बंगळुरूच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या दिव्याने बायजूजमध्ये शिक्षिका सुरुवात केली तो काळ ऑफलाइन क्लासेसचा होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रामध्ये कसा वापर करून घेता येईल, हे शिकण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. आज ‘ती’च दिव्या बायजूजची सहसंस्थापक आणि संचालक आहे. एवढेच नाही तर भारतातील सर्वात श्रीमंत महिला स्टार्टअप संस्थापकांपैकी एक असून ‘कोटक हुरून’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार दिव्या गोकुळनाथची एकूण संपत्ती साडेचार हजार कोटी इतकी आहे. बायजूजचे सध्याचे बाजारमूल्य २३ अब्ज डॉलर्स इतके असून गेल्या वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत ते अधिक आहे. गेल्या आठ महिन्यांत त्यांच्या मूल्यांकनात ३६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जाते.

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : का तो नेहमी असंच वागतो?

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
UPSC third topper Ananya Reddy
पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये तिसरे स्थान! पाहा, कशी केली अनन्या रेड्डीने परीक्षेची तयारी…
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 

भारतीय स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात श्रीमंत महिलेचे स्थान मिळवणारी दिव्या गोकुळनाथ आहे तरी कोण…. दिव्याचे वडील अपोलो हॉस्पिटलमध्ये मूत्रविकारतज्ज्ञ तर आई दूरदर्शनवर प्रोग्रॅमिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहत होती. साहजिकच घरात शिक्षणाचे वारे वाहतच होते. वडिलांनी दिव्याला विज्ञानाची आवड लावली. फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमधून तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि तिने आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बंगळुरू येथून बायोटेक्नॉलॉजीत अभियांत्रिकीची पदवी घेतली. २००७ साली पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिची भेट बायजूजचे रवींद्रन यांच्याशी झाली. ते जीआरई परीक्षेची तयारी करून घेत असत. २००८ मध्ये त्या दोघांनी लग्न केले आणि दिव्याने तिथेच शिकवण्यास सुरुवात केली, त्या वेळी ती फक्त २१ वर्षांची होती.

आणखी वाचा : विश्लेषण : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ या STEM क्षेत्रातील लैंगिक गुणोत्तराची तफावत

शैक्षणिक क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, अशा विचाराने तिने २०११ मध्ये पतीसह ‘बायजूज ऑनलाइन एज्युकेशन’ची सहस्थापना केली. सुरुवातीला शालेय शिक्षणाला साह्य म्हणून तिने पाठ्यपुस्तकांतील धड्यांवर आधारित अॅप २०१५ मध्ये सुरू केले. त्या व्हिडीओमध्ये दिव्याने स्वतः ऑनलाइन धड्यांबद्दल विस्ताराने समजावून दिले आहे. भारतात २०१९ नंतर आलेल्या कोरोना महासाथीमध्ये तिने या व्यासपीठाचा सर्वतोपरी उपयोग करून घेत स्वतःचा तोवरचा अनुभव, माहिती आणि ब्रँड मार्केटिंग याची सांगड घालत अनेक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा नेऊन पोहोचवली. मार्च, एप्रिल २०२० मध्ये बायजूजने अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी विनामूल्य प्रवेश दिला. यामुळे बायजूजच्या वापरकर्त्यांमध्ये कित्येक पटींनी वाढ झाली. सप्टेंबर २०२० पर्यंत सात कोटी विद्यार्थी त्यांचे सदस्य झाले.

आणखी वाचा : Women’s Day 2023 : आकाशाला गवसणी घालणारी कॅप्टन कृतज्ञा

मार्च २०२२ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची ईडीटेक टास्कफोर्स लीडर म्हणून तिची निवड झाली. त्यापूर्वी फॉर्च्युन इंडिया, फेमिना, फोर्ब्ज इत्यादींनी शक्तिशाली महिला, व्यावसायिक महिला म्हणून तिचा गौरव केला आहे. डिकोडिंग मीडियाच्या पीडब्लूआय वुमन आंत्रप्युनर ऑफ द इअरने २०२० साली ती सन्मानित झालेली आहे. घर आणि करिअर यांचा समतोल राखण्याला दिव्या महत्त्व देते. करोना काळाने शिक्षणाच्या मिती जशा बदलल्या तसे प्रत्यक्ष व्यावहारिक, कार्यालयीन जीवनातही बदल घडून आले. महासाथीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करताना मुलांचे ऑनलाईन शिक्षण, आपल्या कार्यालयीन मीटिंग्ज, शैक्षणिक व्हिडीओ तयार करणे हे सर्व काही ती उत्तम तऱ्हेने सांभाळू शकली. म्हणूनच आज ती एक यशस्वी, नामांकित भारतीय उद्योजिका आणि काळाची पावले ओळखून चालणारी शिक्षणतज्ज्ञ आहे.