टीव्हीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातील मराठमोळ्या मुलींनी देशभरातील प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. ज्ञानेश्वरी घाडगे आणि कार्तिकी घाडगे असं या मुलींचं नाव आहे. ज्ञानेश्वरीनं तिच्या गायकीनं आणि गोड आवाजानं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. तर कार्तिकीनं वाजवलेल्या हार्मोनियमला परीक्षकांची चांगलीच दाद मिळाली आहे. १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमातील या दोघींचे व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चे परीक्षक शंकर महादेवन आणि अनु मलिक यांच्याकडून ज्ञानेश्वरीच्या कलेचं कौतुक केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्ञानेश्वरीच्या गायकीचं होतंय कौतुक

ज्ञानेश्वरी ही गणेश घाडगे या रिक्षा चालकाची मुलगी आहे. ठाण्यामध्ये तिचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी ज्ञानेश्वरी शालेय गणवेशातच पोहोचली होती. तिच्या या ऑडिशनचा व्हिडीओ इंटरनेटवर बराच व्हायरल झाला होता. या ऑडिशनमध्ये ज्ञानेश्वरीनं गायलेल्या शास्त्रीय गाण्यानं परीक्षकांसह प्रेक्षक अवाक झाले होते. यावेळी परीक्षकांकडून सुवर्णपदकानं तिचा गौरव करण्यात आला होता.

‘या’ शाळकरी मुली अंतराळात पाठवणार उपग्रह !

परीक्षकांनी दिलं होते ‘स्टॅडिंग ओवेशन’

‘झी’ टीव्हीवरील या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, संगीतकार अनु मलिक आणि गायिका नीती मोहन परीक्षक आहेत. ज्ञानेश्वरीनं ऑडिशनमध्ये गायलेल्या गोड आवाजातील गाण्यानं या तिन्ही परीक्षकांना उभं राहून टाळ्या वाजवण्यास भाग पाडलं होतं. या मराठमोळ्या मुलीच्या सादरीकरणानंतर स्टूडिओमध्ये केवळ टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ज्ञानेश्वरी मोठी दावेदार असल्याचं मत परीक्षकांनी व्यक्त केलं आहे.

मॅट्रिमोनिअल साइट्सवर शोधत आहात आयुष्याचा जोडीदार? फसवणुकीपासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

ज्ञानेश्वरीच्या कुटुंबातील सदस्य ‘धनश्री’

ज्ञानेश्वरीच्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत. ज्ञानेश्वरीसह आई, वडील, भाऊ, बहिण आणि गणेश घाडगे चालवत असलेली रिक्षा ‘धनश्री’. घाडगे कुटुंबीय रिक्षेलाही कुटुंबाचाच अविभाज्य भाग मानतात. या व्यवसायातून धन मिळत असल्यानं रिक्षेचं नाव ‘धनश्री’ ठेवल्याचं गणेश घाडगे सांगतात. आजपर्यंत मी रिक्षेनं लोकांना गेटपर्यंत सोडायचो, मात्र माझ्या मुलीनं मला आज पहिल्यांदा गेटच्या (लिटिल चॅम्प) आत आणलं आहे, अशी भावना घाडगे यांनी व्यक्त केली. “बोलणं सुरू केल्यापासूनच ज्ञानेश्वरी गाणं गुणगुणते. ती खूप चांगली गाते, याचा आम्हाला खूप आनंद आहे. तिला या क्षेत्रात आमचा पूर्ण पाठिंबा आहे” असे घाडगे यांनी म्हटले आहे.

कार्तिकीला महादेवन यांच्याकडून कौतुकाची थाप

ज्ञानेश्वरी आणि कार्तिकीच्या सादरीकरणानंतर या दोघी बहिणींचं परिक्षकांनी व्यासपीठावर येत कौतुक केलं. दोघींच्या कलेनं उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. ज्ञानेश्वरीला सुवर्णपदक देऊन सन्मान करताना शंकर महादेवन यांनी कार्तिकीच्या कलेचही तोंडभरून कौतुक केलं. हे सुवर्णपदक दोघींचही असल्याचं ते यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sa re ga ma pa lil champs contestant dnyaneshwari ghadge singing video trending on social media facebook twitter rvs
First published on: 30-10-2022 at 12:37 IST