scorecardresearch

शी इज अनस्टॉपेबल : भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम

तरूण मुलींना भारतीय नौदलाकडे वळविण्यासाठी नौदलातील करिअर विषयक संधींबाबत जनजागृती करणारी एक मोहीम भारतीय नौदलाने होती घेतली आहे. या मोहिमेची सुरूवात नवी दिल्लीतून अलीकडेच झाली.

Indian navy women officers rally
भारतीय नौदलातील करिअरच्या संधींविषयी महिला नौदल अधिकाऱ्यांची जगजागृती मोहीम

भारतीय नौदल आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली – लोंगेवाल – दिल्ली या मार्गावर १२ दिवसांच्या ऑल इंडिया विमेन कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नौदलाच्या ताफ्यातील साहसी महिलांद्वारा या रॅलीचे संचालन होत आहे. भारतीय नौदलामध्ये अधिकारी होण्यासाठी अनेक अकल्पित आव्हानांना धैर्याने, दृढ निश्चय – संयमाने सामोऱ्या जाणाऱ्या महिलांच्या शौर्यगाथा ठळकपणे मांडण्यात येणार आहेत.

आणखी वाचा : ‘ती’ आई आहे म्हणुनि…

भारतीय नौदल आणि जीप इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजिण्यात आली आहे. दिल्लीपासून सुरू होत जयपूर, बिकानेर, जैसलमेर, लोंगेवाला, जोधपुर, उदयपूर असा सुमारे २३०० किमीचा प्रवास करत या रॅलीचा समारोप दिल्लीमधे होईल. नौदलातील महिला अधिकाऱ्यांच्या योगदाना प्रकाशझोतात आणणे, तरूणींना भारतीय नौदलामध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करणे, लोंगेवाला युद्धस्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणे, संपूर्ण रॅलीमार्गात नौदलातील वीरांगनांशी संवाद साधणे, एनडब्ल्यूडब्ल्यूए (नेव्ही वेल्फेअर अॅण्ड वेलनेस असोसिएशन) दिनाचे औचित्य म्हणून एनडब्ल्यूडब्ल्यूएचे उद्देश, हेतू सर्वांपर्यंत पोहोचवणे आदी उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. ‘शी इज अनस्टॉपेबल’ हे या रॅलीचे बोधवाक्य आहे. या मोहिमेचे आभासी उद्घाटन नौदल प्रमुख अॅडमिरल आर. के. हरी कुमार यांच्याहस्ते पार पडले.

आणखी वाचा :  घटस्फोट म्हणजे काही रोग नव्हे घटस्फोटिता कुटुंब नवरा बायको लग्न संसार …

`शी इज अनस्टॉपेबल’ या अनोख्या रॅलीमध्ये महिला नौदल अधिकारी आणि खलाशी तसेच जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेल्या नौदल अधिकाऱ्यांच्या पत्नींचा समावेश आहे. भारतीय नौदलामध्ये आपल्या भरीव कामगिरीने बदल घडवून आणणाऱ्या आणि संपूर्ण नौदलासाठी आदर्श ठरलेल्या महिलाही यात सहभागी होणार आहेत. या आगळ्या साहस मोहिमेविषयी जीप इंडियाच्या प्रमुख निपुण जे. महाजन म्हणाल्या, केवळ संपूर्णपणे महिलांसाठी खास अशी मोहीम राबविणाऱ्या भारतीय नौदलाच्या पाठीशी उभे राहणे हे आम्हांला सन्माननीय वाटते. एक ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच महिला नेतृत्व आणि सर्वच क्षेत्रातील महिलांच्या समानतेवर विश्वास ठेवत आलो आहोत. असीम साहस आणि झोकून देत काम करणाऱ्या महिलांचा ही मोहीम म्हणजे आगळा सन्मानच आहे. रॅलीदरम्यान एनडब्ल्यूडब्ल्यूए च्यावतीने विशेष मुलांच्या शाळा, वृद्धाश्रम आणि अनाथालयांमधून कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तर महिला अधिकारी भारतीय नौदलाच्यावतीने या क्षेत्रातील करीअर आणि उपजीविकेच्या संधींविषयी जागरूकता मोहिमही राबविणार आहेत.
(शब्दांकन : साक्षी सावे)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-02-2023 at 19:21 IST

संबंधित बातम्या