प्रश्न : माझं लग्न होऊन सहा वर्षे झाली. गेल्या चार महिन्यांपासून माझ्या नवऱ्याला शीघ्रपतनाचा नवीन त्रास सुरू झाला आहे. यावर काही इलाज आहे का?

उत्तर : लग्नानंतर बराच काळ उलटून गेल्यानंतरही शीघ्रपतनाची तक्रार असलेले काही पुरुष असतात. या पुरुषांमधे समागम करतेवेळी खास सूचना पाळण्याचं एक विशेष तंत्र आम्ही डॉक्टर अनेक वेळा दांपत्याना शिकवतो. संवेदनांचा आवेग सहन होण्यापलीकडे जाण्याआधीच जर समागम तात्पुरता थांबवला आणि आवेगाची तीव्रता ओसरू दिली, तर अशा पद्धतीने समागमाचा काळ वीर्यस्खलन होऊ न देता वाढवता येऊ शकतो. यासाठी पती-पत्नीमधे एकमेकांना सूचना देण्याबाबत आधीच ठरवलेलं असणं गरजेचं असतं समागम करतेवेळी जेव्हा संवेदना वाढत जातात तेव्हा संवेदनाचा आवेग अजून आपल्या आटोक्यात असतानाच समागम तात्पुरता थांबवून वीर्यस्खलन टाळता येऊ शकतं. आवेगाची तीव्रता कमी होताच समागम पुन्हा सुरू करता येऊ शकतो. अशा प्रकारे थांबत थांबत समागम होऊ दिल्यास शीघ्रपतनाची तक्रार मिटवता येऊ शकते.

cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
Stolen pipe connections to illegal buildings in Dombivli man arrested including plumber
डोंबिवलीत बेकायदा इमारतींना चोरीच्या नळजोडण्या, प्लंबरसह मध्यस्थ अटकेत
Benifits of eating Garlic:
Benifits of eating Garlic: रोज सकाळी उपाशी पोटी खा लसूण, फायदे एकून व्हाल थक्क
Reasons For Less Sex Drive In Women And Men Expert says Vitamin D Deficiency Can Cause less libido How To Boost Sex Life
सेक्सची इच्छा कमी होण्यामागे ‘हे’ असू शकते कारण; तज्ज्ञ सांगतात, “निदान ३० मिनिट सूर्यप्रकाश… “

आणखी वाचा : वेश्याव्यवसायात ढकललं… समाजानं झिडकारलं… पण आज कर्तृत्वपाहून सन्मानित केलं!

दोन लैंगिक समागमामधे जर खूप मोठी गॅप असली, तर त्यामुळेही शीघ्रपतनाची तक्रार उद्भवू शकते. ज्याप्रमाणे एखादा पेला जर पाण्याने काठोकाठ भरला असेल, तर लहानशा हालचालीनेही त्यातलं पाणी लगेच बाहेर सोडू शकतं, पण जर का पेला अर्धा रिकामा असेल, तर त्यातलं पाणी सहजासहजी बाहेर सोडत नाही. तसंच जेव्हा एखादी व्यक्ती काही कारणामुळे बऱ्याच कालावधीसाठी समागम करत नाही, (किंवा इतर कुठल्या प्रकारेही वीर्यस्खलन होऊ देत नाही,) तेव्हा शुक्रजंतूचा मोठा साठा वृषणामधे साचला जातो. हा साठा काठोकाठ भरलेल्या पेल्याप्रमाणेच बाहेर वाहून जाण्यासाठी तत्पर असतो. अशा अवस्थेत संभोग सुरू करताच लगेचच किंवा अगदी प्रणयाच्या दरम्यानसुद्धा अचानकपणे वीर्यपतन होण्याची शक्यता असते (स्त्रीच्या नुसत्या विचारानेही वीर्यस्खलन होऊ शकते.) असा अनुभव आल्यास निराश न होता थोडा वेळ मधे जाऊ देऊन दुसऱ्यांदा संभोग केल्यास शीघ्रपतन होत नाही. काही पुरुषांना संभोगासाठी लागणारी ताठरता शिश्नामधे पुन्हा निर्माण होण्यास खूप वेळ लागतो व दुसऱ्यांदा संभोग करणं लगेचच जमत नाही. अशा पुरुषांना संभोगाआधी काही तास हस्तमैथुन करण्याचा सल्ला काही डॉक्टर देतात. त्याचा काही जणांना उपयोग होतो.

आणखी वाचा : महिलांसाठीची सुपरफूडस्

शीघ्रपतनाचा संबंध व्यक्तीच्या स्वभावात खोलवर भिनलेली अधिरता, उतावळेपणा व घाई याच्याशी असतो. अनेक पुरुष लैंगिक संबंध ठेवतेवेळी खूप अधीर होतात. स्वतःचा लैंगिक आवेग आवरणं त्यांना शक्य होत नाही. त्याच्या स्वभावातला हा उतावळेपणाच मग लैंगिक संबंध ठेवत असताना नकळत त्यांच्या शरीरातून शीघ्रपतनाच्या रूपाने व्यक्त होऊ लागतो. अशा वेळी त्यावर शारीरिक उपाय करून त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण उतावळेपणा हा त्यांच्या मानसिकतेचा पैलू आहे. अशावेळी व्यक्तीच्या स्वभावातली अधीरता व उतावळेपणा कमी व्हावा याचा उपाय करणं गरजेचं असतं. हा उपाय मनोचिकित्सा, समुपदेश व पुष्पौषधी यांच्या मदतीने करता येऊ शकतो.

शीघ्रपतन कशाला म्हणतात ?

प्रश्न : शीघ्रपतन हा रोग आहे का ? शीघ्रपतनाची कारणं काय? शीघ्रपतनाचा हस्तमैथुनाशी संबंध असतो का ?

उत्तर : पुरुषांमधे एकदा का वीर्य बाहेर निघालं की काही क्षणात त्यांचं शिश्न शिथिल होतं व संभोग करण्याची त्यांची क्षमता काही काळासाठी (Refractory period) क्षीण होते. जोपर्यंत वीर्यस्खलन होत नाही तोपर्यंतच पुरुष संभोग चालू ठेवू शकतो. अनेक पुरुषांमधे त्यांचं आणि त्याच्या पत्नीचं समाधान (तृप्ती) होण्याआधीच खूप लवकर त्यांचं वीर्य स्खलित होतं. संभोगाचा पूर्ण आनंद घेण्याआधीच हे अपघाती वीर्यस्खलन झाल्याने साहजिकच दोघांचीही निराशा होते. अपेक्षेपेक्षा आधी वीर्यस्खलन होण्याच्या अशा या तक्रारीला शीघ्रपतन (Premature Ejaculation) असं म्हणतात. प्रत्येक पुरुष आपल्या लैंगिक जीवनात या तक्रारीच्या अनुभवातून ना कधी जातो.

आणखी वाचा : पोटच्या मुलीची हत्या करताना, तिने काय केला असेल विचार?

उत्तर : शीघ्रपतन हा आजार किंवा रोग (disease) नव्हे. शीघ्रपतनाची तक्रार असलेल्या व्यक्तीच्या शरीरात कसलीही व्याधी, आजार, कमजोरी, रोग, कमतरता किंवा उणीव नसते. ही तक्रार असलेल्या व्यक्तीच्या जननेंद्रियाची किंवा मज्जासंस्थेची तपासणी केल्यास बहुतांशी वेळा त्यात काहीही वैगुण्य दिसून येत नाही. शीघ्रपतनाच्या तक्रारीचा व्यक्तीच्या मानसिक अवस्थेशी मात्र थेट संबंध असतो. अर्थातच मानसिक पातळीवर उगम होणाऱ्या या त्रासाचा उपायही मानसिक पातळीवरच होणं गरजेचं असतं.

संभोगक्रीडेच्यावेळी व्यक्तीच्या मनात लैंगिकतेबाबत जर कुठलीही भीती, संशय, घाई, तणाव, न्यूनगंड, काळजी किंवा अपराधीपणाची भावना असेल; तर ती शीघ्रपतनाच्या तक्रारीच्या रूपात प्रकट होऊ लागते. गैरसमजापोटी स्वतःच्या पुरुषत्वाबाबत व्यक्ती साशंक असणं, ‘आपण पूर्वी केलेल्या हस्तमैथुनाचा परिणाम आपल्या लैंगिक क्षमतेवर तर झाला नसेल?’ असा दाट संशय मनात असणं, संभोगाच्या वेळी पूर्ण एकांत नसणं, लैंगिकता म्हणजे गैर, पतित किंवा अश्लील कृत्य आहे, असे खोल संस्कार करून घेतलेले असणं, आपण पत्नीला तृप्त करू शकू की नाही अशी भीती मनात असणं, आपले आवाज व हालचाली कुणी पाहात किंवा ऐकत तर नाही अशी भीती मनात असणं, संभोग लवकर उरकावा अशी घाई मनात असणं अथवा नको असलेली गर्भधारणा होण्याची काळजी मनात असणं, अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीमधे शीघ्रपतनाची तक्रार उद्भवते. लैंगिक संबंधाबाबतचा नवखेपणा हेसुद्धा शीघ्रपतनाची तक्रार असण्याचं एक कारण आहे.

आणखी वाचा : ‘त्या’ ठिकाणचे केस काढण्यापूर्वी हे वाचा!

शीघ्रपतनाची तक्रार असलेल्या व्यक्तीमधे कसलीही शारीरिक (organic) कमतरता नसते किंवा रोग झालेला नसतो. अर्थातच त्यामुळे कुठल्याही तपासण्यांची (investigations) गरज नसते. औषध घेऊन या तक्रारीचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये. शीघ्रपतनाची तक्रार असल्यास मित्राचे सल्ले अजिबात घेऊ नयेत व जाहिरात करणाऱ्या ‘सेक्स क्लिनिक’मधेही जाऊ नये. गैरसमज दूर करण्याऐवजी जर त्यांना खतपाणी घातल गेलं, तर मग एक किरकोळ गोष्ट त्रासदायक अशा मानसिक आजाराचं कारण बनू शकते.

शीघ्रपतनाचा संबंध हस्तमैथुनाशी विनाकारण जोडण्याचे काम अनेक भोंगळ पुस्तकं व सेक्स क्लिनिकच्या जाहिराती करत असतात. हस्तमैथुनाचा शीघ्रपतनाच्या तक्रारीशी काहीही संबंध नाही. हस्तमैथुन ही एक सर्वसामान्य घटना आहे. सर्व पुरुष कधी ना कधी किंवा वेळोवेळी हस्तमैथुन करतात. हस्तमैथुनाचे शरीरावर किंवा पौरुषत्वावर काहीही दुष्परिणाम होत नाहीत, हे एक वैज्ञानिक सत्य आहे.

बेधडक विचारा सेक्सविषयीचे प्रश्न!
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न -lokwomen.online@gmail.comया ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.