प्रश्न : स्त्रियांमधे पुरुषांच्या तुलनेत लैंगिक गैरसमज कमी आढळतात, याचं कारण काय ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर : पुरुषांमधे स्वतःच्या जननेंद्रियासंबंधातील अज्ञान आणि त्यामुळे तयार झालेले गैरसमज यांचं प्रमाण स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या गैरसमजांपेक्षा अनेक पटीने अधिक आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमधे स्वतःच्या जननेंद्रियाबद्दल कुतूहल आणि गैरसमज दोन्हीही खूपच कमी आढळतात.

असं असण्यामागे तीन-चार प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे स्त्रीच्या जननेंद्रियाचा फारच कमी भाग शरीराबाहेरून दिसू शकतो. दुसरं कारण म्हणजे स्त्रीची लैंगिकता शरीरप्रधान कमी व हृदयप्रधान (भावनाप्रधान) अधिक असते. तिसरं कारण म्हणजे, साधारणपणे 12- १३ व्या वर्षी मुलींची मासिक पाळी सुरू होते, त्या सुमारास अपरिहार्यपणे त्यांना काही गोष्टींची माहिती पुरवली जाते. मुलांमध्येही वीर्यनिर्मिती, वीर्यस्खलन याच वयात सुरू होते, पण त्याबद्दलची माहिती त्यांना पुरवणे गरजेेचे आहे, याविषयीचे गांभीर्य कुणालाच फारसे वाटत नसल्यामुळे त्यांना ती माहिती आजही विस्तृतपणे पुरवली जात नाही. त्यामुळेच अज्ञान व चुकीच्या मार्गाने स्वतःहून मिळवलेल्या अर्धवट माहितीपोटी पुरुषांमध्ये अनेक गैरसमज निर्माण होतात.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : वहिनीविषयी आकर्षण वाढलंय, काय करू?

यातच भर घालते ती चौथी, अत्यंत महत्वाची गोष्ट. . रेल्वेस्थानकांवर किंवा अन्यत्र अनधिकृत सेक्स क्लिनिक्सची मोठी जाहिरात केली जाते. (वास्तविक डॉक्टरी पेशाला अशा जाहिराती करण्याची परवानगी नाही.) आपल्यात काहीतरी उणीव, व्यंग किंवा कमतरता आहे, असा गैरसमज असंख्य पुरुषांनी करून घेतलेला असतो. ते तरुण अशा क्लिनिक्सना बळी पडतात. त्यांच्याकडून उपचारांच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जातातच शिवाय असे तरूण तेथून ज्ञानापेक्षा जास्त अज्ञान घेऊन येतात. आणि त्याचा त्यांच्या व्यक्तिगत आणि नंतर वैवाहिक आयुष्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यातली चांगली गोष्ट अशी आहे की अशा अनधिकृत क्लिनिक्समध्ये उपचारांसाठी स्त्रिया जातच नाहीत. त्यामुळे गैरसमजापासून त्या दूर राहातात.

बहुसंख्य वेळा नॉर्मल गोष्टीला ॲबनॉर्मल असल्याचा समज करून घेऊन अनेक युवक चिंतातूर होतात. ही चिंता व त्याचे मनावर होणारे आघात मग त्यांच्या लैंगिक प्रेरणा, लैंगिक क्षमता व लैंगिक प्रतिसाद यांच्यावर घातक परिणाम घडवू लागतात. म्हणूनच खरं तर योग्य वयात मुलामुलींना सर्व स्तरांवरून त्यांच्या शरीराची योग्य माहिती करून देणे गरजेचे आहे.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : ‘माझा मुलगा स्त्रियांची अंतर्वस्त्रे घालतो’

तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा

लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर.

सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual problems question and answer men vs women sex literacy ratio nrp
First published on: 26-09-2022 at 15:44 IST