेगळं ठेवा आणि ते नेहमी स्वच्छ आणि कोरडं राहील असं पहा. शेव्हिंग करण्याची पद्धतही योग्य हवी, त्यासाठी थोडा सराव लागतो. शेव्हिंगनंतर आपल्या त्वचेला चालेल असं, चांगल्या दर्जाचं मॉइश्चरायझर वापरलेलं बरं.

आपली हेअर रेमूव्हल साधनं स्वतंत्र ठेवा
शेव्हिंग, ट्रिमिंग, वॅक्सिंग या कशाहीसाठीची आपली साधनं इतर कुणालाही वापरायला देऊ नका आणि तुम्हीही इतरांची वापरू नका. कारण तिथले केस काढून टाकताना त्वचेवर सूक्ष्म स्वरूपात कापलं जाऊ शकतं, ते तुमच्या कदाचित लक्षातही येणार नाही, पण एकमेकांची साधनं वापरली तर त्याद्वारे विषाणू वा जीवाणू संसर्ग, लैंगिक संसर्गातून पसरणाऱ्या आजारांचा संसर्गही होऊ शकतो.

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : ‘तुमची ‘चीड’ कोणती?’

वॅक्सिंग सलूनमध्ये गेल्यावर-
काही जण सलूनमध्ये जाऊन त्या ठिकाणी वॅक्सिंग करून घेतात. अशा वेळी गरम वॅक्स त्वचेवर पसरवण्यासाठी पसरट लाकडी पट्ट्यांचा वापर केला जातो. ही क्रिया करताना संबंधित व्यक्ती एकच वॅक्सिंग स्टिक पुन्हापुन्हा वापरते, की एकदा गरम वॅक्स त्वचेवर लावून झाल्यावर नव्या स्टिकनं वॅक्स घेते, हे पाहायला हवं. यातल्या पहिल्या प्रकाराला ‘डबल डिपिंग’ म्हणतात आणि ते टाळायला हवं. योग्य पद्धत अशी, की प्रत्येक वेळी वॅक्स घेताना नवी वॅक्स स्टिक वापरायला हवी. एकाच व्यक्तीचं वॅक्सिंग सुरू असलं तरीही हे पाळायला हवं. का? कारण एकदा वॅक्स स्टिकनी त्वचेवर वॅक्स पसरवलं, की त्या स्टिकवर व्यक्तीच्या (ग्राहकाच्या) त्वचेच्या पेशी, काही केस आणि जीवाणू चिकटतात. तीच स्टिक पुन्हा गरम वॅक्समध्ये बुडवली, की हे घटक त्या वॅक्समध्ये मिसळतात. वॅक्स निमगरम/ कोमट असतं. जीवाणू वाढीला लागायला योग्य परिस्थिती तिथे निर्माण झालेली असू शकते. त्यामुळे डबल डिपिंग केलं जात असेल तर आपल्याला संसर्ग होऊ शकतो.

आणखी वाचा : Gujarat Election : १६२१ उमेदवार; त्यातील महिला फक्त १३९!

लेझर हेअर रिमूव्हल
लेझर हेअर रिमूव्हल हा पर्याय आकर्षक वाटला, तरी ते प्रशिक्षित व्यक्तीकडूनच आणि स्वच्छतेचे सर्व आवश्यक निकष पाळणाऱ्या ठिकाणीच करून घेणं इष्ट. शिवाय मुळात त्याची तुम्हाला गरज आहे का? तुमच्या त्वचेला ते चालेल का? त्यातले धोके/ काळजीची स्थानं कोणती? याबाबत त्वचारोग तज्ज्ञांशी बोलून घेणं उत्तम.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Removal of pubic hair how to take care waxing shaving trimming vp
First published on: 08-12-2022 at 12:47 IST