प्रश्न : मी २४ वर्षांचा एक अविवाहित युवक आहे. महिन्याभरापूर्वी मी माझ्या आध्यात्मिक गुरुंकडून मन:शांतीसाठी दीक्षा घेतली व त्याचबरोबर ब्रह्मचर्याची, कोणत्याही स्त्रीशी संग न करण्याची शपथही घेतली. शपथ घेतल्यापासून माझ्या मनात लैंगिक विचारांचं थैमान सुरू झालं आहे. पूर्वी असं होत नव्हतं. दिवसरात्र लैंगिक विचार, कल्पना व आकृत्या मनात येत राहतात. झोपेतही केवळ स्त्रियांची कामुक स्वप्नंच पडत राहतात. मी संयम बाळगण्याचा खूप प्रयत्न करतो, पण मन व शरीर दोन्ही साथ देत नाहीत. गुरुंना हे कळलं तर काय होईल, या भीतीने मी घाबरून गेलो आहे. आपल्याला संयम पाळता येत नाही, हा न्यूनगंडही मला सतत अस्वस्थ करत आहे.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : दुटप्पी वासनेमागेपासून सावध

wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू

उत्तर : तुमच्या बाबतीत जे घडतंय ते घडलं नसतं तरच नवल ! ब्रह्मचर्याची अनैसर्गिक शपथ घेऊन तुम्ही स्वत:शीच लढाई सुरू केली आहे. या लढाईत दोन्हीकडून तुमची हारच होणार. वयपरत्वे लैंगिक विचार मनात येणं, लैंगिक भावना उचंबळून येणं, लैंगिक स्वप्न पडणं या नैसर्गिक गोष्टी आहेत. निसर्गाने निर्माण केलेल्या व्यवस्थेनुसार या वयात असं घडणं अगदी स्वाभाविक आहे. लैंगिकता आपण मागून येत नाही. निसर्ग योग्य वयात स्वत:हून लैंगिकता आपल्याला बहाल करतो. तिचा सहजपणे स्वीकार करणंच योग्य व शुभ.

आणखी वाचा : लैंगिक प्रश्नोत्तरे : मोठ्या भावाची ‘काळजी’

बाहेरून घेतलेल्या ब्रह्मचर्याच्या शपथा व लादलेला संयम हा तुमच्या स्वाभाविकतेच्या विरुद्ध आहे. तो निसर्गनियमांत न बसणारा आहे. त्यामुळे जितका तुम्ही संयम बाळगण्याचा प्रयत्न कराल व लैंगिकतेला दाबण्याचा प्रयत्न कराल, तितक्या जोरात लैंगिकता उचंबळून येईल; व अगदी हेच तुमच्या बाबतीत घडतंय. अशा ब्रह्मचर्यात काय अर्थ की, ज्यामध्ये बाह्यांगी तुम्ही स्त्रीजातीशी कसलेही संबंध ठेवणार नाही; पण मनात मात्र सतत असंख्य स्त्रियांच्या कामुक कल्पनांमध्ये तुम्ही गुंतलेले राहणार?

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : जबाबदार लैंगिक संबंधांचं वय कोणतं?

ब्रह्मचर्याचा जन्म जोपर्यंत तुमच्या आतून होत नाही, तुम्ही मनापासून तो स्वीकारत नाहीत, तोपर्यंत बाहेरून पांघरलेलं बेगडी ब्रह्मचर्य केवळ मानसिक ताण व अस्वस्थता निर्माण करत राहील. असं अनैसर्गिक व्रत तुम्हांला इतर सामान्यजनांपेक्षा जास्त कामुक बनवेल.
‘लैंगिकता’ हे परमेश्वरनिर्मित असं मनुष्यजीवनाचं एक अत्यंत स्वाभाविक व परिपूरक असं अंग आहे. शरीराच्या इतर क्रिया – प्रक्रियांप्रमाणे लैंगिकता हीसुद्धा शरीर व मन यांची एक गरज आहे. तिचा सहज स्वीकार केल्यास ती तुम्हाला सतावणार नाही. परमेश्वर जशी योग्य वयात लैंगिकता निर्माण करतो, तसेच योग्य वेळी ब्रह्मचर्यसुद्धा बहाल करतो. तुमचं वय २४ आहे. हे वय लैंगिकतेच्या अभिव्यक्तीचं आहे. एखाद्या तुम्हाला पूरक मुलीशी लग्न करा. या वयात घेतलेली ब्रह्मचर्याची शपथ केवळ मन:शांती नव्हे तर मनोविकृती निर्माण करेल. आपल्या भावनांचाही आदर करा.

सेक्सविषयीचे प्रश्न विचारा बेधडक

तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.