समाजात वावरताना मुलींना कसं वागलं पाहिजे, काय घातलं पाहिजे, काय नाही घातलं पाहिजे असे अनेक अलिखित बंधने लादली जातात. ही बंधने झुगारून बिंधास्त जगणाऱ्या मुलींना अनेकवेळा टीकेचा आणि रोषाचा सामना करावा लागतो. असाच प्रकार बंगळुरूत घडलाय. रस्त्यावर शॉर्ट्स घालून फिरणाऱ्या एका मुलीला एका वृद्ध महिलेने हटकलं. शॉर्ट्स मुलींसाठी नसतात तर मुलांसाठी असतात असं म्हणत तिने रस्त्यावरच या मुलीला सुनावलं. यावरुन सोशल मीडियावर प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी वृद्ध महिलेची बाजू घेतली तर अनेकांनी या तरुणीला पाठिंबा दिला.

सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर असलेली टॅनी भट्टाचार्जीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला कन्नडमध्ये एका पुरुषाशी भांडताना दिसत आहे. तो पुरुष कोण होता, हे स्पष्ट झालं नसलं तरीही तो टॅनीबरोबर होता. ती वृद्ध महिला त्या पुरुषांबरोबर भांडत होती.

Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

हेही वाचा >> Iltija Mufti : आईच्या जागेवरून आता लेक उभी राहणार; परदेशातील भारतीय संस्थांचा अनुभव असलेल्या इल्तिजा राखणार का मेहबुबा मुफ्ती यांचा गड?

“त्यांनी असे फिरू नये”, असं ती वृद्ध महिला रागाने टॅनीकडे बोट दाखवत कन्नडमध्ये म्हणाली. या वृद्ध महिलेला विरोध केला गेला तेव्हा ती म्हणाली की, “शॉर्ट्स पुरुष घालू शकतात. परंतु महिला शॉर्ट्स घालू शकत नाहीत.” टॅनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा संवाद ऐकू येतोय. हा व्हिडिओ शेअर करताना टॅनी म्हणाली की, “तुम्हाला काय वाटतं काय प्रॉब्लेम आहे? मला माहित नाही काय चालले आहे.”

रस्त्यावरच्या लोकांना माझे पाय दाखवू लागली

याच पोस्टच्या खाली कमेंटमध्ये ती म्हणाली की, “मी मंदिरात गेले नव्हते. हा प्रकार रस्त्यावर घडला आहे. तिला खरंच काही त्रास होता तर तिने नम्रपणे सांगयाल हवं होतं. रस्त्यावरच्या लोकांना तिने गोळा करण्याची गरज नव्हती.” ती पुढे म्हणाली, “आम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कार पार्किंगच्या दिशेने जाऊ लागलो. त्यानंतर ती आमच्या मागे आली आणि रस्त्यावर उभी राहून ओरडू लागली. रस्त्यावरील वाहनांना अडवून ती माझे पाय इतरांना दाखवू लागली.”

मी एकटी असते तर…

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा तिचं मत मांडण्याकरता एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ती म्हणाली, “मी माझे शॉर्ट्स खाली करायला हवेत का? नाही ना? तुम्ही व्हिडिओत पाहिल्यानुसार तुम्हाला माहितये की ती काय म्हणाली. आम्ही तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. म्हणून आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेलो. पण तरीही ती आमच्या दिशेने चालत आली. आणि रस्त्यावर लोकांना थांबवून माझ्याकडे बोट दाखवू लागली. त्यादिवशी माझ्याबरोबर माझा जवळचा मित्र होता, जो माझ्या वतीने बोलत होता. पण जर मी एकटी असते तर… त्यामुळे तुम्हीही अशा परिस्थिती काळजी घ्या”, असं आवाहनही तिने केलं.

दरम्यान, या दोन्ही व्हिडिओच्या खाली संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अनेकजणांनी या वृद्ध महिलेची बाजू घेतली आहे. तर, अनेकांनी टॅनी चॅटर्जीची बाजू घेतली आहे.