केतकी जोशी

सरगम कौशल हे नाव तुमच्या कानावर सध्या पडलं असेल. ही आहे नवीन मिसेस वर्ल्ड. यंदाचा म्हणजे २०२० चा मिसेस वर्ल्डचा किताब सरगमनं भारताला जिंकून दिला आहे. तब्बल २१ वर्षांनी भारताला मिसेस वर्ल्ड हा किताब मिळाला होता. आदिती गोवित्रीकर हिनं २००१ मध्ये मिसेस वर्ल्डचा मुकुट जिंकला हेाता. मिस इंडियापासून ते मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स आणि असंख्य ब्युटी पेजंट्सच्या गर्दीमध्ये मिसेस वर्ल्ड ही स्पर्धा अत्यंत वेगळी ठरते. लग्नांतर सौंदर्य, फॅशन, ब्युटी, फिटनेस यांचा फारसा संबंध नसतो असं मानणाऱ्या आपल्या या जगात ही स्पर्धा आपलं वेगळेपण टिकवून ठेवते. ही स्पर्धा १९८४ मध्ये सुरू झाली. सुरुवातीला या स्पर्धेचं नाव ‘मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड’ असं होतं. १९८८ मध्ये या स्पर्धेला ‘मिसेस वर्ल्ड’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. गेल्या काही वर्षांत ८० पेक्षा जास्त देशांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेनं आतापर्यंत सगळ्यात जास्त मिसेस वर्ल्डचे किताब जिंकले आहेत.

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
after germany us reacts to arvind kejriwal s arrest
अन्वयार्थ : अस्थानी त्रागा..
Iranian girl Faiza come in Uttar Pradesh Moradabad
सीमा हैदर प्रकरणाची पुनरावृत्ती: युपीतल्या तरुणासाठी इराणी तरुणीचा भारतात प्रवेश; म्हणाली, “पहिलं अयोध्येत जाऊन…”

हेही वाचा >>>भावंडांमध्ये दरी का निर्माण होते ?

आपल्याकडे लग्न झालं म्हणजे मुलीचा ग्लॅमर जगताचा किंवा मॉडेलिंगचा रस्ताच बंद झाला असं मानलं जातं. याचं कारण- आपली मानसिकता. लग्न झालं की बाईनं तिचं घर, संसार, मुलंबाळं, जबाबदाऱ्या यांच्याकडेच पाहावं अशी अपेक्षा अजूनही असते. आता तर नोकरी सांभाळून तिनं हे करावं अशी अपेक्षा असते. सध्याच्या अनेक अभिनेत्रींनी लग्न झाल्यानंत, मुलं झाल्यानंतरही चित्रपट क्षेत्रात उत्तम काम केलं आहे, करत आहेत. लग्नानंतर, आई झाल्यानंतरही त्या तितक्याच ग्लॅमरस दिसू शकतात याची अनेक उदाहरणं आहेत. विशेष म्हणजे गर्भारपणातही अनेक अभिनेत्रींनी चित्रपटात काम केलंय. लग्न, बाळंतपण हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातले टप्पे आहेत, ते तिच्या करीअरमध्ये अडथळे ठरू नयेत. सरगमसाठीही हे सगळं सहज सोपं नव्हतंच. पण तिनं जिद्दीनं स्वप्नं पूर्ण केलं.

हेही वाचा >>>तुम्ही कोणत्या प्रकारची आई आहात?

देशातील महिला आमदारांची संख्या केवळ ८ टक्के!३२ वर्षांची सरगम मूळची जम्मू काश्मीरची आहे. तिचं सगळं शिक्षण जम्मूमध्येच झालं आहे. तिनं इंग्लिश साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तिनं बी.एड केलं. २०१८ मध्ये तिचं लग्न झालं. तिचे पती इंडियन नेव्हीमध्ये आहेत. सरगमनं विशाखापट्टणमच्या एका शाळेत शिक्षिका म्हणूनही काम केलं आहे. एरवी लग्नानंतर वेगळं काही करायचं म्हटलं की मुलीला तिचे आईवडिलही ‘आता कशाला’ असं म्हणतात. पण सरगमच्या बाबतीत उलटं घडलं. आपली मुलगी सौंदर्यस्पर्धेत यशस्वी होऊ शकते असा विश्वास तिच्या वडिलांना होता. मिस इंडियामध्ये भाग घेण्यासाठी ते तिच्या मागे लागले. पण तिचं लग्नं झालं आणि तो विषय तिथंच थांबला. लग्नानंतर तरी तिनं काहीतरी करावं असं तिच्या वडिलांना वाटत होतं. सरगम मुंबईत आली. आता मायानगरीत आली आहेस, आता तरी काहीतरी कर असं तिचे वडील तिला सतत सांगत होते. तिनं स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तयारी सुरू केली आणि तिच्या नवऱ्यानं तिला अगदी योग्य अशी साथ दिली. सरगम मिसेस इंडिया झाली आणि मग मात्र तिनं मागं वळून पाहायचं नाही असंच ठरवलं. त्यामुळे जिद्दीनं, अथक मेहनतीनं तिनं जागतिक स्पर्धेची तयारी केली आणि ५१ स्पर्धकांमध्ये ती अव्वल ठरली.

हेही वाचा >>>देशातील महिला आमदारांची संख्या केवळ ८ टक्के!

सरगमला मिळालेला हा मानाचा मुकूट म्हणजे तिच्या एकटीचं नाही तर भारतातल्या लाखो महिलांचं स्वप्नं आहे. लग्नांतरही स्त्रिया ग्लॅमर वर्ल्डमध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतात हे तिनं दाखवून दिलं आहे. यापूर्वी २००१ मध्ये आपल्याला मिस वर्ल्ड जिंकून देणारी आदिती गोवित्रीकर हिच्या मते, ग्लॅमर वर्ल्डमध्ये लग्न झालं की काम मिळणं बंद होईल अशी भीती अनेकींना वाटायची. त्यामुळे कित्येकजणी रिलेशनशीप असतील किंवा लग्न झालं असेल तर ते लपवून ठेवायच्या. आता मात्र परिस्थिती बरीच बदलली आहे. अर्थात पूर्ण सुधारली मुळीच नाहीये. ब्युटी कॉन्टेस्टसाठी सौंदर्य, फिटनेसबरोबरच प्रचंड आणि अथक मेहनत करण्याची तयारी, वेळ, निष्ठा, आत्मविश्वास अशा सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. ही फक्त दिसण्याची स्पर्धा नसते तर तुमच्या व्यक्तिमत्वाचीही कसोटी असते. लग्नानंतर घर संसाराच्या जबाबदारीत अडकलेल्या आपल्याकडे लक्षही न देणाऱ्या स्त्रियांसाठी अशा स्पर्धा म्हणजे टिंगलीचा विषय असतो. ‘आपल्याला कुठे मिसेस वर्ल्डमध्ये जायचंय?’ असा प्रश्नही त्यांच्या मनात असतोच. लग्नानंतर इंजिनियर, डॉक्टर, आर्किटेक्ट, आयटी अशा सगळ्या क्षेत्रांतल्या स्त्रियांचं करिअर सुरूच असतं. किंवा किमान मॅनेज तरी केलं जातं. त्यासाठी वेगळं कौशल्य लागतं. लग्न झाल्यानंतरही घर आणि ऑफिस असं काम करतेय असं कौतुकही कित्येकींच्या वाट्याला येतं. पण ग्लॅमर जगतात मात्र असं होत नाही. अनेकदा पात्रता असूनही केवळ लग्न झालं म्हणून स्त्रियांना संधी दिली जात नाही. वर्षानुवर्षे एखाद्या स्वप्नपूर्तीसाठी काम केल्यानंतर क्षणात संधी गेली तर ती स्वप्नं पूर्ण होतंच नाहीत. या झगमगाटाच्या दुनियेतलं हे क्रूर वास्तव आहे. पण एखादी सरगम असतेच, जी ही स्वप्नं विझू देत नाही. तिच्या आणि तिच्यासारख्या असंख्य मुलींच्या मनातली स्वप्नांची ज्योत ती तेवत ठेवते…